immunity tips for corona:आयुर्वेदात लपलंय कोरोनापासून बचावाचा उपाय, इम्युनिटीसाठी सोप्या टिप्स

तब्येत पाणी
Updated Apr 15, 2021 | 17:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी चांगली इम्युनिटी असणे गरजेचे अते. यासाठी कोरोना व्हायरसपासून बचावासाठी आयुर्वेदिक पद्धतीचा वापर केला पाहिजे.

corona
आयुर्वेदात लपलंय कोरोनापासून बचावाचा उपाय, इम्युनिटीसाठी टिप 

थोडं पण कामाचं

  • कोरोनापासून बचावासाठी इम्युनिटी मजबूत असणे महत्त्वाचे 
  • आयुर्वेदाता कोरोनापासून बचावासाठी काही उपाय सांगितले आहेत
  • दररोज अभ्यंगस्नान केल्याने शरीर, मनाला पुष्टी मिळते. 

मुंबई: आयुर्वेदाचे दोन मुख्य प्रयोजन आहे. 

स्वस्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम् |
 आतुरस्य  विकार प्रशमनं च ||"

म्हणजेच  स्वस्थ(निरोगी)व्यक्ती स्वास्थ कायम राखणे, म्हणजे इम्युनिटी(रोगप्रतिकारक क्षमता) चांगली राखणे हा आयुर्वेदाचा मुख्य हेतू आहे आणि त्यानंतर येथे आतुर म्हणजेच आजारी व्यक्तीचे रोग दूर करणे. 

प्रत्येक प्रकारच्या आजारापासून तसेच विषाणूपासून बचावासाठी आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणे गरजेचे असते. त्यासाठीच आयुर्वेदात अनेक उपाय देण्यात आले आहेत ज्यामुळे आपण आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढेल. 

दिनचर्या -

जसे की आयुर्वेदात सांगिते की ब्रम्ह मुहूर्तावर उठले पाहिजे म्हणजे सकाळीच उठले पाहिजे, रात्री जागरण करू नये, दिवसा झोपू नये या दिनचर्येचे नेहमी पालन केले पाहिजे.

अभ्यंग - "अभ्यंगम् आचरे नित्यम्  स जराश्रमवातहा |
दृष्टिप्रसादपुष्टआयु : स्वप्नसुत्वकत्वदार्ढ्यकृत्  ||"

दररोज अभ्यंगस्नान केल्याने शरीर आणि मनाला प्रसन्नता वाटते. तसेच कर्ण(कान), पाय आणि डोके या तीन अवयवांना दररोज अभ्यंग करणे फायदेशीर ठरते. 

योगाभ्यास

दररोज शरीराचे योग व्यायाम केल्याने फायदा होतो. दिवसांतून कमीत कमी २० मिनिटे प्राणायाम, ओकांर, कपालभाती केल्याने तसेच उन्हाळ्याच्या दिवसांत शीतली क्रिया फायदेशीर ठरते. यामुळे आपले आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. 

घरगुती उपाय

गोल्डन मिल्क - दररोज सकाळी हळद घातलेले दूध प्यायल्याने इम्युनिटी वाढण्यास मदत होते. 

काढा आणि मसाला चाय - आले, काळीमिरी, तुळस, दालचिनी, अश्वगंधा या गोष्टी दोन कप पाण्यात टाकून चांगल्या उकळा. त्याला एक कप बनवा. अशा काढ्याचे दिवसातून एक ते दोन वेळा सेवन करा. 

रसायन औषधी - आवळा फळ स्वरूपात अथवा आवळ्याचे चूर्ण घेतल्याने शरीरास फायदा होतो. सध्या बाजारात साखरेपासून बनवलेली आवळा कँडी मिळते. तीहीफायदेशीर ठरते. 

या लेखाच्या लेखिका डॉक्टर मिताली धनवाडे आहे ज्या वेदिक्युअर हेल्थकेअर अँड वेलनेसच्या आयुर्वेदिक सल्लागार आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी