Weight Loss Tips: रोज जाळा फक्त 400 कॅलरीज, जिमला न जाताही होईल वजन कमी, फिटनेस कोचचा सिंपल फंडा

वजन कमी करण्यासाठी नेहमीच जिमला जाण्याचा आणि डाएट करण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्याकडे जर जिमला जाण्याची इच्छा किंवा क्षमता नसेल आणि महागडे डाएट प्लॅन तुम्हाला परवडणारे नसतील, तर केवळ चालण्याच्या शिस्तबद्ध व्यायामानेदेखील वजन कमी करता येऊ शकते.

Weight Loss Tips
रोज जाळा फक्त 400 कॅलरीज  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अनेकांना असतो जिममध्ये जाण्याचा कंटाळा
  • जिममध्ये न जातानाही कमी करू शकता वजन
  • रोज 10 हजार पावलं चालून कमी होऊ शकतं वजन

Weight Loss Tips: लठ्ठपणा (Obesity) ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे. चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती, कामाच्या उलटसुलट वेळा आणि अपुरी झोप यासारख्या कारणांमुळे गेल्या काही वर्षात लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. लठ्ठपणा हा सोबत अनेक आजार घेऊन येत असतो. मधुमेह, ब्लड प्रेशर, कॅन्सर यासारख्या अनेक आजारांना लठ्ठपणामुळे निमंत्रण मिळण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे कोरोनासारखे साथीचे आजार जडण्याचीही त्यामुळे शक्यता असते. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आपलं वजन नियंत्रणात (Weight control) ठेवण्याची गरज असते. वजन कमी करण्यासाठी नेहमीच जिमला जाण्याचा आणि डाएट करण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्याकडे जर जिमला जाण्याची इच्छा किंवा क्षमता नसेल आणि महागडे डाएट प्लॅन तुम्हाला परवडणारे नसतील, तर केवळ चालण्याच्या (walk) शिस्तबद्ध व्यायामानेदेखील वजन कमी करता येऊ शकते. 

रोज चाला 10000 पावलं

वेटलॉस तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दररोज 10 हजार पावलं चालणं, हे आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. ही अशी एक सवय आहे, जी हळूहळू मात्र सातत्याने तुमचं वजन कमी करण्यास मदत करत असते. जर तुम्हाला जिमला जाण्याची इच्छा नसेल, तर दररोज केवळ 10 हजार पावलं चालून वजन कमी करू शकता. अनेकजण आळसामुळे सकाळी लवकर उठत नाहीत. रोजच्या रोज जिमला जाणं काहींना आवडतही नाही. अशा लोकांसाठी चालणे हा उत्तम व्यायाम मानला जातो. 

अधिक वाचा - How To Cure PCOD: पीसीओडी एक नवी समस्या, जाणून घ्या कसे करायचे उपचार

प्रयत्नपूर्वक घटवा वजन

ज्याला खरोखरच फिट आणि हेल्दी राहायची इच्छा असेल, त्याच्यासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम ठरू शकतो. चालणं हा सोपा व्यायाम असला तरी त्यात सातत्य राखणं हे मोठं आव्हानात्मक असतं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करणं आवश्यक आहे. चालण्यासाठी तुम्ही तुमच्या काही मित्रांना तयार करू शकता आणि त्यांच्यासोबत हसतखेळत व्यायामाचा आनंद घेऊ शकता. 

400 कॅलरीजचं टार्गेट

रोज 10 हजार पावलं चालण्याचा व्यायाम म्हणजे रोज अर्धा तास चालण्याचा व्यायाम असतो. दररोज जर तुम्ही 10 हजार पावलं चालण्याचा व्यायाम करत असाल, तर तुम्ही या व्यायामाने 300 ते 400 कॅलरीज जाळत असता. त्यामुळे वेगाने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. मात्र या व्यायामात सातत्य राखण्याची गरज असते. 

अधिक वाचा - Harms of mouthwash: रोज रोज माउथवॉश करणं बरं नव्हे, बसेल हा भुर्दंड

आहारावरही द्या लक्ष

जर तुम्ही व्यायामातून 300 ते 400 कॅलरीज बर्न करत असाल, तर महिन्याला एक किलो वजन कमी करू शकता. अर्थात त्यासाठी आहारावर नियंत्रण असणंही गरजेचं आहे. अनेकजण व्यायामानंतर भूक लागल्यामुळे हेवी डाएट घेतात आणि जाळलेल्यापेक्षा अधिक कॅलरीजचं सेवन करतात. व्यायामातून तुम्ही जेवढ्या कॅलरीज जाळता, तेवढ्याच कॅलरीज जर आहारातूनही कमी केल्या, तर वजन कमी करण्याची प्रक्रिया तुम्ही अधिक वेगाने करू शकता.

डिस्क्लेमर - वजन कमी करण्याबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी