Blood Suger : मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात हे 5 घरगुती उपाय नक्की करा, रक्तातील साखर वाढणार नाही

तब्येत पाणी
Updated Apr 17, 2023 | 15:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Health Tips : उन्हाळ्याचे गरम आणि दमट वातावरण मधूमेह असलेल्या लोकांसाठी आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकते. उन्हाळ्यात मधुमेहग्रस्त लोकांना सामान्य लोकांच्या तुलनेमध्ये जलड डीहायड्रेशनचा धोका संभवतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात डायबीटीज रुग्णांची विशेष काळज घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात रक्तातील साखरेवर नियंत्रण कसे मिळवावे जाणून घ्या. 

मधुमेह वर घरगुती उपाय
Managing Diabetes in Summer  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • एप्रिल आणि मे महिन्याचा हंगाम मधुमेहींसाठी अधिक आव्हाने घेऊन येतो. 
  • न्हाळ्यात मधुमेहग्रस्त लोकांना सामान्य लोकांच्या तुलनेमध्ये जलड डीहायड्रेशनचा धोका संभवतो.
  • हे आहेत घरगुती उपाय

Managing Diabetes in Summer: एप्रिल आणि मे महिन्याचा हंगाम मधुमेहींसाठी अधिक आव्हाने घेऊन येतो. मधुमेह संबंधित केलेल्या एका अध्ययनात असे दिसून आले की, उन्हाळ्यातील उष्ण हवामानामुळे मधुमेहींना आरोग्याच्या समस्या सामान्य व्यक्तीच्या तुलनेत सर्वाधिक उद्भवू शकतात. गरमीच्या ऋतूमध्ये त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे कठीण जाऊ शकते.

वाढत्या उष्णतेमुळे मधुमेहीग्रस्त लोकांच्या आरोग्यविषयक समस्या वाढू शकतात. आरोग्यतज्ञांच्या मते उन्हाळ्यात रक्तातील साखरेच्या पातळीकडे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक असते. तसेच बाहेरच्या उष्ण वातावरणामुळे निर्माण होणाऱ्या शरीरीक लक्षणाकडे देखील दुर्लक्ष करता कामा नये.  मधुमेही रुग्णांना या हंगामात सामान्य लोकांपेक्षा डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो.

अधिक वाचा : सावधान! लघवी बराच वेळ रोखल्याने उद्भवू शकतात या गंभीर समस्या

मधुमेहींना थकवा, लघवी कमी होणे, गडद लघवी, कमी रक्तदाब, छातीची धड धड वाढणे, तहान वाढणे, चक्कर येणे तसेच डीहायड्रेशन सारखे लक्षणे दिसू शकतात. शिवाय हलकी डोकेदुखी,  डोळे आणि तोंड कोरडे पडणे इ. समस्या उन्हाळ्यादरम्यान उद्भवू शकतात. अशावेळी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय करून पहा.

आयुर्वेदानुसार, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथीचे दाणे एक कप पाण्यात भिजून ठेवावेत. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने दिवसभर रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

एप्रिल आणि मे महिन्याचा हंगाम मधुमेहींसाठी अधिक आव्हाने घेऊन येतो. 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला मधुमेहाचे निदान झाले असेल तर उन्हाळ्यात जास्त गोड, कार्बोहायड्रेट आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावेत,  त्याऐवजी ताजी फळे आणि भाज्या खा.

आंब्याची पाने मधुमेहावर रामबाण उपाय आहेत 

15 आंब्याची पाने एक ग्लास पाण्यात उकळून रात्रभर राहू द्या, हे पाणी गाळून सकाळी प्या. तसेच कडुलिंबाची पावडर दिवसातून एकदा सेवन करू शकता. 

अधिक वाचा : CRPF मध्ये 1.30 लाख पदांसाठीच्या भरतीची घोषणा

हर्बल चहा साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते

उन्हाळ्यात चहा पिण्याची शिफारस केली जात नाही, परंतु जर तुम्ही ब्लड शुगरचे रुग्ण असाल तर तुम्ही साध्या चहाऐवजी हर्बल चहाचे सेवन करावे. तुम्ही सकाळी आले, हळद, दालचिनी पावडरचा बनवलेला हर्बल चहा घेऊ शकता.

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी झोप आणि योगासने चांगली असतात

मधुमेहींनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मंडुकासन, वज्रासन आणि अर्ध मत्स्येंद्रासन हे योगासने आवर्जून करावे. तुम्ही कपालभाती आणि उज्जयी सारखे प्राणायाम देखील करू शकता. याशिवाय रोज ७-८ तासांची झोप घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी