Weight Loss Tips:पोटाची चरबी कमी करायची आहे?, तर मधासोबत करा 'या' गोष्टींचे सेवन, लगेचच दिसून येईल परिणाम

Weight Loss Tips:असे खूप कमी लोक असतात ज्यांना जिम, वर्कआऊट आणि व्यायाम करण्यासाठी वेळ मिळतो. मात्र जर तुम्हाला जिम किंवा वर्कआऊट करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुमच्या एक चांगला पर्याय आहे.

Weight Loss Tips
वजन कमी करण्याच्या टीप्स  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • तुम्ही मध आणि लसूण खाऊन पोटाची चरबी कमी करू शकता. हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
  • वजन कमी करण्यासाठी मध आणि लसणाचे सेवन कसे करावं.
  • मध आणि लसूण तुम्हाला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय सर्वोत्तम परिणाम देईल.

मुंबई:  How To Control Weight: सध्या प्रत्येक व्यक्तीला आपली परफेक्ट फिगर (Perfect Figure)  हवी अशी इच्छा असते. त्या परफेक्ट फिगरसाठी प्रत्येक जण कष्ट घेत असतो. मात्र आजकालची खराब जीवनशैली आणि धावपळीचं रूटीनमुळे स्वतःकडे लक्ष देणं अशक्य होतं. असे खूप कमी लोक असतात ज्यांना जिम, वर्कआऊट आणि व्यायाम करण्यासाठी वेळ मिळतो. मात्र जर तुम्हाला जिम किंवा वर्कआऊट करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुमच्या एक चांगला पर्याय आहे. या पर्यायानुसार तुम्ही तुमच्या पोटाचा घेर कमी करू शकता. तुम्ही मध आणि लसूण खाऊन पोटाची चरबी कमी करू शकता. हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी वेळ आणि प्रयत्नांची गरज लागणार नाही. मध आणि लसूण तुम्हाला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय सर्वोत्तम परिणाम देईल. मध आणि लसूण सेवन केल्यानं शरीरातील वजन लवकर कमी होते.

चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी मध आणि लसणाचे सेवन कसे करावं.

अधिक वाचा-  घरीच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखी अंडा करी

असे सेवन करा

लसूण आणि मध खाण्यासाठी काचेच्या बरणीत लसूण सोलून त्यात मध टाका. दोन्ही नीट मिसळा आणि बरणीत ठेवा. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक लसूण खा. याचे सेवन करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि याची खात्री करा, कारण काही लोकांना साइड इफेक्ट्स देखील होऊ शकतात. जसे चक्कर येणे, उलट्या होणे, अशक्तपणा जाणवणे इ.

हे आहेत फायदे

लसूण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. पोट कमी करण्यासोबतच कफ आणि फ्लूच्या समस्येपासूनही आराम मिळतो. मध आणि लसूण या दोन्हीमध्ये भरपूर पोषक तत्त्वे आढळतात. ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच पचनसंस्था मजबूत होते. लसणामध्ये अॅलिसिन नावाचे मुख्य संयुग असते, जे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असते. याशिवाय जीवनसत्त्वे आणि अनेक पोषक घटक त्यात आढळतात. त्याचबरोबर मधामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, कार्बोहायड्रेट्स, अमिनो अॅसिड यांसारखे पोषक घटक आढळतात.

(अस्वीकरण: या लेखातील टिपा आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून त्याचा अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी