Diabetes: तुम्हाला डायबिटीजचा त्रास आहे का? हा आयुर्वेदिक उपाय ठरेल फायदेशीर

तब्येत पाणी
Updated May 09, 2022 | 13:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

हा एक असा आजार आहे जो व्यक्तीचे शरीर हळूहळू पोखरतो आणि त्यामुळेच याला सायलेंट किलर असे म्हणतात. 

diabetes
तुम्हाला डायबिटीजचा त्रास आहे का? हा उपाय ठरेल फायदेशीर 
थोडं पण कामाचं
  • हा एक मेटॉबॉलिक डिसॉर्डर आहे जे रुग्णाच्या रक्तातील ग्लुकोज लेव्हल वाढवता आणि गरजेच्या हिशेबाने इन्सुलिन बनवत नाही.
  • सरळ शब्दात सांगायचे झाल्यास जेव्हा शरीरात योग्य प्रकारे रक्कातील ग्लुकोज अथवा साखरेचा उपयोग करू शकत नाही तेव्हा डायबिटीज होतो.
  • याची कारणे अनेक असू शकतात जसे लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल, हार्मोन्समध्ये गडब, योग्य खाणे-पिणे नसणे, फिजीकल अॅक्टिव्हिटी न करणे. 

मुंबई: शुगर(sugar) म्हणजेच डायबिटीजचा(diabetes) त्रास एकदा सुरू झाला की तो काही पिच्छा सोडत नाही. आधीतर वय झाले की डायबिटीज होण्याचा धोका होता मात्र आजकाल सगळेच लहान-मोठे याची शिकार होतात. हा एक असा आजार आहे जो व्यक्तीचे शरीर हळूहळू पोखरतो आणि त्यामुळेच याला सायलेंट किलर(silent killer) असे म्हणतात. एक्सपर्ट्सच्या मते २०३० पर्यंत १० पैकी १ व्यक्ती डायबिटीजचा शिकार होईल. तर चॅरिटी डायबिटीज युकेचा दावा आहे वाढत्या लठ्ठपणाच्या कारणामुळे एका दशकात साधारण ५५ लाख वयस्क या आजाराने ग्रस्त होतील जे सध्या ४९लाखाच्या जवळपास आहेत. How to cure from diabetes with ayurvedic method

अधिक वाचा - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांवर NIAची कारवाई

अखेर हा आजार आहे तरी काय?

हा एक मेटॉबॉलिक डिसॉर्डर आहे जे रुग्णाच्या रक्तातील ग्लुकोज लेव्हल वाढवता आणि गरजेच्या हिशेबाने इन्सुलिन बनवत नाही. सरळ शब्दात सांगायचे झाल्यास जेव्हा शरीरात योग्य प्रकारे रक्कातील ग्लुकोज अथवा साखरेचा उपयोग करू शकत नाही तेव्हा डायबिटीज होतो. याची कारणे अनेक असू शकतात जसे लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल, हार्मोन्समध्ये गडब, योग्य खाणे-पिणे नसणे, फिजीकल अॅक्टिव्हिटी न करणे. 

दोन प्रकारचे असतात डायबिटीज

टाईप १मद्ये रुग्णाच्या शरारीत इन्सुलिन बनण्याचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे त्या व्यक्तीला बाहेरून इन्सुलिन देऊन कंट्रोल केले जाते. यात कोणतेही स्थायी उपचार नाहीत. टाईप २मध्ये व्यक्ती इन्सुलिनचा वापर पूर्णपणे करू शकत नाही. शरीरात इन्सुलिन तयार होते मात्र कमी प्रमाणात दरम्यान, योग्य डाएट आणि योग्य उपचारांच्या मदतीने तुम्ही हा आजार कमी करू शकता. 

काही काळजी घेणे गरजेचे...

  1. कमी गोड खा. साखरेची अथवा रिफाईंड कार्बोहायड्रेट असलेले खाणे टाळा. 
  2. पाणी खूप प्या. तसेच जेवणाच्या वेळेस एकाच वेळेस खाऊ नका. तर थोडे थोडे खा. 
  3. हाय फायबर डाएट ग्या. तसेच प्रोटीनचे सेवन अधिक करा.
  4. व्हिटामिन डीची शरीरात कमतरता नको. स्मोकिंग आणि अल्कोहोलपासून दूर राहा. 
  5. भाज्यांमध्ये कारली, काकडी, टोमॅटो, शलगम, दुधी, पालक, मेथी, कोबी खा. 
  6. फळांमध्ये सफरचंद, डाळिंब, पपई, संत्रे, जांभूळ, पेरू खा मात्र हाय शुगर असलेले जसे आंबा केळी, द्राक्षे कमी खा.
  7. सुक्या मेव्यांमध्ये बदाम, अक्रोड, अंजीर खा. किशमिश, खजूर यांचे सेवन करू नका. 

आयुर्वेदिक उफाय

जांभळाच्या बिया

आयुर्वेदिकमध्ये डायबिटीजच्या उपचारासाठी जांभळाच्या बिया सगळ्यात बेस्ट मानले गेले आहे. या बिया सुकवून त्यांची पावडर बनवा आणि रिकाम्या पोटी कोमट पाण्यात ही पावडर टाकून प्या. 

अधिक वाचा - मुंबईतल्या 'या' रेल्वे स्थानकांवर दर महागला, जाणून घ्या का?

कारले आणि कडुनिंबाचा ज्यूसही यासाठी फायदेशीर समजला जातो. रिकाम्या पटी कारल्याच्या रसात टोमॅटो आणि काकडी मिसळून प्या. तुम्ही कडुनिबांच्या पानांचाही ज्यूसही पिऊ शकतो. आयुर्वेदानुसार या ज्यूसचे दररोज रिकाम्या पोटी सेवन केले पाहिजे. 

डायबिटीजच्या रुग्णांनी दालचिनीचा चहा दिवसातून दोन वेळा प्यायला पाहिजे. यासोबतच दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टीचे सेवन करावे. कारण यामुळे इम्युनिटी वाढते तसेच पाचनतंत्रही सुधारते. ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते. तुम्ही दिवसातून दोन वेळा याचे सेवन करू शकता. 

आवळ्याचा ज्यूसही यात फायदेशीर ठरतो. १० मि.ग्रा आवळ्यामध्ये २ ग्रॅम हळद मिसळून दिवसातून दोन वेळा घ्या. याशिवाय डायबिटीजच्या रुग्णांनी दररोज २ते ३ पाने तुळशीची खावीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी