Body detoxification: शरीरात साठलेली घाण वेळीच करा साफ, डिटॉक्ससाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय

शरीरात साठलेली घाण आणि अनावश्यक घटक बाहेर काढण्याची गरज असते. काही नैसर्गिक उपाय वापरून शरीरात साठलेली ही घाण बाहेर काढता येऊ शकते. त्यामुळे गंभीर आजारांपासून आपली सुटका होते आणि दीर्घकाळ आपण फिट राहू शकतो.

Body detoxification
शरीरात साठलेली घाण वेळीच करा साफ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शरीराच्या बाह्य सफाईसोबत अंतर्गत सफाईचीदेखील असते गरज
  • साध्या नैसर्गिक उपायांनी करता येते शरीर डिटॉक्स
  • उत्तम आरोग्यासाठी लाईफस्टाईलमध्ये करावे लागतात काही बदल

Body detoxification: आपलं शरीर आरोग्यपूर्ण (Healthy body) राहण्यासाठी बाह्य साफसफाईसोबत अंतर्गत सफाईदेखील (Internal cleaning) आवश्यक असते. जर तुमचं शरीर तुम्ही वेळोवेळी आतून साफ करत नसाल, तर अनेक गंभीर आजारांना सामोरं जाण्याची वेळ येऊ शकते. शरीरात साठलेली घाण आणि अनावश्यक घटक (Unwanted factors) बाहेर काढण्याची गरज असते. काही नैसर्गिक उपाय वापरून शरीरात साठलेली ही घाण बाहेर काढता येऊ शकते. त्यामुळे गंभीर आजारांपासून आपली सुटका होते आणि दीर्घकाळ आपण फिट राहू शकतो. अशा प्रकारे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करण्याची गरज असते. जाणून घेऊया, आपल्या शरीराची अंतर्गत साफसफाई करण्याचे काही साधेसोपे आणि प्रभावी उपाय. 

पुरेसं पाणी प्या

शरीर शुद्ध करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्याची प्रक्रिया वेगाने होण्यास मदत होते. पाण्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीरात घाण पदार्थ साठून राहण्याची शक्यताही कमी होते. पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराचं तापमानही नियंत्रणात राहायला मदत होत असते. 

अधिक वाचा - Oral health tips: रोज ब्रश करताना किती टूथपेस्ट वापरावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

लिंबाचा उपयोग

लिंबू हा शरीरशुद्धीसाठीचा फायदेशीर घटक ठरतो. आपल्या आहारात लिंबाचा समावेश जरूर करा. लिंबात मुबलक प्रमाणात क जीवनसत्त्व असतं. शिवाय त्यात असणाऱ्या अँटी ऑक्सिडंट्सची संख्याही विपूल असते. त्यामुळे शरीरातील घाण आणि अनावश्यक पदार्थांची सफाई होण्यास मदत मिळू शकते. लिंबू खाण्यामुळे शरीरातील पीएच पातळी नियंत्रणात राखायलादेखील मदत होते. 

पुरेशी झोप

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी पुरेशी झोप घेण्याची गरज असते. चांगली आणि गाढ झोप घेतल्यामुळे शरीराला रिचार्ज होण्यास मदत होते. ज्या व्यक्ती पुरेशी आणि गाढ झोप घेत नाहीत, त्यांना ताणतणाव, चिंता, उच्च रक्तदाब यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते. गेल्या काही वर्षात व्यस्त शेड्यूलमुळे अनेकांना पुरेशी झोप घेता येत नाही. काहीजण मोबाईल आणि वेब सीरिजमुळे रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. दररोज किमान 7 ते 8 तास गाढ झोप घेणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. 

अधिक वाचा - Remedies to postpone periods: मासिक पाळी लांबवण्याचे नैसर्गिक उपाय, औषधांशिवाय होईल काम

फायबरयुक्त आहार

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आहारावर लक्ष देण्याचीही गरज असते. त्यासाठी आपल्या आहारात अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबरयुक्त आहाराचा समावेश करणे आवश्यक आहे. फळं, हिरव्या भाज्या आणि मोड आलेली धान्ये यांचा आहारात समावेश केला, तर शरीराची आतून शुद्धी होण्यास मदत होते. फायबर शरीरात गेल्यामुळे शरीरातील अनेक अशुद्ध घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया करणे शरीराला सोपे जाते. 

डिस्क्लेमर - बॉडी डिटॉक्ससाठी सामान्यज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या या काही टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या किंवा प्रश्न असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी