Home Remedies on Dark Neck : सुंदर आणि तेजस्वी त्वचेसाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. केवळ चेहराच नाही तर मान आणि घसा सुद्धा स्वच्छ, तेजस्वी असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र, अनेकांच्या मानेवर काळपट पणा दिसून येतो. मानेवरील काळपटपणाची अनेक कारणे आहेत. सूर्यप्रकाश, धूळ आणि मातीचा थर या सर्वांमुळे मानेवर काळपटपणा दिसून येतो. मानेवरील हे टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय ट्राय करु शकता.
हे पण वाचा : धूम्रपान करणे डोळ्यांसाठीही धोक्याचे
अनेक घरगुती उपायांनी तुम्ही मानेवरील काळपटपणा कमी करु शकता. घरगुती उपायांत बेकिंग सोड्याचा वापर सुद्धा होतो. एका वाटीत 2 ते 3 चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेवरील काळपटपणा असलेल्या भागात लावा. त्यानंतर ही पेस्ट स्क्रबसारखी लावा. मग थोड्यावेळाने पाण्याने स्वच्छ धुवा. यानंतर टॉवेलने पुसल्यावर मॉइश्चरायझर लावा.
हे पण वाचा : उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचे अद्भूत फायदे
मानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी सीरम तयार करता येऊ शकते. यासाठी ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस मिक्स करुन एका बाटलीत बंद करुन ठेवा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे मानेवर लावा. यामुळे मानेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होईल. काही दिवसांनंतर याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल.
हे पण वाचा : हे शाकाहारी पदार्थ तुमचे मसल्स बनवतील बळकट
एक चतुर्थांश कप ओट्स घ्या. त्यामध्ये एक ते दोन चमचे टोमॅटोचा रस आणि आवश्यकतेनुसार गुलाब पाणी घाला. या मिश्रणाचा स्क्रब बनवून मानेवर लावा. ही पेस्ट 15 ते 20 मिनिटे मानेवर लावल्याने मग हलक्या हाताने त्या ठिकाणी घासा. यामुळे मानेवरील काळपटपणा निघून जाण्यास मदत होईल. असे तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करु शकता. पण हे करताना ओट्स हे बारीक वाटलेले असावेत.
हे पण वाचा : हात-पाय सुन्न होणे गंभीर आजाराचे लक्षण?
टॅनिंग आणि घाण स्वच्छ करण्यासाठी बटाट्याचा रस प्रभावी आहे. बटाटा किसून त्याचा रस बनवा. ते कापसाच्या सहाय्याने मानेवर लावा आणि 10 ते 15 मिनिटे तसेच ठेवा. काही दिवस असे केल्याने त्याचा उत्तम परिणाम दिसून येईल.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)