5 Remedies for Kidney Stone :औषध आणि शस्त्रक्रियेची गरज पडणार नाही, हार्वर्डचे 5 उपाय सहज काढतील किडनी स्टोन

तब्येत पाणी
Updated Mar 22, 2023 | 18:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

5 Remedies for Kidney Stone in marathi:हार्वर्ड ने किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी तसेच किडनी स्टोन नाहीसे करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

किडनी स्टोन ही एक आता मोठी समस्या बनत चालली आहे,
किडनी स्टोन का होतो?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • किडनी स्टोन ही समस्या खूप वेदनादायी आणि क्लेशदायी असते.
  • स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषांना स्टोनचा धोका अधिक
  • किडनी स्टोन नाहीसे करण्यासाठी उपाय

5 Remedies for Kidney Stone in marathi:किडनी स्टोन ही एक आता मोठी समस्या बनत चालली आहे, ही समस्या कुणालाही होऊ शकते. स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषांना स्टोनचा धोका अधिक असतो आणि जवळपास अर्ध्या लोकांना 10 ते 15 वर्षादरम्यान स्टोन होण्याची संभावना असते. ही एक प्रचंड वेदनादायी समस्या असून, यामुळे रुग्णाचे दैनंदिन जीवनदेखील विस्कळीत येऊ शकते. 

किडनी स्टोन का होतो? कॅल्शियम, ऑक्साइट आणि युरीक एसिड सारखे नको असलेले घटक शरीरातून बाहेर पडत नाही आणि त्यामुळे त्याचे क्रिस्टल म्हणजेच छोटे छोटे दगड तयार होतात. जे नंतर मोठे होत जातात. 

हे पण वाचा : ​World Cup 2023: 'ही' टीम जिंकणार वनडे वर्ल्ड कप

हार्वर्ड हेल्थ नुसार अनेकवेळा स्टोन लघवीद्वारे बाहेर पडतो, पण काही वेळा तो लघवीच्या मार्गामध्ये अडकून राहतो. ज्यामुळे रुग्णाला लघवी करताना जळजळ, प्रचंड वेदना, पोट आणि कंबरदुखी, लघवीतून रक्त, मळमळ किंवा उलटीसारखे होणे असे लक्षणे दिसून येतात. 

किडनी स्टोनवर काय उपाय आहेत? 
किडनीतून स्टोन काढण्यासाठी अनेक आठवडे किंवा महीने लागू शकतात. कारण, स्टोन च्या आकारमानावर आणि संख्येवर ते अवलंबून असते. यावर अनेक औषधे आणि उपचार उपलब्ध आहेत. काही स्टोन गरज पडल्यास शस्त्रक्रियेमार्फत काढले जातात. हॉवर्ड हेल्थनुसार काही सहज घरगुती उपायांद्वारे किडनो स्टोन काढता येऊ शकतो, तसेच त्यापासून बचाव देखील करता येऊ शकतो. 

हे पण वाचा : ​इंद्राणीची लव स्टोरी ते शीना बोरा हत्याकांडची मिस्ट्री

किडनी स्टोनसाठी घरगुती उपचार -

भरपूर पाणी प्या 
हार्वर्ड हेल्थ नुसार जी लोकं दररोज 2 पेक्षा आणि त्याहून जास्त 2.5 लीटर इतकी लघवी करतात त्यांना किडनी स्टोन होण्याची शक्यता 50 टक्के एवढी होती. त्या अनुक्रमे दररोज इतकी लघवी होण्यासाठी तुम्हाला दिवसभरातून 2 लीटर पाणी प्यायला हवे.       
  
कॅल्शियमचे पदार्थ जास्त खावेत
कॅल्शियमने परिपूर्ण असे पदार्थांचे सेवन करायला हवेत. दही, बिन्स, डाळ आणि बियांमध्ये कॅल्शियम चा मोठा स्त्रोत असतो. कॅल्शियम ऑक्सालेटला आतडयांमध्ये बांधून ठेवण्यास मदत करतात.  

लिंबू पाणी किडनी स्टोन समस्येवर रामबाण उपाय
लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड कॅल्शियमला ​​बांधून ठेवण्यास आणि स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते.  दररोज अर्धा कप लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्या. दोन लिंबाचा रस प्यायल्याने युरिन सायट्रेट वाढते आणि किडनी स्टोनचा धोका कमी होतो. 

हे पण वाचा : गुढीपाडव्यानिमित्त Wishes, Greetings, WhatsApp Quotes, Image

सोडियम युक्त पदार्थ किडनी स्टोनची शक्यता वाढवतात. 
सोडियम युक्त पदार्थामुळे किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता असते. सोडियम तुमच्या लघवीत कॅल्शियमचे प्रमाण वाढवते. तुम्ही दररोज 2.300 मिलिग्राम सोडियमपेक्षा अधिक सेवन करु नये. 

प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांपासून लांब रहा. 
मांस, अंडी आणि मासे यांमधून मिळालेल्या प्रथिनांना प्राणी प्रथिने असे म्हणतात. ह्या पदार्थांचे सेवन केल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक असतो. जर तुम्हाला किडनी स्टोनचा धोका असेल तर तुम्ही हे पदार्थ खाण टाळा. 

' (हा लेख केवळ तुमच्या सामान्य माहितीकरिता आहे.  कोणत्याही प्रकारचे औषध किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. ) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी