Remedies for mosquitoes: ‘या’ सोप्या उपायांनी पळवून लावा डास, कधीच होणार नाही त्रास

बाजारात मिळणाऱ्या कॉइल्स आणि इतर उत्पादनांचा वापर करूनही डासांचा अंमल कमी होत नसल्याचाच अनुभव अनेकांना येतो. पाणी साठलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होते. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही घरगुती उपायांनी या डासांपासून आपण स्वतःची सुटका करून घेऊ शकतो.

Remedies for mosquitoes
‘या’ सोप्या उपायांनी पळवून लावा डास  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • डासांमुळे होऊ शकतात अनेक गंभीर आजार
  • सोप्या उपायांनी पळवून लावता येतात डास
  • घरगुती पदार्थांचा वापर करून मिळवा डासांपासून सुटका

Remedies for mosquitoes: संध्याकाळच्या वेळी घरात येणारे डास (Mosquitoes) ही बहुतांश कुटुंबांची समस्या असते. अनेकदा घरात साठलेल्या पाण्यात डासांची अंडी (Eggs) आढळून येतात आणि मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होते. तर काही वेळा घराच्या आजूबाजूच्या परिसरात डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत असते. हे डान्स आपल्या घरात येतात आणि आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. बाजारात मिळणाऱ्या कॉइल्स आणि इतर उत्पादनांचा वापर करूनही डासांचा अंमल कमी होत नसल्याचाच अनुभव अनेकांना येतो. सध्या पावसाळा लांबल्याने अनेक ठिकाणी डासांची उत्पत्ती झाली आहे. पाणी साठलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास झाली असून त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही घरगुती उपायांनी या डासांपासून आपण स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. जाणून घेऊया असेच काही सोपे उपाय.

लसणाचा रस

लसणाच्या रसात असणाऱ्या सल्फरमुळे डासांना पळवून लावायला मदत होते. त्याचप्रमाणे जर डासांनी लसणाचा रस प्यायला, तर ते मरून जातात. त्यासाठी लसणाच्या काही पाकळ्या कुटून त्या पाण्यात उकळून घ्या. हे पाणी थंड करून एका स्प्रेमध्ये भरा आणि घरभर फवारा. यामुळे घरातील मच्छर निघून जातील.

कापूर

घरातील डास पळवून लावण्यासाठी कापूर हा एक रामबाण उपाय आहे. घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद करून कापूर जाळा. त्यानंतर अर्ध्या तासात जवळपास सर्व डास घरातून निघून गेल्याचे तुम्हाला दिसेल. काही डास आजूबाजूला मरून पडल्याचेही तुमच्या लक्षात येईल. तुम्ही कापूर पाण्यात घालूनही ठेवू शकता. त्यामुळे त्याचा गंध संपूर्ण खोलीत पसरतो आणि डास तिकडे फिरकत नाहीत. मात्र हे पाणी लहान मुले आणि प्राण्यांपासून दूर ठेवा.

अधिक वाचा - Saffron reality check: केशर अस्सल आहे की बनावट? असा ओळखा फरक

पुदिना

आपल्याला पुदिना अत्यंत चविष्ट आणि रुचकर लागतो. मात्र डासांना या वासाची चीड असते. त्यामुळेच बाजारात मिळणाऱ्या डासांच्या रॅकेटमध्येही पुदिना वापरला जातो. पुदिन्याची पाने घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये ठेवून द्या. तुम्ही घरात पुदिन्याचे तेलही स्प्रे करू शकता. त्यामुळे डास मरून जातील.

लिंबू आणि लवंग

या उपायासाठी लिंबाचे दोन भाग करा आणि त्यात लवंग ठेवा. यावासाने घरातील डास पळून जातील.

अधिक वाचा - Bone Health: या चुकांमुळे तारुण्यातच कमकुवत होतात हाडं, आजच व्हा सावध

साखर आणि यीस्ट

साखर पाणी आणि यीस्ट यांचं मिश्रण डासांना पळवून लावण्यासाठी सर्वोत्तम असतं. एक प्लास्टिकची बाटली घेऊन ती अर्ध्यातून कापा. त्यातील खालच्या भागात गरम पाणी होता आणि साखर मिसळा. जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा त्यात यीस्ट घाला. बाटलीचा वरचा भाग खालच्या भागावर उपडा ठेवा. बाटलीचं झाकण उघड ठेवायला विसरू नका. यामुळे डास आपोआप येऊन या पाण्यात पडू लागतील.

डिस्क्लेमर : सामान्यज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या या काही टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही प्रश्न अथवा शंका असतील, तर तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी