Smoking Addiction : स्मोकिंगचं व्यसन सहज सुटेल, रोजच्या आहारात खा या पाच गोष्टी

स्मोकिंग सोडण्याची इच्छा असेल तर आहारात केलेले काही बदल फायद्याचे ठरू शकतात. या घरगुती उपायांमुळे धुम्रपानाच्या सवयीतून बाहेर पडण्याचा प्रवास सोपा होऊ शकतो.

Smoking Addiction
या गोष्टींमुळे सहज सुटेल स्मोकिंगचं व्यसन   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • स्मोकिंगची सवय सोडण्यासाठी घरगुती उपाय
  • आहारात करा काही गोष्टींचा समावेश
  • काही दिवसांतच सुटेल व्यसन

Smoking Addiction | स्मोकिंग आरोग्यासाठी किती हानीकारक आहे, हे सर्वांनाच माहित असतं. धुम्रपानामुळे आरोग्यावर काय आणि कसे विपरित परिणाम होतात, याच्या जाहीराती जवळपास सर्व माध्ममातून सामान्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. शिवाय सिगरेटच्या पाकिटावरही धुम्रपान करणं किती घातक आहे, याची सूचना दिलेली असते. मात्र तरीही अनेकांचं व्यसन सुटता सुटत नाही. अनेकजण व्यसन सोडण्याचा निर्धार करतात, मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहू शकत नाहीत. काही दिवसांनंतर पुन्हा त्यांना सिगरेट ओढण्याची तलफ येते आणि पूर्वीप्रमाणेच ते व्यसनाधीन होतात. मात्र हे स्मोकिंगचं व्यसन सुटणं सहज शक्य आहे. त्यासाठी योग्य ते उपाय योग्य प्रकारे केले, तर या व्यसनातून व्यक्तीची सुटका होऊ शकते, हे अनेकदा दिसून आलं आहे. जाणून घेऊया, अशाच काही उपायांबाबत.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्यांचा समावेश रोजच्या आहारात करणं, हा स्मोकिंगची सवय सोडण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय आहे. हिरव्या भाज्यांमध्ये कॅरोटिनॉईड्स नावाचा घटक असतो. यामुळे कॅन्सरपासून बचाव व्हायला मदत होते. त्याचप्रमाणं धुम्रपानाच्या सवयीपासून परावृत्त करायलाही हिरव्या भाज्यांचा उपयोग होतो. 

व्हिटॅमिन सी

आहारात सी जीवनसत्त्वाचा वापर करायला सुरुवात केली, तर धुम्रपानाच्या सवयीतून पटकन सुटका होऊ शकते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढायला मदत होते. व्हिटॅमिन सी मिळण्यासाठी आहारात संत्री, लिंबू किंवा ब्रोकलीचा दैनंदिन वापर करणं गरजेचं आहे. 

ग्रीन टी

धुम्रपानामुळे शरीराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. ते भरून काढून शरीर डीटॉक्स करणं गरजेचं असतं. त्यासाठी ग्रीन टी चा वापर उपयुक्त ठरतो. ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात, जे शरीर डीटॉक्स करण्यासाठी फायद्याचे ठरतात. त्याचप्रमाणं ग्रीन टी पीत राहिल्यामुळे स्मोकिंगची तलफ येण्याचं प्रमाण कमी होतं. 

अधिक वाचा -  Fitness Tips : फीट राहण्यासाठी दिवसातून 8 किलोमीटर चालणं आहे फायदेशीर

सूर्यफुलाच्या बिया

धुम्रपानाच्या सवयीतून मुक्तता करून घेण्यासाठी सूर्यफुलांच्या बियांचा उपयोग होतो. सूर्यफुलाच्या बियांमुळे शरीरात डी जीवनसत्त्वाचं प्रमाण वाढतं आणि स्मोकिंगची सवय सुटायला त्याचा उपयोग होतो. 

अधिक वाचा - Cracked Heels Care: या घरगुती उपायांनी टाचांना पडलेल्या भेगा भरून निघतील, या पद्धतींचा वापरा करा.

इच्छाशक्ती

अर्थात, ज्या व्यक्तीला धुम्रपानाची सवय सोडण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हे उपाय असल्याचं सांगितलं जातं. व्यक्ती जर मनापासून धुम्रपानाची सवय सोडायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला हे उपाय मदतीचे ठरू शकतात. मात्र जर तशी इच्छाच नसेल, तर या उपायांचा कितपत फायदा होईल, याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. 

अर्थात, हे सगळे घरगुती आणि कुठलाही गंभीर आजार नसताना करावयाचे उपाय आहेत. जर तुम्हाला स्मोकिंगची सवय असेल आणि त्याचे काही दुष्परिणाम दिसायला सुुरुवात झाली असेल, तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी