Saffron reality check: केशर अस्सल आहे की बनावट? असा ओळखा फरक

केशराचे अनेक औषधी गुणधर्म आणि बाजारातील त्याची किंमत यामुळे अनेकदा नकली केशर बाजारात विकले जाण्याची शक्यता असते. आपली ही फसवणूक टाळण्यासाठी सजग राहणे आवश्यक आहे. अस्सल केशर कुठले आणि नकली केसर कुठले, यातील फरक समजण्यासाठी काही सोपे उपाय करता येतात.

Saffron reality check
केशर अस्सल आहे की बनावट?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • केशरात असतात अनेक औषधी गुण
  • अनेकदा बनावट केशर येते बाजारात
  • सोप्या उपायांनी ओळखता येते बनावट केशर

Saffron reality check: केशर हा असा एक औषधी पदार्थ आहे, ज्यातील गुणांमुळे (Qualities of saffron) अनेक गंभीर आजार बरे होऊ शकतात. केशरात असणारे अँटि-इन्फ्लमेटरी, अँटि-अल्जायमर, अँटिकॉनवल्सेट आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म त्याला खास बनवतात. याचा उपयोग शरीरातील कफ बाहेर काढणे, भूक वाढवणे, पचनक्रिया सुधारणे, हिरड्यांच्या समस्या दूर करणे अशा अनेक कारणांसाठी करण्यात येतो. अनेकजण रात्रीच्या वेळी दूधात केशर घालून पिणं पसंत करतात. त्यामुळे झोपेचा दर्जा सुधारतो आणि कमी वेळेत अधिक गाढ झोप झाल्याचा अनुभव येतो. केशराचे अनेक औषधी गुणधर्म आणि बाजारातील त्याची किंमत यामुळे अनेकदा नकली केशर बाजारात विकले जाण्याची शक्यता असते. आपली ही फसवणूक टाळण्यासाठी सजग राहणे आवश्यक आहे. अस्सल केशर कुठले आणि नकली केसर कुठले, यातील फरक समजण्यासाठी काही सोपे उपाय करता येतात.

पाण्यात घालून तपासा

बाजारातून केशर विकत घेतल्यानंतर त्याची पाण्यात घालून तपासणी करावी. जर त्या केशराचा रंग लगेच पाण्यात मिसळला, तर ते बनावटी केशर आहे, हे सिद्ध होईल. असं झालं तर लगेच ते केशर दुकानदाराला परत करा.

तोंडाने घ्या अनुभव

केशराचा अस्सलपणा तपासण्याचा आणखी एक उत्तम उपाय आहे. केशर तोंडात ठेवा आणि 15 ते 20 मिनिटे वाट पहा. तुम्हाला तुमच्या डोक्यात गरमपणा जाणवायला सुरुवात होईल. हा अनुभव तुम्हाला आला, तर ते केशर अस्सल असल्याची खात्री बाळगा.

अधिक वाचा - Bone Health: या चुकांमुळे तारुण्यातच कमकुवत होतात हाडं, आजच व्हा सावध

चवीवरूनही पटते ओळख

केशर अस्सल आहे की नकली आहे हे ओळखण्याचा आणखी एक उपाय म्हणजे त्याची चव घेणे. थोडेसे केशर तुमच्या जिभेवर ठेवा आणि त्याची चव घ्या. जर ते चवीला गोड लागले आणि लगेच त्याचा रंग तुमच्या जिभेवर चढला, तर ते बनावट केशर आहे, हे सिद्ध होईल.

रंगाची परीक्षा

केशराची परीक्षा करण्यासाठी एक कप पाणी घ्या. त्यात बेकिंग सोडा टाका आणि केशर घाला. जर या मिश्रणाला नारिंगी रंग आला, तर तुम्ही आणलेले केशर बनावट असल्याचे सिद्ध होते. केशर अस्सल असेल तर या मिश्रणाला पिवळा रंग यायला हवा.

अधिक वाचा - Fatty Liver: फॅटी लिव्हर फक्त दारू प्यायल्याने होत नाही...या 6 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

हातांनी करा परीक्षा

हातांनीही केशराची परीक्षा करता येऊ शकते. केशर हातात घेऊन दोन बोटांनी ते जोरात दाबा. जर ते तुटले तर ते अस्सल केशर आहे. त्यावर काहीच परिणाम झाला नाही, तर मात्र ते नकली असण्याची शक्यता आहे.

विरघळण्याची परीक्षा

केशर गरम पाणी किंवा दुधात सहज विरघळते. जर ते तसे विरघळत नसेल, तर केशर बनावट असल्याचे सिद्ध होईल.

डिस्क्लेमर: सामान्यज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या या काही टिप्स आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी