Fitness without exercise: व्यायाम न करताही वजन कमी करायचंय? ‘या’ उपायांनी सहज होईल शक्य

वजन कमी करण्यासाठी साधारणतः व्यायाम करण्याचा पर्याय सुचवला जातो. मात्र अनेकांना जिममध्ये जाऊन घाम गाळणं हे बोअरिंग आणि निरर्थक वाटत असतं. अशा व्यक्ती काही सोप्या उपायांनी आपलं वजन नियंत्रणात ठेवू शकतात.

Fitness without exercise
व्यायाम न करताही वजन कमी करायचंय?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अनेकांना असतो व्यायाम करण्याचा कंटाळा
  • जिमला न जाताही कमी करता येऊ शकते वजन
  • लाईफस्टाईलमध्ये केलेले छोटे छोटे बदल घडवतात मोठा बदल

Fitness without exercise: भारतात गेल्या काही वर्षात लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढत चालली आहे. चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा, अपुरी झोप यासारख्या अनेक कारणांमुळे लोकांच्या वजनात वाढ होत चालली असून अनेकांना पोटाभोवती आणि कंबरेभोवती चरबी जमा झाल्याची समस्या सतावते आहे. सुटलेलं पोट आणि कंबरेभोवती वाढलेली चरबी या गोष्टी प्रत्येकाला बेढब बनवतात. अशा अवस्थेत आपले नेहमीचे कपडेही आपल्याला बसत नाहीत आणि आरशात पाहण्याचीदेखील लाज वाटू शकते. काहीही करून आपलं वजन कमी करण्याची गरज निर्माण झालेली असते. त्यासाठी साधारणतः व्यायाम करण्याचा पर्याय सुचवला जातो. मात्र अनेकांना जिममध्ये जाऊन घाम गाळणं (Exercise) हे बोअरिंग आणि निरर्थक वाटत असतं. अशा व्यक्ती काही सोप्या उपायांनी आपलं वजन नियंत्रणात (Weight control) ठेवू शकतात. व्यायामासाठी वेगळा वेळ न काढता आपल्या दैनंदिन आयुष्यात काही बदल केले, तरीदेखील वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. 

जिन्यांचा वापर

विज्ञानाच्या प्रगतीमुळे आजकाल बहुतांश इमारतींमध्ये लिफ्टची सोय करण्यात आलेली असते. घर असो किंवा ऑफिस असो. जवळपास प्रत्येक ठिकाणी लिफ्ट असते. त्यामुळे एक किंवा दोन मजले चढण्यासाठीदेखील अनेकजण लिफ्टचा उपयोग करताना दिसतात. लिफ्टमुळे आपलं आयुष्य सोपं झालं असलं, तरीदेखील त्याचा फिटनेसवर मात्र विपरित परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. तुम्ही तुमच्या घरी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी लिफ्टचा वापर न करण्याचा संकल्प करू शकता. त्याऐवजी प्रत्येक ठिकाणी पायऱ्यांचा उपयोग करण्याचा निर्णय तुम्ही घेतला, तर त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होऊ शकतो. 

अधिक वाचा - Habits for flat stomach: ब्रेकफास्टमध्ये करा ‘हे’ पाच बदल, पोट होईल एकदम सपाट

सायकल चालवणे

काही लोकांना ट्रेडमिलवर चालायला आवडत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, जी त्यांना मान्य नसते. त्याऐवजी तुम्ही मोकळ्या हवेत सायकल चालवण्याचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या शरीरातील फॅट्स हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे तुमच्या हृदयावरही त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचं तुम्हाला दिसेल. 

मैदानी खेळ

जर तुम्हाला धावण्याचा व्यायाम आवडत नसेल, तर तुम्ही मैदानी खेळांचा आनंद घेऊ शकता. बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल यासारखे खेळ खेळल्यामुळेही तुमचं वजन पटापट कमी व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे तुमचं शरीरही लवचिक होईल आणि शरीरातील कॅलरीज अधिक वेगाने जाळल्या जातील. 

अधिक वाचा - Mouth Odor: तोंडाला दुर्गंधी येते? हे तीन अवयव असतात कारण, वाचा सविस्तर

लाईफस्टाईलमध्ये सुधारणा

आपल्या लाईफस्टाईलमध्ये योग्य ते बदल करणे आणि आपला दिनक्रम निसर्गचक्राशी जुळवून घेणे, हादेखील वजन कमी करण्याचा एक उत्तम उपाय मानला जातो. पौष्टिक आहार घेणे, रात्रीच्या वेळी पुरेशी झोप घेणे आणि सकारात्मक विचार करणे या बाबींचा वजन कमी करण्यात मोठा वाटा असतो. 

डिस्क्लेमर - वजन कमी करण्यासाठीच्या सामान्यज्ञानावर आधारित या काही टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न वा समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी