Weight loss: दिवाळीत दिसायचे फिट आणि सुंदर, तर वाढलेले वजन असे करा कमी

तब्येत पाणी
Updated Oct 28, 2020 | 13:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

slim and fit: दिवाळी सणाला प्रत्येकाला सुंदर सुंदर कपडे घालून मिरवायचे असते. अशातच कोणालाही वाटणार नाही त्याच्या शरीरावरील एक्स्ट्रा फॅटमुळे त्यांचे शरीर बेढब दिसावे. 

weight loss
दिवाळीत दिसायचे फिट आणि सुंदर, तर वाढलेले वजन असे करा कमी 

थोडं पण कामाचं

  • आम्ही तुम्हाला काही डिटॉक्स प्लान सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या शरीरावरील एक्स्ट्रा चरबी कमी होईल.
  • आपल्या जेवणात नेहमी सलाडचा समावेश करा.
  • आपल्या रोजच्या जेवणात काही अंडी, हिरव्या भाज्या आणि मच्छीचा समावेश करा. 

मुंबई: अवघ्या पंधरा दिवसांवर दिवाळी(diwali 2020) आली आहे. सणसमारंभ म्हणजे कुटुंबासोबत मजामस्ती करण्याचे आणि पोटभरून स्वादिष्ट गोडधोड पदार्थ खाण्याचे दिवस. मात्र सणांमध्ये ही मस्ती तसेच कमी झोप(lack of sleep) आणि एक्सरसाईजला(exercise) कानाडोळा केल्याने त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर दिसू शकतात. तसेच आठ महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये  अनेक लोकांचे वजन(weight gain) किलोनी वाढले आहे. 

दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. त्यातच तुमची फिगर मेंटेन(figure maintain) असेल तर तुम्हाला घातलेले कपडे छानच दिसतील. मात्र तुमचे शरीर जर एक्स्ट्रा फॅटमुळे बेढब दिसत असेल तर सणांची मजा कमी होऊन जाते. यासाठी आम्ही तुम्हाला काही डिटॉक्स प्लान सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या शरीरावरील एक्स्ट्रा चरबी कमी होईल. तसेच २० दिवसांत तुम्ही तुमची फिगर मेंटेन करू शकाल. 

सकाळचे ड्रिंक

आपल्या दिवसाची सुरूवात एक ग्लास गरम पाणी आणि लिंबूच्या रसासोबत करा. हे गरम पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. तसेच मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होईल. तुम्ही हे ड्रिंक अधिक चवदार करण्यासाठी यात मध मिसळू शकता. 

अति खाणे नको

तुम्ही किती खात आहात यावर तुमचे लक्ष नसेल तर छोट्या प्लेटमध्ये खाण्यास सुरूवात करा. यामुळे अति खाणे होणार नाही तसचे अतिरिक्त कॅलरीचे सेवन करण्यापासून स्वत:चा बचाव करू शकता. सर्व पदार्थांचा आनंद घ्या मात्र लक्षात ठेवा की जंक फूड आणि गोड खाणे टाळा. 

सलाडला आपल्या डाएटमध्ये जरूर करा सामील

आपल्या जेवणात नेहमी सलाडचा समावेश करा. खासकरून जेव्हा तुम्ही ऑईली खात आहात तेव्हा सलाड जरूर खा. सलाड खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.सलाडमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त वजन घटवण्यास मदत होते.

प्रोटीन डाएटचा समावेश

आपल्याला साऱ्यांनाच माहीत आहे की शरीरासाठी प्रोटीन सगळ्यात जास्त पोषणतत्वांपैकी एक आहे दिवाळीआधी वजन कमी करायचे असल्यास आपल्या रोजच्या जेवणात काही अंडी, हिरव्या भाज्या आणि मच्छीचा समावेश करा. 

भरपूर पाणी प्या

आपले शरीर नेहमी हायड्रेट राहिले पाहिजे. पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच अधिक खाणेही होत नाही. दिवसाला १० ते १२ ग्लास पाणी प्यायले पाहिजे. 

फळे खा 

फळांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. ज्यांना गोड खाण्याची सतत इच्छा होते अशा व्यक्तींनी फळांचे सेवन करावे. 

एक्सरसाईज करा

दिवसातून एक तास काढून जरूर व्यायाम करा. व्यायाम केल्याने शरीरात उर्जा टिकून राहते. तसेच शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी