वजन घटवण्याचा सोपा फॉर्म्युला, पोटभर नाश्ता आणि हलके जेवण

तब्येत पाणी
Updated Oct 26, 2020 | 18:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

वजन घटवण्यासाठी नेहमी एक हेल्दी सवय लावली पाहिजे. तुम्हाला पोटभर नाश्ता आणि हलक्याजेवणासोबत नियमितपणे एक्सरसाईज केली पाहिजे. 

fat
वजन घटवण्याचा सोपा फॉर्म्युला, पोटभर नाश्ता आणि हलके जेवण 

थोडं पण कामाचं

  • पोटभर नाश्ता आणि हलके जेवण घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 
  • स्वस्थ राहण्यासाठी हेल्दी डाएट आणि नियमित एक्सरसाईज करणे हा चांगला पर्याय आहे.
  • तुम्ही जर वजन कमी करत आहात कर तुमच्यासाठी सलाड हा उत्तम पर्याय आहे.

मुंबई: सकाळचा नाश्ता राजाप्रमाणे, दुपारचे जेवण हे सामान्य माणसाप्रमाणे  आणि रात्रीचे जेवण गरिबाच्या जेवणासारखे करावे. ही म्हण साऱ्यांनीच ऐकली असेल. जेव्हा वजन घटवण्याची वेळ येते तेव्ही ही म्हण अनेकदा खरी ठरते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी केवळ एक्सरसाईज नव्हे तर चांगले डाएट असणेही महत्त्वाचे असते. 

नुकत्याच झालेल्या जर्नल ओबेसिटीमध्ये प्रसिद्ध झालेल्या स्टडीनुसार, वेगाने वजन कमी कऱण्यासाठी ही पद्धत वापरली पाहिजे. याचाच अर्थ पोटभर नाश्ता आणि हलके जेवण घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 

असा केला होता स्टडी

स्टडीसाठी ९३ लठ्ठ महिलांना बारा आठवड्यांसाठी १४०० कॅलरीज देण्यात आल्या. यानंतर या स्पर्धकांना दोन गटात विभागण्यात आले. अर्ध्या ग्रुपला ७०० कॅलरी ब्रेकफास्ट, ५०० कॅलरी लंच आणि २०० कॅलरी डिनरमध्ये देण्यात आल्या. तर दुसऱ्या ग्रुपला याच्या उलट करण्यात आले. म्हणजेच २०० कॅलरी ब्रेकफास्ट, ५०० कॅलरी लंच आणि ७०० कॅलरी डिनरमध्ये देण्यात आल्या. 

रिझल्ट 

या दरम्यान दोन्ही ग्रुपचे वजन कमी झाले. ज्यांनी पोटभर नाश्ता केला होता त्याने वजन मोठ्या प्रमाणात घटले. यासोबतच हेवी डिनर करणाऱ्यांच्या तुलनेतने यांच्या कमरेची चरबी वेगाने कमी झाली. 

अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी हेल्दी डाएट आणि नियमित एक्सरसाईज करणे हा चांगला पर्याय आहे. आपल्या जेवणात मोठ्या प्रमाणात फळे तसेच हिरव्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. मात्र भोजन न करणे हा वजन घटवण्यासाठी चांगला पर्याय असू शकत नाही. असे करून तुम्ही वजन कमी करत नाही तर वजन वाढवता. 

लोक वजन कमी करण्यासाठी रनिंग आणि हेवी वर्कआऊट करतात. मात्र असे करू नये. तुम्ही सकाळच्या वेळेस अथवा वेळ मिळेल तेव्हा वॉक करू शकता.तुम्ही सोशल मीडियाचा वापर वजन घटवण्यासाठी करू शकता. फिटनेससंबंधित पोस्ट वाचा. फिटनेस फ्रीक लोकांना फॉलो करा. तुम्ही जर वजन कमी करत आहात कर तुमच्यासाठी सलाड हा उत्तम पर्याय आहे. भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला भूक लागत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी