मुंबई: वजन कमी कऱण्यासाठी(weight loss) अनेकदा असे सांगितले जाते की आपल्या डाएटमधून(diet) भात(rice) पूर्णपणे हटवला पाहिजे. कारण यात मोठ्या प्रमाणात स्टार्च(starch) असते तसेच कॅलरीजही(calories) असतात. मात्र बऱ्याच लोकांना भात खायला आवडतो. त्यामुळे बरेच प्रयत्न करूनही ते भाताला आपल्या जेवणातून हटवू शकत नाहीत.त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करत आहात आणि भात खाणे सोडणे तुम्हाला शक्य नाही तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला खास टिप्स देत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही भात खाऊनही तुमचे वजन नियंत्रणात ठेवू शकता. जाणून घ्या कसे ते
वजन कमी करण्याचा सगळ्यात पहिला नियम म्हणजे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी केले पाहिजे. याचा अर्थ तुम्ही दिवसभरात जितक्या कॅलरीज घेतात त्यापेक्षा अधिक तुम्हाला बर्न करावे लागतील. यासाठी वजन कमी करणाऱ्या डाएटमध्ये नेहमी कॅलरीजचे प्रमाण कमी असते. मात्र तुम्हाला भात पूर्णपणे वगळण्याची गरज नाही.
जर तुम्हाला भात खाऊन आपले वजन कमी करायचे आहे तर या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिे की तुम्ही कधी आणि किती भात खाता. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला केवळ एकाच वेळेस एक वाटी भात खाल्ला पाहिजे. असे केल्याने कॅलरीजचे प्रमाणही कमी होईल. तसेच भातामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे आपल्या खाण्याच्या दुसऱ्या पदार्थांमधून कार्बोहायड्रेटचे सेवन करू नका.
भात खाल्ल्यानंतर तुम्हाला लवकर भूक लागते. यासाठी तुम्ही भात तुमच्या आवडत्या भाजीसोबत खाऊ शकता. भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते. ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले राहते. तसेच अधिक खाल्लेही जात नाही.
जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर भात कधीही फ्राय करून अथवा क्रीमसोबत मिक्स करून बनवू नका. केवळ शिजवून खा..
योग्य आणि लवकर वजन कमी करण्यासाठी डाएटसोबत नियमितपणे व्यायाम करणेही तितकेच गरजेचे असते. केवळ डाएट फॉलो अथवा केवळ व्यायाम केल्याने वजन कमी होणार नाही. तर कमी वेळात जास्त वजन कमी करायचे असल्यास चांगले डाएट आणि व्यायामाची गरज आहे.