Navratri 2020: नवरात्रीत उपवास करून असे घटवा वजन

तब्येत पाणी
Updated Oct 19, 2020 | 18:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss in navratri: नवरात्रीत अनेक लोक वेट लॉसची जर्नी करतात. मात्र अनेकदा न विचार करता खाल्ल्याने त्याचा परिणाम वजनावर होतो. यातच या टिप्स तुमच्या कामी येतील. 

navratri fast
Navratri 2020: नवरात्रीत उपवास करून असे घटवा वजन 

थोडं पण कामाचं

  • आपल्या शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते
  • वजन कमी कऱण्यासाठी उपवास हा उत्तम पर्याय आहे.
  • उपवासादरम्यान अधिक कॉफी अथवा चहा पिऊ नका.

मुंबई: नवरात्रीचा(navratri 2020) हा सण महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक मानला जातो. ९ दिवस चालणाऱ्या या सणात अनेक लोक आपले शरीर डिटॉक्स(detox) करण्यासाठी नऊ दिवसांचा उपवास(9 days fast) करतात. मात्र अनेकदा उपवासादरम्यान चुकीचे खाल्ले गेल्याने वजन कमी होण्याच्या ऐवजी वाढते. यासाठी तुम्हाला जर नवरात्रीचा संपूर्ण फायदा उचलायचा असेल तर आपला डाएट प्लान(diet plan) योग्य बनवा. तसेच त्याचे पालन करा. कारण वजन कमी कऱण्यासाठी उपवास हा उत्तम पर्याय आहे. यासाठी नवरात्रीसाठी खास टिप्स देण्यात आल्या आहेत.

डाएट चार्ट तयार करा

जर तुम्ही डाएटवर आहात तर सर्वात आधी तुमचा जेवणाचा प्लान आखा. यात तुम्ही तळलेले, भाजलेले पदार्थ खाणे टाळा. तसेच जर तुम्ही संपूर्ण ९ दिवसांचा डाएट प्लान एकत्र बनवू शकत नसाल तर दुसऱ्या दिवसासाठीचा प्लान आदल्या दिवशी बनवा. आपल्या रोजच्या जेवणात कार्ब, प्रोटीन, फॅट तसेच फायबरसारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश असू द्या. 

थोडे थोडे खा

दररोज तीन वेळेस जेवण्यापेक्षा दर दोन तासांनी थोडे थोडे खा. यामुळे शरीराचे मेटाबॉलिज्म ठीक राहण्यास मदत होईल. तसेच अंगात एनर्जीही राहील. तसेच ग्लुकोजचा स्तरही कायम राहील. 

शरीरात पाण्याची कमतरता नको

आपल्या शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते. केवळ साधे पाणीच नव्हे तर स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळपाणी, ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी आणि भाज्यांचा रसही सेवन करा. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल. 

योग्य स्नॅक्सची निवड

उपवासादरम्यान अनेक लोक नको ते खाणे खातात. यामुळे वजन पटकन वाढते. जसे तेलात तळलेल्या पुऱ्या, उपवासाची भजी, चिप्स आणि प्रोसेस्ड ज्यूस यांचे सेवन करतात. मात्र अशा जेवणाची निवड करू नका. हे खाणे तुमच्या शरीरास नुकसान पोहोचवू शकते. तसेच हे तुमच्या चांगल्या आरोग्याच्या विरुद्ध आहे. यापेक्षा साबुदाणा खिचडी, भेळ, मखाणे तसेच चण्याचे सेवन करा. 

चहा तसेच कॉफीचे सेवन कमी करा

उपवासादरम्यान अधिक कॉफी अथवा चहा पिऊ नका. कारण कॅफेन प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. तसेच रिकाम्या पोटी चहा अथवा कॉफीचे सेवन केल्यास अॅसिडिटीचीही समस्या निर्माण होऊ शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी