Belly Fat: लाख प्रयत्न करूनही पोटाचा घेर कमी होत नाही? कारण तुम्ही 'या' चूका करत आहात

तब्येत पाणी
Updated Mar 24, 2023 | 20:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

How to Lose Belly Fat: बदलत्या ऑफीस वर्कमुळे आपल्या शरिराचेही आकार बदलत जातात. मुलगा असो वा मुलगी 8 ते 12 तास बसून काम करत असल्याने त्यांचे पोट सुटायला लागते. बराच वेळ खुर्चीवर बसून काम केल्यामुळे अनेकांचे पोट बाहेर येते.

लाख प्रयत्न करूनही पोटाची चरबी कमी होत नाही
Ways to lose Lower belly fat  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लाख प्रयत्न करूनही पोटाची चरबी कमी होत नाही
  • चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे
  • दिवसभरात पुरेसे पाणी पित नसाल तर

Ways to lose Lower belly fat: बदलत्या ऑफीस वर्कमुळे आपल्या शरिराचेही आकार बदलत जातात.  मुलगा असो वा मुलगी 8 ते 12 तास बसून काम करत असल्याने त्यांचे पोट सुटायला लागते. बराच वेळ खुर्चीवर बसून काम केल्यामुळे अनेकांचे पोट बाहेर येते. अशा वेळी तुम्ही लाख प्रयत्न करूनही जर तुमचे पोट आत जाण्याचे नाव घेत नसेल तर त्यामागे अनेक कारणं काही तरी वेगळे असू शकतात. काही गोष्टी तुमच्या स्वतःच्या चुकांमुळेही घडू शकतात. म्हाणून आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाची कारणं सांगणार आहोत ज्यांमुळे तुमच्या पोटाची चरबी प्रयत्न करूनही कमी होत नाही. 

पुरेशी झोप न मिळणे

पोटाची चरबी कमी न होण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्हाला पुरेशी झोप न मिळणे हे असू शकते. जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा लेप्टिन नावाच्या हार्मोन्सचा शरीरावर परिणाम होतो. असे होऊ शकते की तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागे राहता, ज्यामुळे या हार्मोन्सची पातळी वाढते आणि तुम्हाला भूक लागते. आणि ही भूक भागवण्यासाठी आपण आवश्यकतेपेक्षा जास्त खातो आणि आपले वजन वाढत जाते.

अधिक वाचा: Weight Loss Diet: नवरात्रीच्या उपवासातील 4 पदार्थ जे वजन कमी करण्यासाठी करतील सहाय्य 

चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे

कदाचित तुम्ही तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी योग्य प्रकारचे व्यायाम करत नसाल. पोट कमी करण्यासाठी HIIT (हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग) करण्याची गरज आहे पण असे करत असताना कोणत्याही एकाच प्रकारचा व्यायम करू नये. संपूर्ण शरीरातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी ट्रेडमिल आणि स्क्वॅट्स सारख्या व्यायाम पद्धतींनी पोटाची चरबी कमी केली जाऊ शकते.

अधिक वाचा: Ghee For Glowing Skin: रोज एक चमचा देसी तूप चमकदार त्वचेसाठी फायदेशीर, या टिप्स करा फॉलो

चालणे देखील खूप महत्वाचे 

व्यायामाव्यतिरिक्त चालणे देखील खूप महत्वाचे आहे. आपण दिवसभर सक्रिय असणे आवश्यक आहे. तुम्ही जितके जास्त सक्रिय असाल, तितक्या लवकर तुमच्या पोटाचा आकार कमी होईल. याशिवाय जर तुम्ही डेस्क जॉब करत असाल तर तुम्हाला नॉर्मल चालणे कंपलसरी आहे. बऱ्याच लोकांना असे वाटते की अधिक शारीरिक हालचालींमुळे जास्त भूक आणि वजन वाढते म्हणून ते हालचाली कमी करतात. ऑफिस असो वा घर एकाच ठिकाणी बसून काम करतात.

अधिक वाचा: Weight Loss Diet tips: वर्कआउट करूनही वजन कमी होत नसेल तर या नैसर्गिक टिप्स फॉलो करा

कमी पाणी पिणे

तुम्ही दिवसभरात पुरेसे पाणी पित नसाल तर तुम्ही नेहमीपेक्षा जास्त खायला लागता. अशा वेळी तुमच्या पोटाची चरबी आणि वजन दोन्ही वाढते. अनेकांना असे वाटते की पाणी कमी प्यायल्याने पोट सडपातळ दिसेल किंवा वजन कमी होईल. तर असे नाही, शरीरातील कमी पाण्याचे प्रमाण तुमची भूक वाढू शकते. म्हणून उन्हाळ्यात खाण्यापेक्षा पाणी जास्त पिण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देत असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी