आपल्या 'बॉडी टाइप'नुसार झटपट वजन कमी करण्याचे सोपे उपाय

How To Lose Weight According To Your Body Type Easily : आपल्या 'बॉडी टाइप'नुसार झटपट वजन कमी करण्याचे सोपे उपाय...

How To Lose Weight According To Your Body Type Easily
आपल्या 'बॉडी टाइप'नुसार झटपट वजन कमी करण्याचे सोपे उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आपल्या 'बॉडी टाइप'नुसार झटपट वजन कमी करण्याचे सोपे उपाय
  • जगात तीन प्रमुख 'बॉडी टाइप' आहेत
  • एंडोमोर्फ, मेसोमोर्फ आणि अॅक्टोमोर्फ अशी तीन 'बॉडी टाइप'ची नावं

How To Lose Weight According To Your Body Type Easily : देवाने निर्माण केलेले जग आणि या जगातील प्रत्येक गोष्ट ही सुंदर आणि इतरांपेक्षा वेगळे सामर्थ्य आणि वैशिष्ट्य यांनी बनलेली आहे. माणूस हा या जगाचाच एक भाग आहे. प्रत्येक माणसाच्या शरीराची ठेवण इतरांपेक्षा वेगळी असते तरी ढोबळमानाने माणसांच्या शरीराच्या ठेवणीचे तज्ज्ञांनी काही गटांमध्ये वर्गीकरण केले आहे. आपल्या शरीराची ठेवण अर्थात 'बॉडी टाइप' समजून घेऊन त्या 'बॉडी टाइप'साठी योग्य अशा पद्धतीने वजन कमी करणे हिताचे असते. चल तर मग आज जाणून घेऊ आपल्या 'बॉडी टाइप'नुसार झटपट वजन कमी करण्याचे सोपे उपाय... । तब्येत पाणी

तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे ८ सोपे उपाय

रात्री झोप येत नाही मग करा ही सोपी कृती

Belly Fat कमी करण्यासाठी घरातील या चार गोष्टी करतील मदत

डॉक्टर डब्ल्यू. एच. शेल्डन यांनी १९४० मध्ये 'बॉडी टाइप' या विषयातील त्यांचे संशोधन जगापुढे सादर केले. डॉक्टर शेल्डन यांच्या म्हणण्यानुसार जगात तीन प्रमुख 'बॉडी टाइप' आहेत. एंडोमोर्फ, मेसोमोर्फ आणि अॅक्टोमोर्फ अशी या तीन 'बॉडी टाइप'ची नावं आहेत.

  1. एंडोमोर्फ बॉडी टाइप : शरीरात चरबीचे प्रमाण जास्त. झटपट वजन वाढते. 
  2. मेसोमोर्फ बॉडी टाइप : वजन वाढविणे आणि कमी करणे या माणसांसाठी अतिशय सोपे असते. स्नायू लवचिक असतात.
  3. अॅक्टोमोर्फ बॉडी टाइप : स्नायू लवचिक नसतात. हाडांचा आकार सामान्यांपेक्षा लहान असतो. अनेकदा ताडमाड उंचीचे आणि बारीक चणीचे असतात. यांचे वजन वेगाने वाढत नाही. 

  1. वजन कमी करण्यासाठी एंडोमोर्फ बॉडी टाइपच्या नागरिकांनी काय करावे? : वजन कमी करण्यासाठी एंडोमोर्फ बॉडी टाइपच्या नागरिकांनी पचनक्षमता सुधारण्यावर भर द्यावा. दररोज पोट साफ व्हावे यासाठी आवश्यकता भासल्यास औषधे घ्यावीत. ताजी फळे, जास्तीत जास्त प्रथिनांचे अर्थात प्रोटिन्सचे सेवन करावे. तांदूळ (भात आदी) तसेच इतर कार्ब्स जास्त असलेले पदार्थ खाणे टाळावे. मीठ आणि मसाले यांचे सेवन नियंत्रित करावे. दररोज व्यायाम करावा आणि नियमितपणे व्यायामाची तीव्रता वाढवत जावी. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी व्यायाम करण्यावर भर द्यावा.

  2. वजन कमी करण्यासाठी मेसोमोर्फ बॉडी टाइपच्या नागरिकांनी काय करावे? : प्रामुख्याने या गटात खेळाडू, नियमित व्यायाम करणारे तसेच कामांच्या निमित्ताने नकळत भरपूर व्यायाम होणारे या मंडळींचा समावेश होतो. या मंडळींनी स्नायूंच्या बळकटीकरणावर भर देणारे व्यायाम करावे. हाय प्रोटिन्स पुरविणारे पदार्थ खावे. मर्यादीत प्रमाणात हाय कार्ब्स आणि हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ खावे.

  3. वजन कमी करण्यासाठी अॅक्टोमोर्फ बॉडी टाइपच्या नागरिकांनी काय करावे? : या नागरिकांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहार आणि व्यायाम यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. जास्त हेल्दी कार्ब्स ही मंडळी सहज खाऊ आणि पचवू शकतात. या मंडळींनी प्रोटिन्स मर्यादीत प्रमाणात खाणे आवश्यक आहे. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी व्यायाम करण्यावर भर द्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी