Weight Loss: दिवाळीत मिठाई खाऊन वजन वाढलं, मग फॉलो करा हा डाएट प्लान 

दिवाळी (Diwali) मध्ये खूप साऱ्या मिठाई खाल्ल्यानंतर का तुमचं वजन वाढलं असेल तर काळजी करण्याची काही गरज नाही. येथे जाणून घ्या (Weight loss) वजन कमी करण्याचे काही सोपे मार्ग.

weight loss tips
Weight Loss: दिवाळीत मिठाई खाऊन वजन वाढलं, मग फॉलो करा हा डाएट प्लान  

थोडं पण कामाचं

 • वजन तर खूप पटकन वाढतं, मात्र वाढलेलं वजन कमी करणं सोपं नसतं.
 • खासकरून मिठाई खाल्ल्यानंतर वजन इतक्या झटकन वाढतं की, त्याचा अंदाजही तुम्ही लावू शकत नाही.
 • जेव्हा तुम्हाला तुमचे कपडे फिट होण्यास सुरूवात होते तेव्हा तुम्हाला अंदाज येतो की, तुमचं वजन वाढलं आहे.

Weight loss tips: वजन तर खूप पटकन वाढतं, मात्र वाढलेलं वजन कमी करणं सोपं नसतं. खासकरून मिठाई खाल्ल्यानंतर वजन इतक्या झटकन वाढतं की, त्याचा अंदाजही तुम्ही लावू शकत नाही. जेव्हा तुम्हाला तुमचे कपडे फिट होण्यास सुरूवात होते तेव्हा तुम्हाला अंदाज येतो की, तुमचं वजन वाढलं आहे. मग तुम्हाला पश्चात्ताप होतो की, मिठाई का खाल्ली? जर का फेस्टिव्ह सीझनमध्ये तुमचंही वजन वाढलं आहे तर घाबरू नका. असे काही प्रभावी उपाय आहेत, जे तुमचं वजन एक ते दोन आठवड्यात कमी करेल. 

फक्त एका गोष्टीवर लक्ष द्यायला हवं की, यावेळी आपल्या वजनावरचं नाही तर खाण्यापिण्यावरही विशेष लक्ष द्यावं लागेल. एक्सरसाइजसोबत जर तुम्ही आपल्या डाएटमध्ये सुधारणा केली तर एका आठवड्यात तुम्ही कमीत कमी एक किंवा दोन किलो वजन सहज कमी करू शकतो. तो जाणून घेऊया डाएट टिप्स 

वजन कमी करण्यासाठी आठवड्याभराचा डाएट प्लान 

 1. सकाळी सुरूवातीला कोमट पाण्यात लिंबू टाकून प्या. हवं असल्यास त्यात एक चमचा मध मिसळा. 
 2. स्वतःला लिक्विड डाएटवर ठेऊन पहिल्यांदा शरीर डिटॉक्स करा. यासाठी जास्तकरून लिक्विड घ्या. पूर्ण दिवसात जवळपास अडीच लीटर पाणी प्या. प्रोटीन युक्त गोष्टी नाश्तामध्ये जास्त घ्या. 
 3. नाश्तामध्ये तुम्ही ओट्स, मुसली किंवा दलिया साखर न घातलेल्या दूधासोबत घ्या. यात सफरचंद, द्राक्षे आणि दोन बदाम सुद्धा टाका. 100 ग्रॅम पनीर किंवा अंडी यासोबत नक्की घ्या. 
 4. नाश्तानंतर एक तासानंतर नारळ पाणी किंवा संत्र्याचा ज्यूस प्या. व्हिटामिन सी तुमचं शरीर डिटॉक्स करते. 
 5. दुपारच्या जेवणात पालेभाजीच्या सूपसोबत ब्राऊन राइस एक कप खा. त्यासोबत दही आणि जास्त प्रमाणात सलाड खा. 
 6. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये तुम्ही भाजलेले चणे, सूर्यफूलाचे बियाणे आणि अक्रोड खा. 
 7. रात्रीचं जेवण संध्याकाळी 7 वाजताचं करा. रात्रीच्या जेवणात तुम्ही 200 ग्रॅम पनीर किंवा चिकन भाजलेलं खावं. यासोबत मल्टीग्रेन एक चपाती, एक कप दही आणि सलाड खा. 
 8. झोपण्याआधी हळदीचं दूध प्यावं. त्यात साखरेचा वापर बिल्कूल करू नये. 
 9. आठवडाभर हे डाएट प्लान तुम्हाला फॉलो करायचं आले. असं केल्यास तुमचं शरीर सुद्धा डिटॉक्स होईल आणि वजनही वेगानं कमी होईल. हवं असल्यास हे डाएट तुम्ही दुसऱ्या आठवड्यात सुद्धा तुमचं वजन पाहून करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...