Cucumber Buttermilk : उन्हाळयात काकडीचे ताक करेल तुम्हाला ठंडा ठंडा कूल कूल! 5 मिनिटांमध्ये होते तयार, जाणून घ्या रेसिपी 

तब्येत पाणी
Updated Apr 14, 2023 | 18:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Cucumber Chaach Recipe: उन्हाळ्यात थंड आणि हायड्रेट राहण्यासाठी काकडीचे ताक एक प्रभावी पेय आहे. काकडीचे ताक आतड्यांसाठी आणि पचनासाठीही खूप फायदेशीर आहे. 

How to make cucumber buttermilk
एप्रिल - मे च्या कडक उन्हाळ्यामध्ये काकडीचे ताक तुमच्यासाठी आरोग्यदायी आणि ताजेतवाने पेय ठरू शकते.  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
 • काकडीचे ताक शरीराला थंड आणि कडक उन्हात ताजेतवाने ठेवण्यासाठी खूप चांगले पेय आहे.
 • ताक जर काकडीचे असेल तर त्याचा शरीराला दुप्पट फायदा होऊ शकतो.
 • काकडीत पाण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये  हे ताक तुम्हाला हायड्रेट ठेवते.

How to make cucumber buttermilk: काकडीचे ताक शरीराला थंड आणि कडक उन्हात ताजेतवाने ठेवण्यासाठी खूप चांगले पेय आहे. मुळात गरमीच्या हंगामात ताक पिणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. शिवाय ते तुमची पचनक्रिया देखील सुधारते. हे ताक जर काकडीचे असेल तर त्याचा शरीराला दुप्पट फायदा होऊ शकतो. काकडीत पाण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये  हे ताक तुम्हाला हायड्रेट ठेवते. एप्रिल - मे च्या कडक उन्हाळ्यामध्ये काकडीचे ताक तुमच्यासाठी आरोग्यदायी आणि ताजेतवाने पेय ठरू शकते. त्यासाठी आम्ही तुम्हाला काकडीचे ताक बनवण्याची संपूर्ण पद्धत येथे सांगत आहोत. 

अधिक वाचा : ​Haunted Hotel in USA: एका झपाटलेल्या हॉटेलमधली गोष्ट, जादूचे पाणी प्यायल्यामुळे व्हायचा मृत्यू 

काकडीचे ताक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

 • 1 काकडी

 • २ हिरव्या मिरच्या

 • 500 मिली ताक

 • 1/2 टीस्पून जिरे पावडर

 • 1/2 टीस्पून काळे मीठ

 • 1/2 टीस्पून मीठ

 • पुदीन्याची पाने

 • बर्फ

अधिक वाचा : ​Cyber Attack : भारताच्या 12 हजार वेबसाईट्सवर इंडोनेशिया हॅकर्सची काळी नजर, केंद्राकडून अलर्ट जारी

काकडीचे ताक बनवण्याची पद्धत 

 1. काकडीचे ताक बनवण्यासाठी प्रथम काकडी सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या.
 2. आता मिक्सरमध्ये २ हिरव्या मिरच्या आणि काकडीचे तुकडे टाकून त्याची प्युरी बनवा.
 3. यानंतर मातीच्या भांड्यात ५०० मिली ताक घ्या आणि त्यामध्ये १ कप काकडीची प्युरी घाला.
 4. नंतर त्यात जिरेपूड, काळे मीठ, मीठ आणि काही पुदिन्याची पाने टाका.
 5. आता रवी च्या सहाय्याने हे ताक चांगले घुसळून घ्या. 

अशाप्रकारे तुमचे काकडीचे ताक आता तयार झाले आहे. हे सर्व्ह करण्याआधी ते एका ग्लासमध्ये काढून घ्या, त्यावर काकडीचे मस्त स्लाईस टाकून त्याला सजवा, त्यांतर थंडगार ताकाचा पुरेपूर आस्वाद घ्या, आणि ठंडा ठंडा कूल होऊन जा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी