Diabetes in Children: मुलांना मधुमेह झाल्यास त्याचे नियंत्रण कसे करायचे...जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

Diabetes Control Tips : मधुमेह (Diabetes) हा असाच एक गंभीर आजार मोठ्या प्रमाणात आढळतो आहे. फक्त वृद्ध किंवा तरुणच नव्हे लहान मुलांमध्येही मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. आज बालदिनाच्या (Children's day) निमित्ताने मुलांच्या आरोग्याची (Child Health) चर्चा होणे स्वाभाविकच आहे. दोन प्रकारचे मधुमेह आढळतात. पहिला टाइप 1 आणि दुसरा टाइप 2 मधुमेह. टाइप 1 मधुमेह, सर्वसाधारणपणे मुलांमध्ये दिसून येतो.

Diabetes control
मुलांमधील मधुमेह 
थोडं पण कामाचं
  • लहान मुलांमध्येही मधुमेहाचे प्रमाण वाढले
  • भारतात तर मधुमेह हा एक सामान्य आजार झाला
  • लहान मुलांच्या बाबतीत मधुमेहासारख्या गंभीर आजाराचे नियंत्रण करण्याच्या टिप्स

How to manage diabetes in kids : नवी दिल्ली : आजारपण हा शब्द पूर्वी म्हातारपणाशी जोडला जायचा. मात्र अलीकडच्या काळात तरुण असोत की लहान मुले सर्वानाच वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागते आहे. जीवनशैलीत झालेले बदल, चुकीच्या आहार पद्धती, ताणतणाव यासारख्या कारणांमुळे अनेक गंभीर आजार घराघरात ठाण मांडून बसले आहेत. मधुमेह (Diabetes) हा असाच एक गंभीर आजार मोठ्या प्रमाणात आढळतो आहे. फक्त वृद्ध किंवा तरुणच नव्हे लहान मुलांमध्येही मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. आज बालदिनाच्या (Children's day) निमित्ताने मुलांच्या आरोग्याची (Child Health) चर्चा होणे स्वाभाविकच आहे. भारतात तर मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. सर्वच वयोगटातील लोक याला तोंड देत आहेत.  दोन प्रकारचे मधुमेह आढळतात. पहिला टाइप 1 आणि दुसरा टाइप 2 मधुमेह. टाइप 1 मधुमेह, सर्वसाधारणपणे मुलांमध्ये दिसून येतो. टाइप 1 मधुमेहात स्वादुपिंड एकतर कमी प्रमाणात इन्सुलिन तयार करते किंवा इन्सुलिन तयार करत नाही. लहान मुलांच्या बाबतीत मधुमेहासारख्या गंभीर आजाराचे नियंत्रण (Diabetes management in Kids) कसे करावे हा प्रश्न अनेकांसमोर असतो. या गंभीर मुद्द्याबद्दल याबद्दल जाणून घेऊया. (How to manage diabetes in children)

अधिक वाचा : तक्रारदार महिला राज्य महिला आयोगाकडे जाणार, Jitendra Awhad यांच्या अडचणी वाढणार?

टाइप 1 मधुमेहाचे निदान 

लहान मुलांमध्ये आढळणारा मधुमेह जन्मानंतर मुलांना कधीही होऊ शकतो. आता मुलांना मधुमेह झाला आहे की नाही हे कसे ओळखावे. लहान मुलांमध्ये मधुमेहाची काही लक्षणे आढळून येतात. मुलांना लघवी जास्त होणे, रात्री अंथरुणातच वारंवार लघवी करणे, जास्त तहान लागणे, भूक न लागणे त्याचबरोबर वजन कमी होणे, मळमळ, उलट्या होणे, पोटदुखीचा त्रास होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय टाईप-2 नवजात मधुमेह देखील मुलांमध्ये दिसून येतो. नवजात मधुमेह हा मुलाच्या जन्मापासून एक वर्षापर्यंत टिकतो.

अधिक वाचा - गँगवॉरमधून 22 वर्षीय तरुणाची हत्या

मधुमेही मुलांचा आहार आणि जीवनशैली 

मधुमेहात जीवनशैली आणि आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आणि पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामळे मुलांच्या आहारात  अधिकाधिक भाज्या, फळे, धान्ये आणि प्रथिने यांचा समावेश केला पाहिजे. शिवाय गोड पदार्थ, साखर, कार्बोहायड्रेट्सपासून त्यांना दूर ठेवले पाहिजे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहींना शारीरिक हालचाली किंवा व्यायाम केला पाहिजे. नियमितपणे डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे. 

अधिक वाचा : ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड

मधुमेही मुलांची काळजी कशी घ्यावी

मधुमेह हा अत्यंत चिवट आणि गंभीर आजार आहे. प्रौढांना झाल्यावरदेखील त्याचे नियमन करणे कठीण असते. अशा परिस्थितीत लहान मुलांमध्ये मधुमेह हाताळणे अत्यंत अवघड होऊन बसते. मुलांच्या पालकांसाठीही ही स्थिती अत्यंत कठीण असते. मुले आणि पालक यात अत्यंत तणावातून जातात. मात्र धीरानेच या आजाराला तोंड दिले जाऊ शकते. शिवाय मुलांना मधुमेह असल्यास शाळा आणि शेजारीपाजारी याची कल्पना असणे योग्य ठरते. शाळेच्या प्रशासनाला याची माहिती दिलेली असल्यास परिस्थितीनुसार शाळा मदत करू शकते. इन्सुलिनचा डोस देण्यासाठी याचा उपयोग होतो. मधुमेह हा जरी गंभीर आजार असला तरी योग्य ती काळजी घेतल्यास मुले इतरांप्रमाणेच आपले आयुष्य जगू शकतात. अशावेळी पालकांनी हतबल न होता मुलांची योग्य दिनचर्या आखत, आहाराची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. 

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी