how to overcome deficiency of hemoglobin : काहींच्या रक्तात हीमोग्लोबिनची कमतरता असते. या कमतरतेमुळे त्यांना वेगवेगळे आजार होण्याचा तसेच अशक्तपणा जाणवण्याचा धोका वाढतो. या समस्येवर उपाय म्हणून भरपूर हीमोग्लोबिन पुरविणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे हा सोपा उपाय आहे.
आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी
निरोगी पुरुषाच्या रक्तात १४ ते १८ मिलिग्रॅम हीमोग्लोबिन आणि निरोगी महिलेच्या रक्तात १२ ते १६ मिलिग्रॅम हीमोग्लोबिन असते. किमान मर्यादेपेक्षा कमी प्रमाणात हीमोग्लोबिन असेल तर शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. रक्ताच्या कमरतेलाच अॅनिमिया असे म्हणतात. या अॅनिमियामुळे अशक्तपणा येतो. वेगवेगळे आजार होण्याचा धोका वाढतो. शरीराची थोडी हालचाल केली तरी थकवा येतो आणि दम लागतो. हृदयाची धडधड वाढते. रक्तदाबात चढउतार होण्याचा धोका वाढतो. शरीराला धोकादायक असलेल्या या स्थितीमधून लवकर बाहेर पडण्यासाठी भरपूर हीमोग्लोबिन पुरविणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.