How to prevent acid reflux: जेवल्यानंतर येतात पित्ताचे ढेकर? ‘या’ अंगावर झोपून पाहा

पित्ताचे ढेकर येणे ही एक पचनासंबंधीची समस्या आहे. पोटातील ॲसिडिक पदार्थ जेव्हा छातीच्या वरच्या भागातील फूड पाईपमध्ये येतो, तेव्हा त्याला ॲसिड रिफ्लक्स असं म्हटलं जातं. छातीत होणारी प्रचंड जळजळ हे त्याचं मुख्य लक्षण आहे.

How to prevent acid reflux
जेवल्यानंतर येतात पित्ताचे ढेकर?  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • पित्त उसळण्याच्या प्रक्रियेवर सोपा घरगुती उपाय
  • झोपण्याची पद्धत बदलून कमी होते समस्या
  • वेळीच उपाय केला नाही तर कॅन्सर होण्याचीही शक्यता

How to prevent acid reflux: गेल्या काही वर्षात खराब लाईफस्टाईल (Lifestyle), खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी (eating habits) आणि अपुरी झोप (Sleep) यामुळे पचनाशी (Digestion) संबंधित अनेक विकार जडत असल्याचं दिसून येत आहे. जेवण झाल्यानंतर ॲसिड रिफ्लक्स (Acid reflux) होणे म्हणजे पित्ताचे ढेकर येण्याची प्रक्रिया ही अतिशय त्रासदायक असते. त्यामुळे छातीत जळजळायला सुरुवात होते. काही लोक याला छातीत ॲसिड तयार होण्याची प्रक्रिया असंही म्हणतात. हा त्रास कमी होण्यासाठी अनेक उपाय सुचवले जातात. जेवणाअगोदर खाण्याचे काही पदार्थ, जेवणानंतर खाण्याचे काही पदार्थ, वेगवेगळी सरबतं आणि औषधं यांचा उपयोग त्यासाठी केला जातो. मात्र या सगळ्यासोबत झोपण्याची योग्य पद्धत हादेखील यावरचा एक उपाय मानला जातो. झोपण्याच्या शैलीत बदल करूनही पित्तांच्या ढेकराची समस्या कमी करता येऊ शकते. जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.

पित्ताचे ढेकर आणि त्याची लक्षणे

पित्ताचे ढेकर येणे ही एक पचनासंबंधीची समस्या आहे. पोटातील ॲसिडिक पदार्थ जेव्हा छातीच्या वरच्या भागातील फूड पाईपमध्ये येतो, तेव्हा त्याला ॲसिड रिफ्लक्स असं म्हटलं जातं. छातीत होणारी प्रचंड जळजळ हे त्याचं मुख्य लक्षण आहे. या आजाराला हार्टबर्न असंही म्हटलं जातं. जेवणानंतर अन्नपदार्थ पुन्हा वर येणे, कुठलाही पदार्थ गिळायला त्रास होणे, खोकला येणे, छातीत वेदना होणे, घरघर होणे ही लक्षणंही दिसून येतात. 

असू शकतो कॅन्सर

अधूनमधून हा त्रास होणं स्वाभाविक आणि नैसर्गिक असलं, तरी वारंवार ही समस्या उद्भवणं हे गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. आपल्या पोटापर्यंत अन्नपदार्थ घेऊन जाणारी पाईप त्यामुळे खराब होण्याची शक्यता असते. कालांतराने फूड पाईपचा कॅन्सर होण्याची शक्यता त्यातून निर्माण होते. या प्रकाराला इसोफेजियल कॅन्सर असं म्हटलं जातं. 

अधिक वाचा - Diabetes Control : ही 5 हिरवी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहेत वरदान...पाहा जबरदस्त फायदे

नेमकं काय होतं?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहिनीनुसार, हार्टबर्नमध्ये छातीच्या हाडांच्या बरोबर पाठिमागे जळजळ जाणवायला सुरुवात होते. रात्रीच्या जेवणानंतर ही लक्षणं जास्तच तीव्रतेने जाणवायला सुरुवात होते. खाली वाकल्यानंतर किंवा पालथं झोपल्यानंतर त्याचा त्रास अधिकाधिक जाणवू लागतो. अनेकदा छातीप्रमाणे घशातदेखील जळजळ जाणवायला सुरुवात होते. 

छातीत का जळजळतं?

आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी पाचक रसाची निर्मिती होत असते. यालाच पित्तरस असंही म्हटलं जातं. अन्न खाल्यानंतर ते पोटात जातं आणि तिथेच हा पित्तरसही असतो. अन्न खाल्यावर अन्ननलिकेची व्हॉल्व्ह बंद होते आणि पचनाची प्रक्रिया सुरू होते. मात्र अन्नापेक्षा पित्ताचं प्रमाण जास्त असेल, तर ही व्हॉल्व्ह उघडीच राहते. त्यामुळे हे ॲसिड पुन्हा नळीत जातं. 

अधिक वाचा - How many times heart attack: एका व्यक्तीला किती वेळा येऊ शकतो हार्ट अटॅक? काही महत्त्वाच्या फॅक्ट्स

या अंगावर झोपा

आतापर्यंत समोर आलेल्या वेगवेगळ्या संशोधनातील निष्कर्षांनुसार डाव्या अंगावर झोपणं हे हार्टबर्नची समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठऱतं. त्याऐवजी जर तुम्ही उताणे झोपलात किंवा उजव्या अंगावर झोपलात, तर हा त्रास वाढण्याचीच शक्यता असते.

डिस्क्लेमर - सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेल्या या काही टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी