Air Pollution Remedies: हवेच्या प्रदूषणामुळे श्वास घ्यायला त्रास होतोय? करा हे उपाय

हवेच्या प्रदूषणामुळे खोकला, घशात खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन होणे असे अनेक त्रास होत असल्याचं दिसून आलं आहे. या सगळ्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.

Air Pollution Remedies
हवेच्या प्रदूषणामुळे श्वास घ्यायला त्रास होतोय?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हवेच्या प्रदूषणामुळे सुरु होतात अनेक त्रास
  • गरज असेल तर घराबाहेर पडा
  • प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडताना मास्कचा करा वापर

Air Pollution Remedies: मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी (Level of pollution) कमालीची वाढू लागल्याचं चित्र आहे. मुंबईमध्ये गेल्या पाच वर्षात सर्वाधिक फटाके यंदाच्या दिवाळीत फोडले गेल्याचं दिसून आलं असून त्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. तर दिल्लीचाही एअर क्वालिटी इंडेक्स (Air quality index) हा 300 च्या पार पोहोचला आहे. हवेच्या प्रदूषणामुळे खोकला, घशात खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन होणे असे अनेक त्रास होत असल्याचं दिसून आलं आहे. फुफ्फूस (Lungs) हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. फुफ्फुसे नीट काम करत नसतील, तर आरोग्यपूर्ण आयुष्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ज्यांना अस्थमाचा त्रास असतो, त्यांना हवेच्या प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास होत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. त्यामुळेच फुफ्फुसांचं आरोग्य नीट राखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 

१. विनाकारण घराबाहेर पडू नका

हवेची गुणवत्ता खराब झालेली असताना घराबाहेर पडणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. घराबाहेर पडल्यामुळे तुम्ही थेट प्रदूषित हवेच्या संपर्कात याल आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होईल. 

२. मास्क वापरा

घरातून बाहेर पडण्याची आवश्यकता असेल, तर मास्कचा वापर करा. त्यामुळे प्रदूषण, धूळ, बॅक्टेरिया आणि इतर सर्व प्रकारच्या प्रदूषित घटकांपासून तुमचा बचाव होऊ शकेल. तुम्ही वापरत असलेला मास्क वेळोवेळी स्वच्छ धूत जा. 

अधिक वाचा - Health Tips: गुलाबी थंडीत 'या' चहानं करा दिवसाची सुरुवात, वाढेल इम्युनिटी

३. एअर प्यूरिफायर

प्रदूषित हवा घरात येऊ नये, यासाठी घराची दारं आणि खिडक्या बंद ठेवा. त्याशिवाय घरात एअर प्युरिफायर लावा. त्यामुळे शुद्ध हवा घरात येईल आणि श्वास घ्यायला त्रास होणार नाही. घरात ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलं असतील, तर ही काळजी अवश्य घ्या. 

४. पाणी पीत राहा

हवेच्या प्रदूषणामुळे आपली तब्येत खराब होऊ नये, यासाठी वेळोवेळी पाणी पित राहा. असं केल्यामुळे शरीर हायड्रेट होत राहिल आणि तुमच्या शरीराचं कार्य सुरळीत सुरू राहिलं. 

५. AQI वर ठेवा नजर

वायूप्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) वर लक्ष ठेवा. त्यामुळे घरातून कधी बाहेर पडावं आणि कधी बाहेर पडणं टाळावं, हे तुम्हाला समजू शकेल. 

अधिक वाचा - Hair fall remedies: केसगळतीने हैराण झाला असाल तर करा हे घरगुती उपाय, लवकरच दिसेल फरक

६. प्राणायम आणि योगा

आपल्या फुफ्फुसाचं कार्य योग्य प्रकारे सुरू राहावं आणि श्वसनाच्या समस्या दूर राहाव्यात, यासाठी नियमित योगा आणि प्राणायम करत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या शरीराचं संतुलन टिकून राहिल. 

डिस्क्लेमर - हवेच्या प्रदूषणापासून बचाव करण्यासाठीच्या या काही सामान्य टिप्स आणि घरगुती उपाय आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी