Weight Loss: १ दिवसांत १ किलो वजन घटवा, करा हे काम

तब्येत पाणी
Updated Oct 20, 2021 | 16:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss: जर तुम्ही वाढलेल्या पोटामुळे त्रस्त आहात आणि पोट कमी करायचे आहे तर यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही १ दिवसांत एक किलो वजन कमी करू शकता. 

weight loss
Weight Loss: १ दिवसांत १ किलो वजन घटवा, करा हे काम 
थोडं पण कामाचं
  • सगळ्यात आधी वजन कमी करायचे असल्यास गोड खाणे सोडावे लागेल.
  • तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यासाठी संपूर्ण दिवस प्रोटीन चांगल्या प्रमाणात घेणे गरजेचे आहे.
  • वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज करणेही गरजेचे आहे

मुंबई: आजकालच्या लाईफस्टाईलमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाचा त्रास वाढत चालला आहे. अधिकतर आजार हे लठ्ठपणामुळे सुरू होतात. अशातच तुम्हाला जर स्वत:ला फिट ठेवायचे आहे तर सगळ्यात आधी वजन कमी करणे गरजेचे आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे वेगाने वजन वाढते आणि शरीरात अनेक आजार सुरू होतात. लठ्ठपणामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि किडनीचे अनेक आजार होतात. एकदा वजन वाढले की ते कमी करणे फार कठीण काम असते. डायटिंगच्या टक्करमध्ये अनेकांना बेचव आणि कमी प्रमाणात जेवण घ्यावे लागते. मात्र तुम्हाला आता त्रस्त होण्याची गरज नाही. तुम्ही हवं तर १ दिवसांत एक किलो वजन कमी करू शकता. यानंतर तुमचे पोटही कमी होईल. 

साखर नको - सगळ्यात आधी वजन कमी करायचे असल्यास गोड खाणे सोडावे लागेल. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्हाला मिठाई आणि चॉकलेटपासून दूर राहावे लागेल. गोड खाल्ल्याने मेटाबॉलिज्म स्लो होतो आणि वजन वाढू लागते. 

जास्त प्रोटीन -  तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यासाठी संपूर्ण दिवस प्रोटीन चांगल्या प्रमाणात घेणे गरजेचे आहे. तुम्ही खाण्यामध्ये दही, पनीर, डाळी आणि राजमा जास्त खा. प्रोटीनमुळे भूक कमी लागते आणि तुम्ही जास्त खात नाहीत. 

ग्रीन टी प्या- जर तुमचा मेटाबॉलिज्म चांगला आहे तर तुमचे वजन वाढणार नाही. यासाठी तुम्ही दिवसांतूनन २-३ वेळा ग्रीनटी प्या. ग्रीन टीमुळे वेगाने फॅट बर्न होईल. 

दररोज एक्सरसाईज - वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज करणेही गरजेचे आहे. जर तुम्ही अॅक्टिव्ह असाल तर लठ्ठपणा वाढणार नाही. यासाठी दररोज वॉक आणि जॉगिंग करा. घरात पायऱ्या चढण्याची सवय लावा. दीर्घकाळ एका जागेवर बसू नका. यामुळे फॅट बर्न होण्यास मदतत होईल. 

गरम पाणी - शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी प्या. जर वजन कमी करायचे आहे तर दररोज गरम पाणी प्या. यामुळे बॉ़डी डिटॉक्स होण्यास मदत होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी