पोट सुटलंय? तर जरूर करा हे ७ उपाय

तब्येत पाणी
Updated Nov 24, 2020 | 12:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

तुमचे पोट सुटले असेल अथवा वजन वाढले असेल तर काही घरातील पदार्थांचा आपल्या डाएटमध्ये जरूर समावेश करा.

belly fat
पोट सुटलंय? तर जरूर करा हे ७ उपाय 

थोडं पण कामाचं

  • चरबी काहीही करून कमी करायचीच आहे तर आपल्या डाएटमध्ये ओव्याचा पानांचा जरूर समावेश करा.
  • पोटाची चरबी कमी करण्यासाठी टरबूज हा सोपा आणि चांगला उपाय आहे.
  • तुम्ही जर फॅट वाढवणारे स्नॅक्स खात असाल तर त्याच्या जागी रोस्टेड बदाम जरूर खा. 

Weight loss tips: तासनतास खुर्चीवर बसून काम करणे आणि व्यस्त दिनचर्येचा(lifestyle) आपल्या आरोग्यावर(health) वाईट परिणाम होतो. मात्र याचा सर्वाधिक परिणाम आमच्या पोटावर दिसतो. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील जे सामान्य असतात मात्र त्यांचे पोट(belly fat) सुटलेले असते. जरा विचार करा सुटलेले पोट समोरच्या व्यक्तीला दिसण्यासाठी किती वाईट दिसते. अनेकदा वाढलेल्या पोटामुळे आपल्याला शरमेने मान खाली घालावी लागते. तुम्हालाही हीच समस्या सतावत आहे का? तर खाली दिलेले ७ उपाय करून तुम्ही तुमचे वाढलेले पोट कमी करू शकता. तसेच हे आपल्या घरातीलच उपाय आहे. घरातील पदार्थांचा वापर करून तुम्ही वाढलेले पोट कमी करू शकता. तसेच याचे कोणतेही साईडइफेक्ट होणार नाहीत. तसेच घरातच सगळे पदार्थ उपलब्ध असल्याने तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता. 

बदाम 

बदामामध्ये निरोगी फॅट असतात. यातील POLYUNSATURATED आणि MONOUNSATURATED फॅट्स ओव्हर इटिंगपासून बचाव करतात. बदाम भूक कंट्रोल करण्याचे काम करते. यासोबतच दृदयासंबंधित आजार दूर रोखण्यास मदत करतात. यात हाय फायबर असल्याने बराच काळ भूक लागत नाही. तुम्ही जर फॅट वाढवणारे स्नॅक्स खात असाल तर त्याच्या जागी रोस्टेड बदाम जरूर खा. 

टरबूज

पोटाची चरबी कमी करण्यासाठी टरबूज हा सोपा आणि चांगला उपाय आहे. यात ९१ टक्के पाणी असते जेव्हा तुम्ही हे जेवणाआधी खाता तेव्हा तुमचे पोट भरलेले राहते आणि साहजिकच जेवण कमी जाते. यात व्हिटामिन बी१, बी६ आणि सी योग्य प्रमाणात असते. यासोबतच पोटॅशियम आणि मॅग्नेशियमही असते. एका स्टडीनुसार, दररोज दोन ग्लास टरबूजाचा ज्यूस प्यायल्यास आठ आठवड्यात पोटाच्या जवळची चरबी कमी होते. 

बीन्स

आहारात दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या बीन्सचे सेवन केले पाहिजे. यामुळे चरबी कमी होते. तसेच मांसपेशी मजबूत होतात. त्यासोबतच पचनक्रिया सुरळीत होते. बीन्स खाल्ल्याने दीर्घकाळ तुमचे पोट भरलेले राहते. हा फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. 

ओवा

जर तुम्हाला पोटावरची चरबी काहीही करून कमी करायचीच आहे तर आपल्या डाएटमध्ये ओव्याचा पानांचा जरूर समावेश करा. ओव्याच्या पानांचे सेवन केल्याने पोटाची चरबी कमी होते. यात कमी कॅलरीज असतात तसेच फायबर, कॅल्शियम आणि व्हिटामिन सी असते. ज्यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होते. जेवणाच्या आधी ओव्याचे पाणी प्यायल्याने  पचनक्रिया सुरळीत होते.

काकडी

उन्हाळ्यात काकडीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. तसेच काकडीमुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होते. यात ९६ टक्के पाणी असते. यातील मिनरल्स, फायबर आणि व्हिटामिन्स मोठ्या प्रमाणात असतात. दररोज एक प्लेट काकडी खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत होते. यामुळे पोट साफ होते. 

टोमॅटो

टोमॅटोमध्ये 9-oxo-ODA नावाचे तत्व असते. हे तत्व रक्तातील लिपिड कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे पोटावरची चरबी कमी होते. 

सफरचंद

सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात डाएटरी फायबर्स असतात. यातील फायबर, फिटोस्ट्रॉल, फ्लॅवेनॉईड्स आणि बीटा कॅरोटीन ही तत्वे बेली फॅट कमी करण्यास मदत करतात. तसेच यामुळे अधिक खाल्ले जात नाही. यातील पॅक्टिन नावाचे तत्व वजन घटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

अननस

अननसामध्ये ब्रोमोलिन नावाचे एन्झाईम असते. हे तत्व पोटाला फ्लॅट करण्यात मदत करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी