How to reduce belly fat: पोटाची चरबी कशी कमी करावी?, जाणून घ्या सोप्या Tips

Reduce belly fat Tips: पोटाची चरबी (belly fat) कमी करायची असेल तर काही सोप्या टिप्स (Simple Tips) नक्कीच जाणून घ्या. ज्याचा तुम्हाला मोठा फायदा होईल.

how to reduce belly fat know simple tips health
How to reduce belly fat: पोटाची चरबी कशी कमी करावी?, जाणून घ्या सोप्या Tips  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पोटाची वाढती चरबी आणि वजन कमी करण्यासाठी सोप्या टिप्स
  • कोल्डिंक्स आणि मद्यपानाच्या सवयींमध्ये करा बदल
  • वजन कमी करणं फारच सोप्पं

Belly Fat: जर तुमचे पोट प्रचंड सुटलं (belly fat) असेल आणि जर ते कमी होत नसेल तर समजून घ्या, की तुमच्या प्रयत्नात काही तरी चूक होत आहे. वास्तविक, तुमचे ड्रिंक्स किंवा ज्यूस पिण्याशी संबंधित काही सवयी चुकीच्या आहेत आणि त्यामुळेच तुमचे वजन भराभर वाढत आहे. जर तुम्हाला वजन (Weight) कमी करायचे असेल किंवा पोटाची वाढती चरबी कमी करायची असेल तर खालील उपाय नक्की वाचा. (how to reduce belly fat know simple tips health)

वजन वाढण्याचे मूळ कारण म्हणजे आपली जीवनशैली तसेच आपला आहार. बराच वेळ एकाच जागी बसणे. त्याचा परिणाम पोटावर सर्वाधिक दिसून येतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी तसेच पिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स आणि मद्यपानाबाबत काही सवयींबद्दल सांगत आहोत. ज्यामुळे तुमच्या वाढणारे पोट कमी होऊ शकते.

अधिक वाचा: पावसाळ्यात दही सेवन करणं योग्य की आयोग्य? जाणून घ्या सत्य

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वप्रथम मिठाई खाणे बंद करा. एवढेच नाही तर जास्त गोड पदार्थांचं सेवन करणंही थांबवा. जर तुम्हाला फळांचा रस प्यायचा असेल तर साखर घालून पॅकेटबंद ज्यूस अजिबात पिऊ नका. काही फळांच्या रसांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे फळांचा रसही जास्त प्रमाणात सेवन करू नये.

तुम्ही कृत्रिम गोड पदार्थ घालून कोणतेही पेय पीत असाल तर ही सवय देखील बदला. त्यांचे दररोज सेवन करणेही टाळा. तसेच कोल्ड्रिंक्स आणि सोडा पिणं टाळा.

अधिक वाचा: Weight Loss Tips : एका आठवड्यात होईल वजन कमी ? Weight Loss Coach ने सांगितला सर्वात सोपा उपाय

पेय कोणतेही असो, जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्यास वजन वाढण्याची भीती असते. Binge Drinking म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती 2 तासांच्या कालावधीत 5 किंवा अधिक डिंक्स घेतं. अल्कोहोल, बिअर आणि कोल्ड ड्रिंक्समध्येही कॅलरीज जास्त असतात.

सतत काही ना काही खात राहिल्यास वजन कमी होण्याऐवजी वाढते. सामान्य सॉफ्ट ड्रिंकमध्ये 60 ग्रॅमपर्यंत साखर असते, जी पांढऱ्या ब्रेडच्या 4 स्लाइसच्या समतुल्य असते.

अधिक वाचा: Foods for constipation: पोट साफ न होणं व बद्धकोष्ठतेसारखी समस्या होईल दूर, खाण्यास सुरुवात करा ‘हे’ 5 पदार्थ

तुमच्या रोजच्या आहारात प्रोटीन शेकचा समावेश करा. यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात प्रथिने मिळतात. पोट भरलेले जाणवेल. चयापचय चांगले होईल. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी