डबल चिनमुळे चेहरा दिसतो लठ्ठ, वापरा या टिप्स

तब्येत पाणी
Updated Oct 12, 2021 | 15:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

डबल चिनमुळे तुमच्या चेहऱ्याची सुंदरता कमी होते. ही डबल चिन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगत आहोत. 

double chin
डबल चिनमुळे चेहरा दिसतो लठ्ठ, वापरा या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • टेनिस बॉलच्या मदतीने तुम्ही डबल चिन कमी करू शकता.
  • जीभ एक्सरसाईज ही जिभेच्या मसल्ससाठी फायदेशीर आहे
  • यासाठी सगळ्यात सोपी आणि साधी एक्सरसाईज म्हणून कुठेही करू शकता. याचे नाव आहे च्युईंग गम एक्सरसाईज.

मुंबई: डबल चिनची समस्या साधारणपणे वय वाढल्याने अथवा अनुवांशिक परिणामामुळे होऊ शकते. दरम्यान, याचे वजनाशी काही संबंध नसतो मात्र काही बाबतीत ही समस्या वाढत्या वजनाचे कारणही दिसू शकते. दरम्यान, हल्ली बऱ्याच महिला मेकअप आणि अन्य प्रॉडक्टच्या मदतीने चीकबोन्स वाढवण्यासाठी तसेच मुख्य जॉलाईन बनवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र याने काय होईल? जर आम्ही तुम्हाला सांगितले की एक्स्ट्रा फॅट कमी करण्याचा वेगवान आणि सोपी पद्धत. 

तुम्ही सगळ्यांनी शरीर आणि मेंदूच्या एक्सरसाईजबद्दल ऐकले असेल. मात्र तुम्हाला चेहऱ्याच्या एक्सरसाईजचे महत्त्व माहीत आहे का? चेहऱ्याच्या एक्सरसाईजमुळे केवळ रक्तप्रवाह सुधारत नाही तर सुरकुत्याही कमी होण्यास मदत होते. यामुळे तुम्ही तरूण दिसता. 

खाली काही एक्सरसाईज देण्यात आल्या आहेत त्या तुम्ही डेली रूटीनमध्ये सामाविष्ट करू शकता. 

वॉर्मअप एक्सरसाईज

एक्सरसाईज सुरू करण्याआधी काही वॉर्मअप एक्सरसाईज करणे गरजेचे असते. असेच फेशियल एक्सरसाईजमध्येही असते. तुम्ही खालचा जबडा वर खाली करा. त्यानंतर आजूबाजूला करा. ही एक्सरसाईज हळू हळू करा. तुम्ही हे ८-१०वेळा करू शकता. 

च्युईंगमने करा एक्सरसाईज

यासाठी सगळ्यात सोपी आणि साधी एक्सरसाईज म्हणून कुठेही करू शकता. याचे नाव आहे च्युईंग गम एक्सरसाईज. तुम्ही योग्य तेच वाचलेत. आपल्या हनुवटीच्या मसल्समध्ये सातत्याने गती असते. ज्यामुळे एक्स्ट्रा फॅट कमी होते. च्युईंग गम एक्सरसाईजमुळे जबड्याचे मसल्स मजबूत बनवण्यास मदत होते. 

पाऊट एक्सरसाईज

हल्ली अनेकांना पाऊट करत फोटो क्लिक करण्याची सवय असते. मात्र तुम्हाला माहीत आहे का तुमची ही पाऊटची सवय डबल चिनपासून सुटका करू शकते. जर तुम्हाला पाऊट करता येत असेल तर तुम्हाला फिश फेस एक्सरसाईजचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला केवळ गाल आतमध्ये घेत काही सेकंद तसेच थांबायचे आहे. एक ब्रेक घ्या आणि पुन्हा ४-५ वेळा ही एक्सरसाईज करा. 

बॉल एक्सरसाईज

टेनिस बॉलच्या मदतीने तुम्ही डबल चिन कमी करू शकता. याला बॉल एक्सरसाईज म्हणून ओळखले जाते. तुम्हाला बॉल आपल्या हनुवटीच्या खाली ठेवला पाहिजे. आता हळूहळू बॉलला दाबत चिन खाली घ्या. हे १५-२० वेळा करा. 

जीभ एक्सरसाईज

जीभ एक्सरसाईज ही जिभेच्या मसल्ससाठी फायदेशीर आहे. आपले डोके सरळ ठेवून जीभ पुढे घ्या आणि मोठी करा. आपली जीभ नाकाच्या दिशेने करा. काही सेकंदसाठी थांबा. नंतर सोडा. असे ४-५ वेळा करा. 

स्माईल एक्सरसाईज

आपण दिवसभरात अनेकदा हसत असतो. मात्र तुम्ही विचार केलाय का की डबल चिन कमी करण्यासाठी याची तुम्हाला मदत होऊ शकते. तुम्हाला बस इतकेच करायचे आहे की आपले तोंड बंद ठेवा आणि आपल्या जबडा आणि ओठांचे कोपरे जितके शक्य होतील तितके पसरवा. आपली जीभ टाळूला लावा. तुम्हाला तुमच्या हनुवटीच्या मसल्समध्ये ताण जाणवेल. काही सेकंद थांबा आणि ४-५ वेळा परत करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी