Weight Loss Tips: उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

तब्येत पाणी
Updated Apr 29, 2021 | 18:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

क्रेव्हिंग म्हणजे वारंवार खाण्याची इच्छा होत असेल तर सवयीला आळा बसायला हवा. यामुळे फॅट वाढते. त्यामुळे वजन वाढण्यास सुरूवात होते. तसेच जंकफूडपासून दूर राहायला हवे.

weight loss
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स 

थोडं पण कामाचं

  • वाढते वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी वजन संतुलित राहणे गरजेचे असते.
  • वाढते वजन कंट्रोल करण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा.
  • उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे असते.

मुंबई: जेव्हा वजन कमी(weight loss) करण्याबाबत विचार होते तेव्हा डोक्यात पहिले येते ते डाएटिंग(dieting). डॉक्टर्सही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्यास तसेच वर्कआऊट करण्याचा सल्ला देतात. दरम्यान, या धावपळीच्या आयुष्यात वेळ काढणे मुश्किल होते. तज्ञांच्या मते वाढते वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी वजन संतुलित राहणे गरजेचे असते. तसेच कॅलरीज बर्नही झाल्या पाहिजेत. यामुळेच वाढते वजन नियंत्रणात राहू शकते. जर तुम्हीही वजन वाढण्यामुळे त्रस्त असाल आणि कंट्रोल करायचे असेल तर या सोप्या टिप्स जरूर फॉलो करा. (how to reduce weight in summer, follow this tips)

क्रेव्हिंगवर आळा

क्रेव्हिंग म्हणजे वारंवार खाण्याची इच्छा होणे. या सवयीला आळा घालणे गरजेचे आहे. कारण अधिक खाल्ल्याने फॅट वाढते यामुळे वजन वाढू लागते. तसेच जंक फूडपासून दूर राहिले पाहिजे. जंक फूड पचण्यास वेळ लागतो. यामुळे अचानक भूक लागणे आणि वारंवार खाण्यावर कंट्रोल करावा. जर हे कठीण वाटत असेल नियमित अंतराने पाणी प्या. ड्रायफ्रुट्स खा. 

फायबरयुक्त पदार्थांचे करा सेवन

वाढते वजन कंट्रोल करण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे भूक कमी लागते. तसेच पाचनशक्ती मजबूत होते. 

पाणी खूप प्या

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. तसेच तुम्ही नेहमी ताजेतवाने दिसता. 

प्रोटीनचे अधिक सेवन

वाढते वजन कंट्रोल लोक डाएटिंग करतात. ज्यामुळे थकवा जाणवू लागतो. यामुळे प्रोटीनचे अधिकाधिक सेवन करा. यामुळे शरीरात उर्जा कायम राहील. 

पुरेशी झोप घ्या.

निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे आहे. त्यासोबच तणाव दूर करणे झोपेमध्ये महत्त्वाचे ठरते. जेव्हा तुम्ही झोपत नाहीत तेव्हा तुमच्या शरीरातून कोर्टिसोल नावाचे तणावाचे हार्मोन उत्पन्न होते. ज्यामुळे वजन वाढते. त्यामुळे पुरेशी झोप घ्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी