Cholesterol:शरीरातून बाहेर निघेल खराब कोलेस्ट्रॉल, फक्त करावे लागेल हे काम

तब्येत पाणी
Updated Jul 05, 2022 | 15:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Cholesterol:शरीरातून २ दिवसांत खराब कोलेस्ट्रॉल बाहेर निघेल यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. 

cholestrol
शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल काढायला फक्त करावे लागेल हे काम  
थोडं पण कामाचं
  • शरीरात खराब आणि चांगले कोलेस्ट्रॉल असते.
  • शरीरात कोलेस्ट्रॉल निर्माण होणे चुकीचे नाह तर चांगले आहे.
  • जर खराब कोलेस्ट्रॉल रक्तांच्या नसांमध्ये जमा होऊ लागले तर त्यामुळे नसा ब्लॉक होतात.

मुंबई: शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल(bad cholestrol) कमी करायचे आहे तर तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलवर(lifestyle) लक्ष द्यावे लागेल. नाहीतर पुढे जाऊन याचा त्रास होऊ शकतो. याशिवाय ब्लड प्रेशर उच्च राहायला लागतो. सर्वांनाच माहीत आहे की शरीरात खराब आणि चांगले कोलेस्ट्रॉल असते. शरीरात कोलेस्ट्रॉल निर्माण होणे चुकीचे नाह तर चांगले आहे. मात्र जर खराब कोलेस्ट्रॉल रक्तांच्या नसांमध्ये जमा होऊ लागले तर त्यामुळे नसा ब्लॉक होतात. अशातच हार्ट अॅटॅक येण्याची भीती असते. जाणून घ्या शरीरातून कोलेस्ट्रॉल कसे बाहेर काढता येईल...How to remove bad cholestrol from body

अधिक वाचा - ...म्हणून फराह खान लग्नानंतर जायचं होतं पळून, स्वतः केला खुल

शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण

अनेक रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे की २० पेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल लेव्हल १०० मिलीग्रॅम पेक्षा कमी असावी. तसेच २० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्येही १०० मिलीग्रॅमपेक्षा कमी असावे. 

या गोष्टींनी होईल कमी

आवळा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्तम. जर तुम्ही दररोज आवळ्याचे सेवन केले तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहील. 

जिरे, धने आणि बडीशेपला आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करा. यामुळे कोलेस्ट्रॉल नियमित राहील. 

याशिवाय तुम्ही लसूणही खाऊ शकता. यामुळेही कोलेस्ट्रॉल नियमित राहील. 

तसेच लिंबाचा वापरही डाएटमध्ये जरूर करा. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल बाहेर निघण्यास मदत होईल. 

रोजच्या डाएटमध्ये आल्याचा समावेश करा. याच्या मदतीने तुम्ही शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढू शकता. 

अधिक वाचा - बिल न मागणाऱ्या हॉटेलची अनोखी कहाणी

शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत

जेव्हा शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा धमन्यांमध्ये फॅट जमा होऊ लागते. यात नसांमधील रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो. हात आणि पायांच्या बोटांना योग्य प्रमाणात रक्त पुरवठा नीट न झाल्याने नखांचा रंग हलका गुलाबी ते पिवळा होऊ लागतो. 

जेव्हा पाय सुन्न होत असतील तेव्हा हे अजिबात हलक्यात घेऊ नका. हा हाय कोलेस्ट्रॉलटा इशारा असू शकतो. 

शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याचा सरळ परिणाम हाय ब्लड प्रेशरशी आहे. रक्तामध्ये जितके फॅट जास्त वाढेल त्यामुळे ब्लडप्रेशर वाढेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी