Loose weight for marriage: लग्नसराईत दिसा सडपातळ आणि फिट, ‘या’ उपायांनी वजन करा पटापट कमी

लग्नात गेल्यावर गरमागरम आणि सुग्राम अन्नपदार्थ पाहून कुणाचंच आपल्या जिभेवर नियंत्रण राहत नाही. या काळात मोठ्या प्रमाणावर जंक फूड आणि मिठाई यांचं सेवन केलं जातं. त्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणावर कॅलरीज घेतल्या जातात आणि वजन वाढायला सुरुवात होते.

Loose weight for marriage
लग्नसराईत दिसा सडपातळ आणि फिट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लग्नसराईच्या काळात वाढते वजन
  • मिठाई आणि गोड खाण्याने येऊ लागतो लठ्ठपणा
  • सोप्या उपायांनी कमी करता येते वजन

Loose weight for marriage: दिवाळीनंतर तुळशीचं लग्न लागतं आणि त्यानंतर सगळीकडे लगीनघाई (Wedding season) सुरु होते. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला सुरुवात होते आणि हिवाळ्यात अनेकजण लग्न करणं पसंत करतात. लग्नात गेल्यावर गरमागरम आणि सुग्राम अन्नपदार्थ (Delicious food) पाहून कुणाचंच आपल्या जिभेवर नियंत्रण राहत नाही. या काळात मोठ्या प्रमाणावर जंक फूड (Junk Food) आणि मिठाई (Sweets) यांचं सेवन केलं जातं. त्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणावर कॅलरीज घेतल्या जातात आणि वजन वाढायला सुरुवात होते. वजन वाढण्याच्या समस्येचं नेमकं काय करायचं, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. त्यासाठी काही सोपे उपाय जाणून घेऊया. 

साखरेपासून राहा लांब

आपण जी रिफाइन केलेली पांढरी साखर वापरतो, त्यात कॅलरी सोडून इतर काहीच नसतं. केवळ कॅलरींचा भरणा झाल्यामुळे वजन वेगाने वाढायला सुरुवात होते. त्यामुळे लग्नसराईच्या काळात कोल्ड्रिंक, एनर्जी ड्रिंक आणि फळांचा रस यापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुकीज, कँडी आणि तळलेल्या पदार्थांपासूनदेखील तुम्ही लांब राहण्याचा निर्धार करू शकता. या सर्व पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात साखर असते. त्यातून पोषक घटक मिळत नाहीत आणि नुसत्याच कॅलरीज वाढत राहतात. 

पाण्याची गरज

पाण्यामुळे अनेक समस्या दूर होतात. वजन नियंत्रणात ठेवणे, त्वचेवर चमक आणणे आणि सूज येण्याचे प्रकार कमी होणे यासारखे फायदे केवळ योग्य आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याने मिळतात. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहणे गरजेचे आहे. थंडीच्या काळातही पाणी पिण्याचे प्रमाण कमी न करता पुरेशा प्रमाणात त्याचे सेवन आवश्यक ठरते. 

अधिक वाचा - Weight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल देखील करते वजन कमी, केवळ असे करा सेवन

क्रॅश डाएटपासून सावधान

वेगाने वजन कमी करण्याच्या नादात क्रॅश डाएट किंवा लो-कार्ब डाएटसारख्या कल्पनांच्या मागे लागू नका. कारण हा कायमस्वरुपी उपाय असू शकत नाही. हे डाएट सोडून जेव्हा तुम्ही पुन्हा पूर्वीसारखे खाऊ-पिऊ लागाल, तेव्हा पुन्हा आधी होता, तसेच व्हाल. या प्रकारच्या डाएटमुळे चिडचिड, थकवा आणि केव्हिंगच्या समस्याही सुरू होतात. 

धीर धरा

जर तुम्हाला वाढलेल्या वजनाचा त्रास होत असेल, तर तुम्हाला ते कमी करण्याचं टेन्शन येऊ शकतं. वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय तुम्ही शोधू लागाल आणि त्यात अनेक चुका कराल. हे अजिबात होऊ देऊ नका. संयम ठेवा आणि योग्य पद्धतीनेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करत राहा. 

अधिक वाचा - Home remedies for Dengue : डेंग्यू असो की व्हायरल, हे आहेत जबरदस्त घरगुती उपाय...हे खाऊन वाढवा प्लेटलेट्स

वजन कमी करण्याची त्रिसुत्री

लाईफस्टाईलमध्ये काही सुधारणा करून वजन कमी करता येऊ शकते ते कायमस्वरुपी नियंत्रणातही ठेवता येते. त्यासाठी तीन गोष्टी आवश्यक मानल्या जातात. पुरेसा आणि पौष्टिक आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे या तीन सूत्रांचा दैनंदिन आयुष्यात अवलंब करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 

डिस्क्लेमर - वजन कमी करण्याबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी