take care of vagina । मान्सूनमध्ये होते योनीमार्गात जळजळ आणि खाज, हे आहेत उपाय

तब्येत पाणी
Updated Jul 21, 2021 | 15:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

take care of vagina । मान्सूनमध्ये अनेकदा महिलांमध्ये योनीमार्गात खाज, जळजळ आणि ड्रायनेसची समस्या असते मात्र त्याला नंजर अंदाज करणे भारी पडू शकते.

vagina
मान्सूनमध्ये होते योनीमार्गात जळजळ आणि खाज, हे आहेत उपाय 

थोडं पण कामाचं

  • मान्सूनमध्ये अनेकदा योनीमार्गाजवळ जळजळ, खाजेची समस्या सतावते. 
  • ही समस्या एखाद्या गंभीर आजार अथवा इन्फेक्शनचे संकेत असू शकतात. 
  • घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येवर उपाय करू शकतात. 

vaginal Care: महिलांचा खाजगी अवयव खूप संवेदनशील असतो यासाठी तो स्वच्छ असणे गरजेचे असते. अनेक महिला आपल्या या अवयवाची विशेष काळजी घेतात मात्र तरीही त्यांना खाज, जळजळ आणि ड्रायनेसची समस्या होते. मात्र हे संकेत एखाद्या गंभीर आजार अथवा इन्फेक्शनचे असू शकतात. त्यामुळे याकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये. काही घरगुती उपायांनी तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. 

मध आणि दही

योगर्टला प्रोबायोटिक मानले जाते. ज्यामुळे खाज कमी होण्यासोबतच जळजळही कमी होते. दह्यासोबत मधाचा वापर केल्याने योनीमार्गातील जळजळ आणि खाजेची समस्याही दूर होऊ शकते.

अॅपल सायडर व्हिनेगार

योनीमार्गात खाज आणि जळजळ ठीक करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगार हे रामबाण औषध आहे. यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. यामुळे योनीमार्गात होणारी जळजळ, खाज कमी होण्यास मदत होते. तसेच या ठिकाणचा पीएच नियंत्रित करत खाज आणि जळजळीपासून सुटका मिळते. दरम्यान व्हिनेगारचा वापर नेहमी पाण्यासोबतच करावा. नाहीतर समस्या निर्माण होऊ शकतात. 

टी ट्री ऑईल

टी ट्री ऑईलमध्ये अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल प्रॉपर्टी असतात. योनीमार्गात खाज, जळजळ आणि ड्रायनेसची समस्याही निर्माण होते. यासाठी दोन ते तीन थेंब टी ट्री ऑईल घ्या आणि ते योनीमार्गाच्या जवळपासच्या भागात लावा. यामुळे लगेच आराम मिळेल. 

तुळशीची पाने

तुळस ही लाभदायक औषधी आहे. यात eugenol नावाचे कंपाऊंड असते. यामुळे योनीमार्गात होणारी जळजळ, खाज कमी होण्यास मदत होते. यासाठी तुळशीची पाने पाण्यात उकळून घ्या आणि थंड करा. जेव्हा हे पाणी थंड होईल तेव्हा दिवसातून दोन ते तीन वेळा या पाण्याने हा भाग स्वच्छ करा. 

कोल्ड कॉम्प्रेस

जर तुम्हालाही ही समस्या आहे तर कोल्ड कॉम्प्रेस हा उपाय चांगला आहे. कोल्ड कॉम्प्रेसमुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल. कोल्ड कॉम्प्रेस बनवण्यासाठी एक साफ कॉटनचा कपडा घ्या. यात काही बर्फाचे तुकडे टाका. हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी