Skincare in Winter : हिवाळ्यात होतात त्वचेच्या अनेक समस्या, या टिप्स वापरा, त्वचा होईल सुंदर

Skin Care Tips : त्वचेवर प्रदूषण, हवामान, आपली दिनचर्या यांचा परिणाम होत असतो. यातूनच अनेकवेळा त्वचेच्या समस्या (Skin Problems)निर्माण होत असतात. त्यामुळेच त्वचेच्या निगा राखण्यासाठी अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचीही काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हिवाळ्यात हवा कोरडी (Dry Skin) असते. यातूनच हिवाळ्यात (Winter) त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळेच हिवाळ्यात या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

Skin Care
त्वचेची निगा राखण्याचे उपाय 
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात त्वचेच्या समस्या येतात
  • सुंदर त्वचेसाठी काळजी घेतली पाहिजे
  • त्वचेला तजेलदार ठेवण्याच्या टिप्स

Winter Skincare Tips : नवी दिल्ली : त्वचा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग असतो. तजेलदार, सुंदर त्वचेच्या (Beautiful Skin) माणसाचा समोरच्या व्यक्तीवर लगेच प्रभाव पडतो. त्वचेवर प्रदूषण, हवामान, आपली दिनचर्या यांचा परिणाम होत असतो. यातूनच अनेकवेळा त्वचेच्या समस्या (Skin Problems)निर्माण होत असतात. त्यामुळेच त्वचेच्या निगा राखण्यासाठी अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचीही काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तुम्हीदेखील अनेक गोष्टी लक्षात ठेवून तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकता. हिवाळ्यात हवा कोरडी (Dry Skin) असते. यातूनच हिवाळ्यात (Winter) त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळेच हिवाळ्यात या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या टिप्स (Winter Skincare Tips) लक्षात ठेवून तुम्ही हिवाळ्यात त्वचेला निरोगी ठेवू शकता. पाहूया हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्याच्या काही टिप्स. (How to take care of your skin in winter)

अधिक वाचा  : Blood Sugar Control Tips: मधुमेहाची लक्षणे दिसताच लगेच करा हे 5 उपाय...होईल फायदा

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल-

साबण
साबणात अनेक रसायनांचा वापर केलेला असतो. यामुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळेच साबणाचा वापर टाळा आणि खासकरून चेहऱ्यावर साबण लावू नका. साबण आणि डिटर्जंट तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकतात आणि त्वचेला रुक्षपणा आणतात. म्हणूनच सौम्य क्लीन्सर वापरा. शिवाय चेहऱ्यावर नेहमी सौम्य फेसवॉश लावा.

अधिक वाचा  : Green Bonds: ग्रीन बॉन्ड्स म्हणजे काय? गुंतवणुकीचा नवा आकर्षक पर्याय जाणून घ्या

गरम पाण्यात आंघोळ नको
आता हिवाळा म्हटला की थंडी आली आणि मग साहजिकच गरम पाण्याने आंघोळीचा मोह आलाच. अनेकांना नेहमीच गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. मात्र गरम पाण्याने जास्त आंघोळ करू नये. यामुळे तुमच्या त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. परिणामी तुमची त्वचा निस्तेज दिसू लागते. म्हणून आंघोळ करताना ही गोष्ट लक्षात ठेवा. 

कोरड्या त्वचेसाठी मॉइस्चरायझर 
तुमची त्वचा कितीही तेलकट असली तरी त्यावर मॉइश्चरायझर जरूर वापरा. त्यातून कोरड्या त्वचेला तर याची खूपच आवश्यकता असते. त्यामुळे त्वचेला हिवाळ्यात तरी मॉइश्चरायझ करण्याची काळजी घ्या. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुमच्या त्वचेच्या प्रकाराला अनुकूल असे मॉइश्चरायझर वापरा. उदाहरणार्थ, जर तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल-आधारित मॉइश्चरायझर लावा. कोरड्या त्वचेसाठी, क्रीम आधारित मॉइश्चरायझर चांगले असते. हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडते आणि तिथून त्वचेच्या समस्यांना सुरूवात होते.

अधिक वाचा  : 'द केरला स्टोरी'चा टीझर आऊट

टॉवेलचा वापर
आंघोळीनंतर त्वचा टॉवेलने घासण्याची पद्धत असते. मात्र टॉवेलने तुमची त्वचा घासू नका. खासकरून हिवाळ्यात हे टाळा. कारण यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. आंघोळ केल्यानंतर, त्वचेवर थोडा ओलावा ठेवण्यासाठी टॉवेलने स्वतःला फक्त डॅप करा.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचा उपाय अंमलात आणण्यापूर्वी किंवा कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी