Walking Tips : चालण्याने घटते वजन... मात्र किती चालावे, कसे चालावे?जाणून घ्या

Health tips : वजन वाढणे, पोटावर चरबी वाढणे या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. यावर तुम्ही सोप्या पद्धतीने मार्ग काढू शकता. चालणे किंवा वेगाने चालणे ही तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे. चालण्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. वजन कमी करण्याचा हा एक अतिशय साधा सरळ मार्ग आहे. किती चालायचे, कसे चालायचे ते जाणून घ्या.

Weight loss
चालण्याच्या व्यायामासाठीच्या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • डाएटिंग न करता वजन आणि चरबी कमी करण्यासाठी चालणे उपयोगाचे असते
  • चालण्यासंदर्भातील महत्त्वाच्या टिप्स
  • चालण्याच्या सोप्या व्यायामाने तुम्ही अनेक आजार दूर ठेवू शकता

Walking For Weight Loss:नवी दिल्ली : आरोग्य ही काही विनासायास किंवा काहीच न करता मिळणारी गोष्ट नाही. आपली योग्य जीवनशैली, आहार, व्यायाम यासारख्या गोष्टींमुळे आरोग्य (Health) लाभते. अलीकडच्या काळात वजन वाढणे (Weight Gain), पोटावर चरबी वाढणे या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. बरं जिममध्ये जाऊन दररोज व्यायाम(Exercise) करणे अनेकांना शक्य होत नाही. काही हरकत नाही, तरीदेखील तुम्ही एका सोप्या मार्गाने वजन कमी करू शकता. चालणे किंवा वेगाने चालणे (Walking)ही तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे. चालण्यासाठी पैसे लागत नाहीत. ही साधी सोपी क्रिया हा निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. चालण्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. वजन कमी करण्याचा हा एक अतिशय साधा सरळ मार्ग आहे. खास करून जर तुमची जीवनशैली किंवा कामाचा स्वभाव तुम्हाला एकाच जागी बसवून ठेवत असेल तर चालणे खूपच उपयोगाचे आहे. जर तुमच्या पोटाची चरबी वाढली असेल तर आजपासून तुमच्या वजन कमी करण्याच्या रुटीनमध्ये चालणे समाविष्ट करा. मात्र नेमके किती चालावे, कसे चालावे (Walking Tips) यासारख्या शंका अनेकांच्या मनात असतात त्याबद्दल समजून घेऊया. (How to walk and how much walk for weight loss)

अधिक वाचा - IND vs AUS: दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ११ ठरली! या खेळाडूंचा देणार बळी

वेगाने चालण्याने वजन खरंच कमी होते का? (Is weight loss possible by walking)

चालण्यामुळे फक्त वजनच कमी होते असे नाही तर ती तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त क्रिया आहे. नियमितपणे वेगाने चालण्यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. कोणतेही डाएटिंग न करता तुम्ही चालण्याच्या व्यायामाद्वारे पोटावरील चरबी कमी करू शकता. 

अभ्यासातून असे आढळून आले की जे लोक जास्त वेळ बसून असतात त्यांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो. कारण सतत बसून राहण्यामुळे किंवा बैठ्या कामामुळे कंबरेचा घेर वाढतो, ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण वाढते आणि एचडीएल किंवा निरोगी कोलेस्ट्रॉल कमी होते. परिणामी त्याचा विपरित परिणाम ह्रदयाच्या आरोग्यावर होतो. 

अधिक वाचा - महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात महिला पितात जास्त दारू

यापूर्वी कॅनडात करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या स्त्रिया 14 आठवडे दररोज सुमारे एक तास वेगाने चालतात त्यांच्या खाण्याच्या सवयी न बदलता त्यांच्या पोटावरील चरबी 20 टक्के कमी होते. त्यामुळे जर तुम्हाला सपाट पोट हवे असेल तर जास्त चालण्याचा प्रयत्न करा.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक बैठी जीवनशैली जगतात किंवा फारशा शारीरिक हालचाली करत नाहीत त्यांच्यासाठी हृदयविकाराचा धोका वाढतो. हा धोका कमी करण्यासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. एखाद्या व्यक्तीने दररोज किमान 10,000 पावले चालणे आवश्यक आहे. परंतु 15,000 चे लक्ष्य ठेवल्यास त्याचा शरीराला अधिक फायदा होईल. जर तुम्हाला हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर हे आवश्यक आहे. सवय नसल्यामुळे सुरुवातीला हे अवघड वाटू शकते. मात्र सोप्या युक्त्या वापरून तुम्ही ठरवलेले ध्येय साध्य करू शकता. उदाहरणार्थ, तुमची 15,000 पावले 20-मिनिटांच्या एकाच चालीमध्ये पूर्ण करण्याऐवजी दिवसातून तीन वेळा चाला.

अधिक वाचा - दिव्यांका त्रिपाठी बिग बॉस 16 मध्ये दिसणार का?

रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहावर उपयुक्त

लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी, बर्कले, कॅलिफोर्निया येथील लाइफ सायन्स डिव्हिजन येथे केलेल्या एका नवीन अभ्यासानुसार, वेगाने चालणे उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाचा धोका कमी करू शकते. हे तिन्ही घटक ह्रदयविकार आणि झटक्यासाठी मोठे जोखमीचे असतात. 

याशिवाय चालण्याने बद्धकोष्ठता आणि आतड्यांसंबंधी इतर समस्या टाळता येतात. यामुळे तुमचा मूडही चांगला राहतो. तणावाची पातळी कमी होते.

केव्हा चालावे आणि किती चालणे फायदेशीर ठरेल?

अमेरिकन हार्ट असोसिएशनने शिफारस केली आहे की प्रौढांनी दररोज 30 मिनिटे शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत. दर आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम व्यायम किंवा दर आठवड्याला 75 मिनिटे जोरदार व्यायाम केला पाहिजे.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी