Avoid Skin Dryness: थंडीत चेहरा धुतल्यामुळे त्वचा होते ड्राय, करा हे घरगुती उपाय

चेहऱ्याला लावण्यासाठी जो साबण आपण वापरतो, त्यामुळे अनेकदा चेहऱ्याची त्वचा कोरडी आणि रुक्ष होण्याची शक्यता असते. चेहऱ्याच्या त्वचेवरील नैसर्गिक ओलावा आणि स्निग्धता त्यामुळे संपते आणि चेहरा वारंवार कोरडा पडू लागतो. शक्यतो नैसर्गिक गोष्टींचा वापर चेहऱ्याच्या सफाईसाठी केला, तर या समस्येपासून स्वतःचं संरक्षण करता येऊ शकतं.

Avoid Skin Dryness
थंडीत चेहरा धुतल्यामुले त्वचा होते ड्राय  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात चेहरा धुतल्यावर त्वचा होते कोरडी
  • पाण्याच्या संपर्कामुळे निघून जातो त्वचेवरील नैसर्गिक स्निग्धपणा
  • नैसर्गिक उपायांनी हिवाळ्यातही त्वचा राखता येत मऊ आणि मुलायम

Avoid Skin Dryness: थंडीच्या काळात (Winter) त्वचेची खास काळजी घेण्याची गरज असते. या काळात चेहरा धुतल्यानंतर (Face Wash) त्वचा रुक्ष आणि ओढल्यासारखी झाल्याचा अनुभव अनेकांना वारंवार येत असतो. त्वचेची निगा राखण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक उत्पादनांचा यासाठी वापर केला जातो. चेहऱ्याला लावण्यासाठी जो साबण आपण वापरतो, त्यामुळे अनेकदा चेहऱ्याची त्वचा कोरडी आणि रुक्ष होण्याची शक्यता असते. चेहऱ्याच्या त्वचेवरील नैसर्गिक ओलावा आणि स्निग्धता त्यामुळे संपते आणि चेहरा वारंवार कोरडा पडू लागतो. शक्यतो नैसर्गिक गोष्टींचा वापर चेहऱ्याच्या सफाईसाठी केला, तर या समस्येपासून स्वतःचं संरक्षण करता येऊ शकतं. हिवाळ्यात चेहऱ्याची त्वचा नीट राहण्यासाठी काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्याची गरज असते. जाणून घेऊया, कुठल्या गोष्टी त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात. 

ॲलोविरा जेल

हिवाळ्यात चेहरा धुण्यासाठी तुम्ही ॲलोविरा जेलचा उपयोग करू शकता. त्यासाठी कोरफडीची काही पानं घ्या आणि त्यातील गर वेगळा काढा. या गराचा वापर करून चेहऱ्यावर मसाज करा आणि चेहरा धुवून टाका. दोन मिनिटे चेहऱ्यावर ॲलोविरा जेलचा समाज केल्यामुळे त्वचेच्या आर्द्रतेची पातळी वाढायला मदत होते आणि त्वचा कोरडी पडत नाही. 

अधिक वाचा - White hair remedy: पांढरे केस आणि दाढी पुन्हा होईल काळी, वापरून पाहा हे जादुई उपाय

दह्याचा वापर

चेहरा स्वच्छ करण्यासाठी दह्याचा वापरही करता येऊ शकतो. यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि ते हळूहळू पूर्ण चेहऱ्यावर लावा. एक ते दोन मिनिटं चेहऱ्यावर दही तसंच ठेवा आणि नंतर चेहरा धुऊन टाका. या उपायामुळे चेहऱ्यावरची चमक तशीच राहिल आणि तुमची त्वचा चमकू लागेल. 

कच्चं दूध

कच्चं दूध हादेखील त्वचा मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठीचा एक उत्तम उपाय आहे. कच्च्या दुधात फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेची स्निग्धता कायम राहते. कोरडी पडलेली त्वचा दूधातील घटक शोषून घेते आणि रुक्षपणा निघून जातो. त्यानंतर त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता असणारे घटक पुर्नस्थापित होतात आणि रुक्षपणा निघून जाण्यास मदत होते. त्यासाठी दोन चमचे कच्चं दूध घ्या. कापसाच्या मदतीने ते संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि चेहरा धुऊन टाका. दिवसातून दोनवेळी तुम्ही ही कृती करू शकता. 

अधिक वाचा - Green Light Therapy: रामबाण आहे ग्रीन लाईट थेरपी, जुन्यात जुनं दुखणंही होतं बरं

बटाट्याचा वापर

एक बटाटा घ्या आणि मिक्सरमधून काढा. त्यानंतर कापडाने हे मिश्रण गाळून घ्या. हा रस चेहऱ्यावर लावा आणि 5 मिनिटे तसाच ठेवा. त्यानंतर स्वच्छ आणि कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. त्यामुळे चेहरा स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावरील आर्द्रताही टिकून राहिल. चेहऱ्यावर असणारे डाग निघून जाण्यासही मदत होईल. 

मध

मधात मॉइश्चरायझिंग गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्वचेची साफसफाई कऱण्यासाठी त्याचा उत्तम वापर होऊ शकतो. कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर मध लावा आणि काही मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. 

डिस्क्लेमर - या लेखातील माहिती सामान्यज्ञानावर आधारित आहे. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न वा समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी