Cardiac Arrest : ‘हार्ट अटॅक’ आल्यावर काय करायचं? जीवन की मृत्यू हे ठरवणारी 5 मिनिटं असतात निर्णायक

हार्ट अटॅक आल्यावर पहिल्या पाच मिनिटांत मदत मिळाली नाही, तर रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता असते. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काही गोष्टी आपण करू शकतो.

Cardiac Arrest
‘हार्ट अटॅक’ आल्यावर काय करायचं?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हार्ट अटॅक आल्यावर तातडीने मदत मिळणे गरजेचे
  • पहिली पाच मिनिटे असतात महत्त्वाची
  • आहार आणि लाईफस्टाईल करा आरोग्यपूर्ण

Cardiac Arrest : हार्ट अटॅक (Heart Attack) हा असा एका रोग आहे, जो अचानक आपल्यावर हल्ला करतो. कुठलीही पूर्वसूचना न देताच (Symptoms) अनेकांना हार्ट अटॅक येतो. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांना अचानक हार्ट अटॅकनं गाठल्याचं आपण पाहतो. सध्या प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) हेदेखील हार्ट अटॅकशी लढत असून मृत्यूशी (Fight ) झुंज देत आहेत. हार्ट अटॅक आल्यावर माणसाचं हृदय अचानक रक्ताच्या पंपिंगची प्रक्रिया बंद करतं आणि त्याचा इतर अवयवांवर परिणाम व्हायला सुरुवात होते. हृदय, मेंदू, फुफ्फुसं, किडणी असे अनेक अवयव या झटक्याने निकामी किंवा निष्क्रीय होण्याची शक्यता असते. काही मिनिटांतच हार्ट अटॅकचा पूर्ण शरीरावर प्रभाव पडतो आणि व्यक्ती बेशुद्ध होण्याची शक्यता असते. अनेकदा हार्ट अटॅक जीवघेणा ठरू शकतो. हार्ट अटॅक आल्यानंतर पुढच्या पाच मिनिटांत जर रुग्णाला उपचार मिळाले नाहीत, तर त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते. जीवन आणि मृत्यूमध्ये अंतर असतं केवळ पाच मिनिटांचं. या पाच मिनिटांत जर व्यक्तीला योग्य ते उपचार मिळाले, तर तिचा जीव वाचण्याची शक्यता असते. जाणून घेऊया हार्ट अटॅकची लक्षणं आणि तो आल्यावर तातडीने काय उपाय करता येतात, याविषयी. 

हार्ट अटॅकची लक्षणे

हार्ट अटॅक हा तीव्र आणि वेदनादायी असतो. यामुळे व्यक्ती बेशुद्ध होते. त्याचा श्वास बंद पडण्याची शक्यता असते. छातीत अस्वस्थता वाटू लागते. हृदयाती गती वाढते आणि ठोक्यांमध्ये अचानक वाढ झाल्याचं दिसतं. अशी लक्षणं दिसली तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणं आवश्यक आहे. 

अधिक वाचा - 10,000 Steps Workout: वजन कमी करण्यासाठी प्रत्येकाने १० हजार पावलं चाललं पाहिजे? जाणून घ्या सत्य

असा वाचवावा रुग्णाचा जीव

जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला, तर त्याला लगेच सीपीआर म्हणजे लाईफ सेव्हिंग टेक्निकचा वापर करून मदत देणं गरजेचं असतं. यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवता येऊ शकतो. जर हार्ट अटॅक आल्यावर व्यक्तीला तातडीची मदत मिळाली नाही, तर त्याचा जीव जाऊ शकतो. सीपीआरसाठी बेशुद्ध व्यक्तीला सर्वप्रथम सरळ झोपवावं. त्यानंतर त्याच्या छातीवर दोन्ही हात ठेऊन एका मिनिटांत 100 वेळा कम्प्रेस करावं. जोपर्यंत अँब्युलन्स येत नाही, तोपर्यंत याच गतीने सीपीआर देत राहणं गरजेचं आहे. यामुळे व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता असते. अनेकदा यामुळे बेशुद्ध झालेली व्यक्ती शुद्धीवरही येते. 

अधिक वाचा - Hing Water: प्या एक ग्लास हिंगाचे पाणी, होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

असा टाळा अटॅक

हार्ट अटॅक टाळण्यासाठी तुम्हाला उत्तम आहार आणि चांगली लाईफस्टाईल बाळगणं गरजेचं आहे. आहारातून गोड आणि तेलकट पदार्थ कमी करून पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही मद्यपान आणि धुम्रपान करत असाल, तर ताबडतोब ते बंद करा आणि आरोग्यपूर्ण आयुष्याला सुरुवात करा. 

डिस्क्लेमर - हार्ट अटॅकबाबतच्या या सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला यासंबंधी काही गंभीर समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी