मुंबई : हायपरअॅसिडीटी (Hyperacidity) ही एक गंभीर समस्या असून या समस्येमुळे खूप लोक त्रस्त आहेत. हायपर अॅसिडीटीला आपण पित्त म्हणून ओळखतो. अन्न पचणे (Digestion of food) आणि पचन तंत्र योग्य पद्धतीने काम करावे यासाठी पित्त खूप गरजेचे असते. पण जेव्हा पित्त अधिक प्रमाणात तयार होते तेव्हा तुम्हाला अॅसिडिटी आणि अॅसिड रिफ्लक्ससारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. (hyperacidity intestines will become jaundice)
हायपरअॅसिडीटीपासून वाचण्यासाठी मसालेदार अन्न टाळावे, फळे आणि भाज्यांचे अधिक सेवन करावे, पुरेसे पाणी प्यावे, वेळेवर खावे, जेवण वगळू नये आणि रिकाम्या पोटी कॅफिनचे सेवन करू नये.
Read Also : कमाईत Six मारण्यासाठी Hardikकडे मोठं-मोठ्या ब्रँडची रांग
पोटात जास्त पित्त निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जेवणात अशा पदार्थाची जोड. जे सोबत खाल्ल्याने आपल्याला हा त्रास उद्भभवत असतो. चुकीचे फूड कॉम्बीनेशन न केवळ हायपरअॅसिडिटीला आमंत्रण देतात पण अजून एके गंभीर समस्या निर्माण करू शकतात. तुम्ही कधीच दुध आणि मासे यांचे एकत्रित सेवन केले नाही पाहिजे. हे अत्यंत चुकीचे फूड कॉम्बीनेशन आहे. याशिवाय दुध आणि मीठ सुद्धा कधीच एकत्र खाऊ नये. जर खाल्ले तर तुम्हाला हायपरअॅसिडिटी होण्याची शक्यता बळावते.
Read Also : BCCI कोहलीची मानसिकता करतेय कणखर, अॅप्टनकडे दिलीय जबाबदारी
शिळे अन्न खाण्याच्या नुकसानाची लिस्ट तर तशी खूप मोठी आहे. शिळे अन्न हे आरोग्यासाठी तर हानिकारक आहेत पण यामुळे अॅसिडिटी आणि फूड पॉइजनिंग देखील होऊ शकते.
जर तुम्ही कमी खात असाल व आहार सोडला असले तर त्यामुळे देखील पित्त निर्माण होऊ शकते. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी जसे की अनियमित भोजन करणे, भोजन कमी करणे वा अजिबातच न करणे, मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे, फास्ट फूडचे सेवन करणे यामुळे अॅसिडिटी होऊ शकते.
तुम्ही बिअर आणि वाईनचे शौकीन असाल तर तुम्हाला तुमची ही सवय सुद्धा बदलण्याची गरज आहे. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात बिअर व वाईन पीत असाल तर त्याचे परिणाम म्हणून शरीरात पित्त वाढते आणि मग अॅसिडिटीची समस्या निर्माण होते.
जर तुम्ही पॅकेज्ड किंवा गोठवलेले फ्रोजन फूड वारंवार खाणाऱ्यांपैकी एक असाल तर तुम्ही असे करणे टाळावे. या गोष्टींमुळे पोटात गॅस निर्माण होतो.
(टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही.)