मुंबई: हाय ब्लड प्रेशरचा(high bp) आजार असलेल्यांची संख्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, लोक मोठ्या प्रमाणात याच त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र तरीही यश मिळत नाही. अखेर इच्छा नसतानाही गोळ्यांची मदत घ्यावी लागते. तुम्ही पाहिले असेल की काहीवेळेस अनेकांचा बीपी अचानक वाढतो. अशा स्थितीत अनेक लोक घाबरुन जातात. मात्र परिस्थीला घाबरण्यापेक्षा समझदारीने काम करा. जाणून घेऊया बीपी अचानक वाढल्यास काय करावे...If blood pressure increases then do this 3 things
अधिक वाचा - नाणार प्रकल्प रत्नागिरीतच पण..., सीएमचं थेट पीएमला पत्र
ब्लड प्रेशर वाढल्याने रुग्णांना अनेक प्रकारचा त्रास होतो. जसे डोकेदुखी, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, त्वचेवर लाल चट्टे दिसणे. ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी एक्सरसाईज आणि डाएट दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ब्लड प्रेशर जर कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर तुम्हाला एक्सरसाईज करण्यासोबत डाएटमध्ये पोष्टिक गोष्टींचा समावेश केला पाहिजे.
ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी व्हिटामिन सीचे सेवन केले पाहिजे. आंबट फळांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्स खूप असतात ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते. तुम्ही आंबट फळांमध्ये द्राक्षे, संत्री, लिंबाचे सेवन करू शकता.
अधिक वाचा - तब्बल ११ वर्षानंतर या खेळाडूने पुन्हा खेळला IPL चा सामना
याशिवाय बेरीजमुळेही बीपी कंट्रोल राहतो. हे खाल्ल्याने तुमचा बीपी कंट्रोलमध्ये राहतो. अँटी ऑक्सिडंट आणि फ्लॅवेनोईडने भरलेली बेरीज केवळ आपल्याला आरोग्यदायीच ठेवत नाही तर अनेक आजारांचा धोका कमी करतात.