मुंबई: कोलेस्ट्रॉल(cholestrol) नाव ऐकताच आपल्याला लगेचच भीती वाटू लागते की हे शरीरात वाढले तर काय होईल.. मात्र हे कोलेस्ट्रॉल चांगले आणि वाईट या दोन प्रकारांचे असते. बॉडीमध्ये(body) निरोगी सेल्स(cells) वाढवण्यासाठी रक्तात चांगले कोलेस्ट्रॉलची गरज अशते. मात्र जेव्हा खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएलचे प्रमाण वाढते तेव्हा नसांमध्ये फॅट जमा होऊ लागते यामुळे रक्तसंचार होण्यास अडथळा निर्माण होतो. अनेकदा हाय कोलेस्ट्रॉलच्या कारणामुळे ब्लड क्लॉटिंग(blood clotting) होण्याची शक्यता असते. If cholestrol level increase body gives this symptoms
अधिक वाचा - UPSC परीक्षेत सामान्य कुटुंबातील मुलांची असामान्य कामगिरी
जेव्हा शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा धमन्यांमध्ये फॅट जमा होऊ लागते. यात नसांमधील रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो. हात आणि पायांच्या बोटांना योग्य प्रमाणात रक्त पुरवठा नीट न झाल्याने नखांचा रंग हलका गुलाबी ते पिवळा होऊ लागतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यास या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
जेव्हा पाय सुन्न होत असतील तेव्हा हे अजिबात हलक्यात घेऊ नका. हा हाय कोलेस्ट्रॉलटा इशारा असू शकतो. याचा अर्थ आहे की आर्टरीजच्या माध्यमातून ब्लड फ्लो आणि ऑक्सिजन सप्लायमध्ये अडथळा ठरू शकतो. या कारणामुळे पाय दुखी आणि त्यामुळे सुन्न पडणे, झिणझिण्या येणे हे सामान्य आहे.
अधिक वाचा - इतरांसमोर चुकूनही करू नका या ४ गोष्टींची चर्चा
शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याचा सरळ परिणाम हाय ब्लड प्रेशरशी आहे. रक्तामध्ये जितके फॅट जास्त वाढेल त्यामुळे ब्लडप्रेशर वाढेल. या कारणामुळे जेव्हा कोलेस्ट्रॉलमुळे ब्लड सप्लायमध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा रक्ताला हृदयापर्यंत पंप करण्यासाठी आर्टरीजला खूप जोर टाकावा लागतो.