Health Tips: पोट साफ होत नसेल तर आहारात करा या गोष्टींचा समावेश; लगेच मिळेल आराम

तब्येत पाणी
Updated May 28, 2022 | 11:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Upset stomach | काही लोक नेहमी पोटाच्या समस्यांमुळे त्रस्त असतात. काहीही खाल्ले करी त्यांना पोटदुखी, बद्धकोष्ठता अशा समस्यांचा त्रास होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत अपचन दूर होऊन पोट साफ होण्यासाठी काय खावे हेच अनेकांना समजत नाही.

If the stomach is not cleansing, include these things in the diet
पोट साफ होत नसेल तर आहारात करा या गोष्टींचा समावेश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काही लोक नेहमी पोटाच्या समस्यांमुळे त्रस्त असतात.
  • सफरचंद हे कॅल्शियम, प्रोटीन, आयरन, जिंक आणि मॅग्नेशियम यांसारख्या घटकांनी समृद्ध आहे.
  • एवोकॅडो हे पोटाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

Stomach problem । मुंबई : काही लोक नेहमी पोटाच्या समस्यांमुळे त्रस्त असतात. काहीही खाल्ले करी त्यांना पोटदुखी, बद्धकोष्ठता (Acidity) अशा समस्यांचा त्रास होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत अपचन दूर होऊन पोट साफ होण्यासाठी काय खावे हेच अनेकांना समजत नाही. अशा वेळी या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आज आपण अशा काही पदार्थांच्या सेवनाविषयी भाष्य करणार आहोत, ज्यामुळे काही दिवसांतच पोटाची समस्या दूर होईल आणि तुम्हाला औषधाचीही गरज भासणार नाही. (If the stomach is not cleansing, include these things in the diet). 

अधिक वाचा : म्हणून गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनणे कठीण, वाचा सविस्तर

पोट साफ ठेवतील या ४ गोष्टी (These 4 things will keep the stomach clean)

  1. सफरचंद (Apple) - सफरचंद हे फळ कॅल्शियम, प्रोटीन, आयरन, जिंक आणि मॅग्नेशियम यांसारख्या घटकांनी समृद्ध आहे. हे सर्व पोषक घटक आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. या फळाचा समावेश तुम्ही तुमच्या नियमित आहारात करू शकता.
  2. रताळे (Sweet Potato) - रताळे हा एक फळांचा प्रकार आहे, या फळांचे सेवन सर्वचजण करतात. लक्षणीय बाब म्हणजे हे फळ पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासही मदत करते. रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते पोटाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. तुम्ही ते शिजवून किंवा कोरडे तसेच भाजून देखील खाऊ शकता.
  3. अंबाडीच्या बिया (Whole Flaxseed) - अंबाडीच्या बिया पोट साफ करण्यासही खूप मदत करतात. यामुळे ॲसिडिटी, पोटदुखी आणि क्रॅम्पच्या समस्येपासून त्वरित आराम मिळतो. तुम्ही ते थेट किंवा बारीक करून सेवन करू शकता.
  4. एवोकॅडो (Avocado) - एवोकॅडो हे पोटाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. यामुळे ॲसिडीटी, अल्सर, आतड्यांमध्ये जळजळ इत्यादी समस्यांपासून त्वरित आराम मिळतो. त्याचबरोबर अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे या समस्याही एवोकॅडोच्या सेवनाने दूर होतात.

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी