Health Tips: अंगावर खाज येत असेल तर करा हे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

तब्येत पाणी
Updated Jun 04, 2022 | 16:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Remedies For Itching । जास्त उष्णता, ऊन आणि घाम यांमुळे शरीरात खाज येण्याची समस्या वाढते. गरमीच्या दिवसात लोक अनेकदा काटेरी उष्णतेची अर्थात घामोळ्यांची तक्रार करू लागतात, ज्यामुळे खूप खाज सुटते.

If there is itching on the body, do this home remedy, you will get relief immediately
अंगावर खाज येत असेल तर करा हे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जास्त उष्णता, ऊन आणि घाम यांमुळे शरीरात खाज येण्याची समस्या वाढते.
  • ऊन्हाळ्यात घामामुळे फंगल इन्फेक्शन होऊन खाज सुटते.
  • लिंबाच्या रसामध्ये जैविक घटक आढळतात, ज्यामुळे खाज शांत होते.

Remedies For Itching । मुंबई : जास्त उष्णता, ऊन आणि घाम यांमुळे शरीरात खाज येण्याची समस्या वाढते. गरमीच्या दिवसात लोक अनेकदा काटेरी उष्णतेची अर्थात घामोळ्यांची तक्रार करू लागतात, ज्यामुळे खूप खाज सुटते. अनेक वेळा उन्हाळ्यात घामामुळे फंगल इन्फेक्शन होऊन खाज सुटते. दरम्यान आता या समस्येवर तोडगा म्हणून एक रामबाण उपाय समोर आला आहे. कारण खाज सुटण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही औषधांऐवजी काही प्रभावी घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. आज आपण अशाच काही घरगुती उपायांबद्दल भाष्य करणार आहोत ज्याचा अवलंब केल्याने तुम्हाला खाज येण्यापासून आराम मिळेल. (If there is itching on the body, do this home remedy, you will get relief immediately). 

अधिक वाचा : मित्र बनवण्यासाठी माहिर असतात या राशीतील लोक, वाचा सविस्तर

  1. बर्फाने शेकवा - जर तुम्हाला खाज येण्याची समस्या खूप त्रास देत असेल, तर तुम्ही सुती कपड्यात बर्फाचे तुकडे टाकून त्याद्वारे खाज येत असलेल्या जागेला शेकवू शकता. थंड बर्फाने शेकवल्यास खाज येत असलेल्या जागेला खूप आराम मिळतो. ज्या भागात तुम्हाला खाज येत आहे त्या जागेवर बर्फाचे तुकडे दाबून धरा. त्यामुळे खाज आणि सूजही कमी होईल.
  2. कॅलामाइन लोशन - खाज येण्याची समस्या वाढल्यास डॉक्टर कॅलामाइन लोशन लावण्याचा सल्ला देतात. यामुळे खाज कमी होण्यास मदत होते. या लोशनने खाज येणाऱ्या भागाला काही सेकंद मसाज करा. त्यामुळे तुम्ही कॅलामाइन लोशनने मसाज करा. 
  3. खोबरेल तेल - जर तुमची त्वचा हायड्रेटेड आणि गुळगुळीत राहिली तर खाजही कमी होते. यासाठी अंघोळीनंतर त्वचा स्वच्छ व कोरडी करा आणि नंतर त्वचेतून तेल सुकत नाही तोपर्यंत खाजलेल्या भागावर खोबरेल तेलाने मसाज करा. दिवसातून दोनदा असे करा. यामुळे खाज आणि जळजळीतपणावर खूप आराम मिळेल.
  4. एलोवेरा जेल - जर तुम्हाला खाज येत असेल तर त्या भागावर थोडेसे एलोवरा जेल लावून मसाज करा. एलोवेरा जेल दिवसातून दोनदा लावल्याने खाज शांत होण्यास मदत होते. एलोवेरा जेलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा मुलायम होते. 
  5. लिंबाचा रस - लिंबाच्या रसामध्ये जैविक घटक आढळतात, ज्यामुळे खाज शांत होते. तुम्ही लिंबाचा रस थोड्याशा पाण्यात मिसळून खाज सुटलेल्या भागावर लावा. असे केल्यास तुम्हाला खूप आराम मिळेल.

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी