Tea Side Effects: 'चहा' हे फक्त पेय नाही. हे काही लोकांसाठी आरामदायी आहे, काहींसाठी जीवनरेखा आहे. काही लोकांची सकाळ चहाशिवाय होत नाही. जवळच्या मित्राचे मन वळवणे असो किंवा एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा असो, सगळेच चहाच्या माध्यमातून सोडवले जाते. अशा परिस्थितीत चहाचे घोट घेणे सर्वांनाच आवडते.
चहाची क्रेझ अशी आहे की लोक दिवसातून 7-8 कप चहा पितात. मात्र चहाचे अतिसेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. आज आम्ही तुम्हाला चहामुळे होणाऱ्या हानीबद्दल सांगणार आहोत, तसेच दिवसातून किती कप चहा आरोग्यासाठी चांगला आहे, चला तर मग जाणून घेऊया-
डॉक्टर आणि आहारतज्ञांच्या मते, दिवसातून 3-4 कप चहा पिणे सामान्य आणि चांगले आहे. यामुळे आरोग्याची फारशी हानी होत नाही, याशिवाय सकस आहार घेणंही तितकचं महत्त्वाचं आहे. 4 कपापेक्षा जास्त चहा पिणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
ज्या लोकांना कॅफिनची ऍलर्जी आहे त्यांनी चहा पिणे टाळावे. कारण चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अॅलर्जीची समस्या वाढू शकते. त्याचबरोबर ज्या लोकांना निद्रानाश, ऍसिडिटी, आजार आणि अस्वस्थता आहे, त्यांनीही चहाचे सेवन करू नये.
चहाचे नियमित सेवन केले तर ते आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. चहाच्या अतिसेवनामुळे डिहायड्रेशन होते. याशिवाय चहाच्या सेवनाने हाडेही कमकुवत होतात, ज्यामुळे सांधेदुखीची समस्या उद्भवते. याशिवाय चहाचे जास्त सेवन केल्याने गॅस बनणे आणि आतड्यांसंबंधी समस्या देखील होऊ शकतात.
( डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)