Vomiting In Travelling: प्रवासादरम्यान तुम्हालाही होत आहेत उलट्या; तर हे करा घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

तब्येत पाणी
Updated Apr 06, 2022 | 15:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

VOMITING DURING TRAVEL । प्रवासादरम्यान अनेक लोकांना उलट्यांचा त्रास जाणवू लागतो. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल ज्यांना प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

If vomiting occurs during travel do these 5 remedies at home
प्रवासादरम्यान उलट्या होत असतील तर करा हे उपाय   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आले ही एक मसालेदार वनस्पती आहे, आल्यामध्ये असे गुणधर्म असतात.
  • मळमळ होत असेल तर केळी खाल्ल्याने आराम मिळू शकतो.
  • केळी पोटॅशियम रिस्टोर करण्यास मदत करू शकतात.

VOMITING DURING TRAVEL । मुंबई : प्रवासादरम्यान अनेक लोकांना उलट्यांचा (Vomiting) त्रास जाणवू लागतो. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल ज्यांना प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अनेकदा प्रवासादरम्यान लोकांना उलट्या, अस्वस्थता अशा प्रमुख समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशी लोक अनेकदा लांबचा प्रवास करणे टाळतात. (If vomiting occurs during travel, do these 5 remedies at home). 

दरम्यान आज आपण अशा काही खाद्यपदार्थांबाबत भाष्य करणार आहोत जे तुम्ही प्रवासादरम्यान सोबत ठेवणे गरजेचे आहे. हे पदार्थ तुम्हाला उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्यांपासून आराम देऊ शकतात. प्रवासादरम्यान होणाऱ्या उलट्यांवर काही प्रभावी उपाय आहेत ते खालीलप्रमाणे. 

अधिक वाचा : एसटी कामगारांना 15 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम

  1. आले - आले ही एक मसालेदार वनस्पती आहे, आल्यामध्ये असे गुणधर्म असतात जे मळमळ होण्याची समस्या टाळण्यास मदत करतात. ते पोटाची जळजळ कमी करतात आणि त्वरित आराम देतात. प्रवासादरम्यान तुम्हाला उलट्यांचा त्रास होत असेल, तर तुम्ही देखील प्रवासादरम्यान सोबत आले ठेवावे. आल्याचा चहा, कँडी चहा किंवा गरम पाण्यात एक चमचे ठेचलेले आले टाकू शकता. असे केल्यास अस्वस्थता आणि उलट्यांपासून होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो. 
  2. केळी - जर तुम्हाला मळमळ होत असेल तर केळी खाल्ल्याने आराम मिळू शकतो. केळी पोटॅशियम रिस्टोर करण्यास मदत करू शकतात. याशिवाय केळी खाल्ल्याने उलटीच्या समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका मिळते. त्यामुळे जर तुम्हीही लांबच्या प्रवासादरम्यान उलट्या आणि मळमळण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी केळी फलदायी आहे. 
  3. लिंबू - प्रवासादरम्यान तुम्हाला वारंवार उलट्या होत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास तुम्ही लिंबू सतत सोबत ठेवावे. लिंबू तुम्हाला उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्यांपासून आराम देऊ शकतो. प्रवासादरम्यान नेहमी गरम पाणी सोबत ठेवा. उलट्या किंवा मळमळ सुरू होताच हे पाणी लिंबाचा रस आणि मीठ मिसळून प्या. काही क्षणातच तुम्हाला या समस्येपासून आराम मिळेल. 
  4. पुदीना - प्रवासादरम्यान जर तुम्हाला उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्यांमुळे त्रास होत असेल, तर तुमच्या समस्येवर पुदिना सर्वोत्तम उपचार ठरू शकते. पुदिना पोटात थंडावा ठेवतो आणि स्नायूंनाही आराम देते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पुदिन्याच्या गोळ्या खाऊ शकता किंवा पुदिन्याचे सरबत बनवूनही पिऊ शकता.

अधिक वाचा : शिवसेना कार्यालयासमोर पोस्टर लावत उद्धव ठाकरेंवर मनसेची टीका

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी