Ways to remove hair from body: दोनी पुरूष आणि महिसांच्या शरीरावर केस असण साधी गोष्ट आहे. ताण, खराब आहार आणि हार्मोनल चढउतार यामुळे केसांची वाढ सामान्यपेक्षा जास्त होऊ शकते. शरीरावर जास्त केस असतील, तर चांगले नाही वाटत. हे फक्त तुमच्या व्यक्तिमत्वालाच खराब नाही करत, ते सौंदर्य कमी करण्यासाठी देखील जबाबदार आहेत. तसेच शरीरावरचे केस साफ करणे कष्टाचे आणि वेळखाऊ काम आहे. काहीवेळा यानंतर, त्वचेवर लाल ठिपके आणि खुणा देखील दिसतात. विशेषत: संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना सौम्य वेदना जाणवते.
अस तर शरीरावरचे केस काडण्यासाठी वॅक्सिंग, शेव्हिंग आणि थ्रेडिंग सगळ्यात साधी गोष्ट आहे. याचामुळे तुमची त्वचा सुंदर आणि केसांपासून मुक्ती मिळते. जर तुम्हाला सर्व पद्धतींचा कंटाळा आला असेल तर तुम्ही काही नैसर्गिक पद्धती वापरून पाहू शकता. हा उपाय केसांची वाढ कमी करण्यास आणि केस हलके करण्यास मदत करेल.
अधिक वाचा : Thane : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 4 दिवस पाणीकपात
कच्च्या पपईचे हळद आणि मिश्रण केस स्वच्छ करण्यासाठी एक चांगली कृती आहे. खरतर, पपईमध्ये पपेन एन्झाइम असते, जे केसांची वाढ कमी करण्यास मदत करते. दुसरीकडे, हळदीमध्ये बॅक्टेरियाशी लढण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स असतात, म्हणून ते संवेदनशील त्वचेसाठी चांगले कार्य करते. यासाठी थोडे कच्चे पपईचे मिश्रण करून घ्या, आता ह्यात दोन चमचे हळदी पाउडर टाका. आता दोघांच मिश्रण करून पेस्ट तयार करून घ्या आणि आपल्या पूर्ण चेहऱ्यावर व शरीरावर लावा. याला १५ ते २० मिनिटापर्यंत राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवून घ्या. याला आठवच्यातून एक ते दोन वेळा प्रयत्न करा. शरीरावर केसांची वाढ कमी होईल.
मध एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. साखर त्वचेचे एक्सफोलिएट करून डेड स्किन सेल्स काढून टाकण्यास मदत करते. तसेच लिंबू एक ब्लीचिंग एजंट आहे. हो तीन तत्व निळून नाही हवे असलेले केसांपासून सुटका करून घेण्याचे चांगले काम करू शकतो. यासाठी एका भांड्यात टेबलस्पून साखर, मध आणि लिंबू मिसळा. याला तोपर्यंत गरम करा, जोपर्यंत मेणाची पेस्ट होत नाही. गरज असेल तर ह्यात थोड पाणी टाका आणि आपल्या शरीराच्या एक छोट्याशा भागावर लावा. केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने वॅक्सिंग स्ट्रिप, पॅट आणि पट्टीने क्षेत्र झाकून टाका. पप्रक्रिया सुरू करण्यापूर्वी टॅल्कम पावडर लावा. एकदा आपण पूर्ण केल्यावर, त्वचा कोरडे होऊ नये म्हणून मॉइश्चरायझर लावा.
अधिक वाचा : सोनू निगम आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की
हळद हे अँटीऑक्सिडंट आहे, तर बेकिंग सोडा स्क्रबर म्हणून काम करते. हे दोन तत्व मिक्स केल्याने केसांची वाढ कमा करण्यात काम करते. वापर करण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडामध्ये एक चमचा हळदी पावडर टाका. थोड पाणी टाका आणि साहित्य मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. लावल्यानंतर हलक्या हाताने मालिश करा आणि १५ ते २० मिनिटासाठी सोडून द्या. आता कोमट पाण्यामध्ये धुवून कोरडे करा.
तेल मालिश शरीराचे केस काडण्यासाठी खूप अप्रतिम आणि नैसर्गिक मार्ग आहे. जेव्हा तुम्ही नियमित पणे गरम तेलाने शरीराची मालिश करता, तर त्वचे वर होणाऱ्या घर्षण केसांना पातळ आणि रलके बनवून टाकते. नियमित मसाज केल्याने केसांची मुळे कालांतराने रोखण्यास मदत होते. मसाज करण्यासाठी तुम्ही एरंडेल, नारळ, मोहरी, चहाचे झाड किंवा तिळाचे तेल निवडू शकता. मालिश करण्यापूर्वी तेल थोडे गरम करा. यामुळे तुमच्या केसांची वाढ खूप कमी होईल आणि केस कडक नाही येणार.
हे एक सोपे आणि केसांना काढण्यासाठी पील ऑफ मास्क आहे. जेव्हा तुमच्या त्वचेवर दूधाच्या पेस्टबरोबर कॉर्नफ्लोअर लावले जातं, तर हे हळदीने केसांच्या कूपांना चिकटवते आणि घट्ट धरून ठेवते. जेव्हा तुम्ही मास्कला काढता, तर सगळे मुलायम केस निघून जातात. लक्षात ठेवा की हे दूध आणि कॉर्नफ्लोअरचे मिश्रण खरखरीत केस असलेल्या लोकांसाठी काम करणार नाही. ते वापरण्यासाठी अर्धा कप कॉर्न फ्लोअरमध्ये एक छोटा कप दूध मिसळून पेस्ट बनवा. ज्या ठिकाणी तुम्हाला केस काढायचे आहेत त्या ठिकाणी ही पेस्ट लावा. 20 मिनिटे पूर्णपणे कोरडे होऊ द्या आणि नंतर हलक्या हाताने थपथपून काढून टाका.