Diabetes : डायबिटीज रूग्ण असाल तर उपाशी पोटी खा ‘ही’ 5 प्रकारची पाने; शुगर राहील नियंत्रणात

मधुमेह हा एक सामान्य आजार (disease) आहे, जो कधीच बरा होऊ शकत नाही, जो फक्त नियंत्रित केला जाऊ शकतो. योग्य आहार आणि उत्तम जीवनशैलीने (healthy lifestyle) तुम्ही डायबिटीज नियंत्रणात ठेवू शकता. मधुमेह (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी असा कोणताच इलाज नाही. याचा अर्थ असा की जर एखाद्याला मधुमेह असल्याचे निदान झाले तर हा आजार त्याला आयुष्यभर सोडत नाही.

Diabetes: ‘These’ 5 types of leaves will keep sugar under control
Diabetes : ‘ही’ 5 प्रकारची पाने शुगर ठेवतील नियंत्रणात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • इन्सुलिन हे स्वादुपिंडाने बनवलेला एक हार्मोन आहे जे खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज रक्तप्रवाहातून शरीराच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यास अनुमती देते.
  • मधुमेहाच्या रुग्णांना लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारख्या आजारांचाही धोका जास्त असतो.
  • जैतुन किंवा ऑलिव्हची पाने चघळल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो.

नवी दिल्ली : मधुमेह हा एक सामान्य आजार (disease) आहे, जो कधीच बरा होऊ शकत नाही, जो फक्त नियंत्रित केला जाऊ शकतो. योग्य आहार आणि उत्तम जीवनशैलीने (healthy lifestyle) तुम्ही डायबिटीज नियंत्रणात ठेवू शकता. मधुमेह (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी असा कोणताच इलाज नाही. याचा अर्थ असा की जर एखाद्याला मधुमेह असल्याचे निदान झाले तर हा आजार त्याला आयुष्यभर सोडत नाही. स्वादुपिंड (Pancreas) इन्सुलिन (Insulin) तयार करू शकत नाही किंवा जेव्हा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही तेव्हा मधुमेह होतो. इन्सुलिन हे स्वादुपिंडाने बनवलेला एक हार्मोन आहे जे खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज रक्तप्रवाहातून शरीराच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यास अनुमती देते. 

मधुमेहाच्या रुग्णांना लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारख्या आजारांचाही धोका जास्त असतो. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते. संशोधनांनुसार, पाच प्रकारच्या वनस्पतींची पाने चघळल्याने आपल्या शरीरात साखर नियंत्रित राहू शकते. 

Read Also : गावात रामायण सुरू असताना आम्हाला झोप येत नाही, वाचा सविस्तर

तुळशीची पाने

पारंपारिक औषधांचे काही अभ्यासक सामान्यतः रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी तुळशीची पाने चघळण्याची शिफारस करतात. 2019 मध्ये उंदरांवर केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळून आले की तुळशीच्या पानांच्या अर्कामध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याची क्षमता असते. 

जैतून किंवा ऑलिव्हची पाने

जैतुन किंवा ऑलिव्हची पाने चघळल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. 2013 च्या अभ्यासात, संशोधकांनी 46 मध्यमवयीन पुरुषांना ऑलिव्हच्या पानांचे सेवन करण्यास सांगितले. संशोधकांना असे आढळून आले की ज्या लोकांनी ऑलिव्हची पाने खाल्ली होती त्यांच्या इन्सुलिन रेसिस्टेंटमध्ये 12 आठवड्यांनंतर लक्षणीय सुधारणा झाली होती.

बेडकीचा पाला किंवा गुडमार

गुडमारला जिमनेमा सिल्वेस्ट्रे म्हणतात जी एक औषधी वनस्पती आहे. भारतात आढळणारी ही औषधी वनस्पती रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ओळखली जाते. 2013 च्या अभ्यासानुसार, टाइप 1 किंवा टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आल्या आहेत. 

Read Also : राज्यात प्रथम येणाऱ्या चौगुलेचे पप्पा आहेत टेम्पो चालक

स्टीव्हिया किंवा गोड तुळस

अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) आणि अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (एडीए) नुसार, स्टीव्हिया ही मधुमेह असलेल्या लोकांसाठी एक फायदेशीर वनस्पती आहे. 2018 च्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की ज्या रुग्णांनी गोड तुळस खाल्ली होती त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी एक ते दोन तासांत कमी होऊ लागली.

शलगमची पाने

शलगम या हिरव्या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे 1 कपमध्ये दररोज 5 ग्रॅम फायबर शरीराला प्रदान करते. अभ्यासात असे दिसून आले आहे की टाइप 1 मधुमेह असलेले लोक जे फायबरचे सेवन करतात त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी असते. तर टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखर, लिपिड आणि इन्सुलिनची पातळी यामुळे सुधारू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी