Health Tips: सतत लघवीला जाण्याच्या समस्येने झालाय त्रस्त? हे घरगुती उपाय केल्याने काही मिनिटांतच मिळेल आराम

तब्येत पाणी
Updated Jun 24, 2022 | 11:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Frequent urination causes । काही वेळा लोकांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो, ज्या समस्या खूपच वैयक्तिक असतात. कारण काही लोकांना सतत लघवी होण्याचा त्रास जाणवत असतो.

If you are constantly urinating, you can get relief in a few minutes by doing this home remedy
सतत लघवीला होत असल्यास करा हे प्रभावी घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सतत लघवीला होत असल्यास करा हे प्रभावी घरगुती उपाय.
  • लघवीत जळजळ होण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी पुरेसे पाणी पिले पाहिजे.
  • जळजळ आणि लघवीतील संसर्ग दूर करण्यासाठी तुम्ही लसणाचे सेवन करू शकता.

Frequent urination causes । मुंबई : काही वेळा लोकांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो, ज्या समस्या खूपच वैयक्तिक असतात. कारण काही लोकांना सतत लघवी (Urine) होण्याचा त्रास जाणवत असतो. वारंवार लघवीला झाल्याचा भास होतो आणि वारंवार शौचालयात जाण्याची गरज भासते. यामुळे लघवीमध्ये जळजळ देखील होते. लक्षणीय बाब म्हणजे काही वेळा असे संक्रमणामुळे देखील होऊ शकते. जळजळ होण्याबरोबरच, खालच्या ओटीपोटात दुखणे यासारख्या समस्या देखील सामान्य आहेत. संसर्गाव्यतिरिक्त, जे लोक पुरेसे पाणी पीत नाहीत त्यांना लघवीमध्ये जळजळ देखील होऊ शकते. (If you are constantly urinating, you can get relief in a few minutes by doing this home remedy). 

दरम्यान, यासाठी प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान ८ मोठे ग्लास भरून किंवा तीन लीटर पाणी प्यावे. तसेच तिखट मसाला जास्त खाल्ल्याने लघवीत जळजळ होते. काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून लघवीत जळजळ होण्यापासून आराम मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते उपाय आहेत, ज्याचा अवलंब केल्याने या समस्येपासून आराम मिळू शकतो.

अधिक वाचा : राजकीय घडामोडींवर शेट्टी यांनी दिली पहिल्यांदाचं प्रतिक्रिया

सतत लघवी होत असल्यास करा हे घरगुती उपाय

  1. पुरेसे पाणी प्या - लघवीत जळजळ होण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, आपण प्रथम पुरेसे पाणी पिणे सुरू केले पाहिजे. यासाठी लिंबूपाणी आणि पुदिना अर्क वापरा, यामुळे संसर्ग वाढण्यापासून रोखण्यास मदत होते.
  2. लसणीचा वापर करा - जळजळ आणि लघवीतील संसर्ग दूर करण्यासाठी तुम्ही लसणाचे सेवन करू शकता. यामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे जंतूंशी लढण्याचे काम करतात. लसूण संसर्ग दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
  3. फळांचा ज्यूस प्या - यासाठी रामबाण उपाय म्हणजे हंगामी फळांच्या रसाचे सेवन करणे. यासोबतच हिरव्या भाज्यांचे अधिकाधिक सेवन करा. फळांचे रस आणि हिरव्या भाज्या तुमच्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी आणि पाण्याची पातळी राखण्यासाठी काम करतील.
  4. नारळाचे पाणी प्या - लघवीशी संबंधित काही समस्या असल्यास नारळाच्या पाण्याचे नियमित सेवन करावे. नारळ पाणी हे अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा नैसर्गिक स्रोत आहे. यासोबतच हे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे कामही चांगले करते. नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास लघवीला जळजळ होत नाही. यासोबतच लघवाची मार्ग स्वच्छ होतो तसेच पुन्हा पुन्हा लघवी करण्याची गरज भासत नाही. 

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी