Excessive Thirst: वारंवार पाणी पिऊनही तुमची तहान भागत नसेल तर असू शकतात हे आजार...

Health Tips : साधारणपणे एका वेळेस अर्धा ते एक लिटर पाणी तहान भागवण्यासाठी पुष्कळ होते. आपले शरीर आपल्या आरोग्याविषयी (Health)आणि आजारांविषयी विविध संकेत देत असते. मात्र काहींना सतत तहान (Excessive Thirst) लागते. कितीही पाणी प्यायले तरी समाधान होत नाही. अनेक वेळा पुरेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान भागत नाही. यामागे काही आजारांचे आगमन हे कारण असू शकते.

Health tips
हेल्थ टिप्स  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • चांगल्या आरोग्यासाठी नियमितपणे पाणी पिणे योग्य असते
  • काहींना वारंवार तहान लागते
  • जास्त तहान लागण्यामागे अशू शकतात काही आजार

Reasons behind Excessive Thirst:नवी दिल्ली : तहान लागणे (Thirst) ही एक अत्यंत स्वाभाविक क्रिया आहे. शरीरात पाण्याची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी एक चांगला मार्ग म्हणजे नियमितपणे पाणी पिणे (regular water drinking). साधारणपणे एका वेळेस अर्धा ते एक लिटर पाणी तहान भागवण्यासाठी पुष्कळ होते. आपले शरीर आपल्या आरोग्याविषयी (Health)आणि आजारांविषयी विविध संकेत देत असते. मात्र काहींना सतत तहान (Excessive Thirst) लागते. कितीही पाणी प्यायले तरी समाधान होत नाही. अनेक वेळा पुरेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान भागत नाही. असे असेल तर मात्र तुम्ही याकडे खास लक्ष देण्याची गरज आहे. कारण सतत तहान लागण्यामागे तुम्हाला एखादी व्याधी किंवा आजार असण्याचीही शक्यता असते. (If you are facing excessive thirst, then be careful about these diseases)

अधिक वाचा : आपलं काय चुकतयं, हे कळायलं लागलयं : बाळासाहेब थोरात

काही लोकांना वारंवार तहान का लागते-

अनेकदा असे दिसते की काही लोकांना सतत तहान लागत असते. ते वारंवार पाणी पित असतात. असे लोक तहान शमवण्यासाठी अनेक ग्लास पाणी पितात. इतकेच काय तेवढ्यानेही समाधान होत नाही म्हणून मग ते थंड ज्यूस आणि शीतपेये घेतात. तरीदेखील त्यानंतरही त्यांना घसा सतत कोरडा जाणवतो, अशा परिस्थितीकडे कानाडोळा करू नका. याला गांभीर्याने घ्या. कारण कदाचित तुमचे शरीर तुम्हाला काही संकत देत असेल. यामागे काय कारण असू शकते ते जाणून घेऊया.

1. शरीरात पाण्याची पातळी कमी होणे
काहींच्या शरीरात पाण्याची पातळीच कमी झालेली असते. अशावेळी एक-दोन ग्लास पाणी प्यायल्याने तहान भागणार नाही. यासाठी नियमितपणे पाणी पित राहा आणि सर्वात म्हणजे यासाठी घसा थोडा-थोडा ओला करत राहा.

अधिक वाचा : शिवसेना परत भाजपकडे मैत्रीची साद घालणार का?

2. तोंड कोरडे पडणे
आपल्या तोंडात लाळ तयार होत असते. ही फार महत्त्वाची असते. मात्र काहींच्या तोंडात पुरेशा प्रमाणात लाळ तयार होत नाही. त्यामुळे त्यांच्या तोंडाला सतत कोरडेपणा जाणवतो. अशावेळी मग सारखे पाणी प्यावेसे वाटते.

3. मधुमेह
हा एक अत्यंत गंभीर आजार आहे. याला अनेक रोगांचे मूळ म्हटले जाते. मधुमेहाच्या रूग्णांची एक मोठी समस्या म्हणजे त्यांना जास्त तहान लागणे. त्यामुळे तुम्हाला जर सतत तहान लागत असेल तर तुम्ही रक्तातील साखर तपासली पाहिजे.

अधिक वाचा : या दोन क्रिकेटर भावांनी भारताला जिंकून दिलाय वर्ल्डकप, गरिबीतून आले वर

4. खायच्या सवयी
आपण काय खातो यावरदेखील आपल्याला लागणाऱ्या तहानेचे प्रमाण अवलंबून असते. जर तुम्ही जंक फूड खात असाल. तुम्हाला खूप तिखट आणि मसालेदार पदार्थ खायला आवडत असेल तर यामुळेदेखील सारखी तहान लागते. मग या पदार्थांच्या सेवनाला आवर घातला पाहिजे. 

5. अशक्तपणा
काहीवेळा आपल्या शरीरात अशक्तपणा निर्माण होतो. शरीरात रक्ताच्या कमतरतेला अॅनिमिया म्हणतात. अॅनिमियामध्ये शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता निर्माण होते. त्यामुळे सारखी तहान लागते आणि कितीही पाणी प्यायले तरी तहान भागत नाही. 

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी