Fatty Liver: तुम्हालाही फॅटी लिव्हरची समस्या आहे का? पाहा काय खावे आणि काय टाळावे

Health Tips : आपल्या शरीरातील यकृत हा एक महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या पचनक्रियेमध्ये (Digestion)यकृताचे काम अतिशय महत्त्वाचे असते. मात्र जर यकृतामध्ये जर काही समस्या निर्माण झाल्या तर त्याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होतो. यकृतातील चरबी वाढणे याला फॅटी लिव्हर(Fatty Liver) रोग म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की यकृत फॅटी आहे की नाही हे कसे कळेल? तर याला असे समजूया की जेव्हा शरीरातील एकूण चरबीचे प्रमाण यकृताच्या वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त होते, तेव्हा त्या स्थितीला फॅटी लिव्हर म्हणतात.

Fatty Liver
फॅटी लिव्हर 
थोडं पण कामाचं
  • जर यकृतामध्ये जर काही समस्या निर्माण झाल्या तर त्याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होतो.
  • जेव्हा शरीरातील एकूण चरबीचे प्रमाण यकृताच्या वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त होते, तेव्हा त्या स्थितीला फॅटी लिव्हर म्हणतात.
  • यकृतावर चरबी जमा झाल्यामुळे अन्न पचणे कठीण होते आणि रुग्णाच्या पोटात दुखण्याबरोबरच इतर लक्षणे दिसू लागतात.

How to Get Rid of Fatty Liver : नवी दिल्ली : आपल्या शरीरातील यकृत हा एक महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या पचनक्रियेमध्ये (Digestion)यकृताचे काम अतिशय महत्त्वाचे असते. मात्र जर यकृतामध्ये जर काही समस्या निर्माण झाल्या तर त्याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होतो. यकृतातील चरबी वाढणे याला फॅटी लिव्हर(Fatty Liver) रोग म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की यकृत फॅटी आहे की नाही हे कसे कळेल? तर याला असे समजूया की जेव्हा शरीरातील एकूण चरबीचे प्रमाण यकृताच्या वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त होते, तेव्हा त्या स्थितीला फॅटी लिव्हर म्हणतात. यकृतावर चरबी जमा झाल्यामुळे अन्न पचणे कठीण होते आणि रुग्णाच्या पोटात दुखण्याबरोबरच इतर लक्षणे दिसू लागतात. समस्या वाढल्यास यकृताची जळजळ देखील होऊ शकते. आपण आपल्या आहाराकडे लक्ष दिल्यास, आपण यापासून मुक्त होऊ शकता. (If you are facing the problem of Fatty Liver then know what to eat and what to avoid)

अधिक वाचा : Crime News : लग्नाला नकार दिला म्हणून सहा मुलांच्या आईने केला बॉयफ्रेंडचा खून, पोलिसांकडून महिलेला अटक

फॅटी लिव्हरची समस्या असल्यास काय खावे?

  1. -अक्रोड आणि लसूण- अक्रोडमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड फॅटी यकृत असलेल्या लोकांना मदत करू शकते. अभ्यासातून असे लक्षात आले की नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोगामध्ये अक्रोड खाल्ल्याने यकृताचे कार्य सुधारू शकते. यासोबतच लसणातील अॅंटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म फॅटी लिव्हर रोग असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
  2. - ब्रोकोली - समोर आलेल्या माहितीनुसार फॅटी लिव्हर असणा-यांनी त्यांच्या आहारात अधिक भाज्यांचा समावेश करावा. ब्रोकोली ही अशीच एक भाजी आहे जी तुमचे वजन कमी करण्यास मदत करेलच पण फॅटी लिव्हरच्या आजारातही मदत करेल. इतर भाज्या जसे की गाजर, भोपळा, पालेभाज्या, बीट्स, फ्लॉवर, हिरवे कांदे आणि सेलेरी फॅटी यकृत रोग असलेल्या लोकांसाठी चांगल्या आहेत.
  3. - ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् - अभ्यासातून असे समोर आले आहे की ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् यकृतातील चरबीची पातळी आणि फॅटी यकृत असलेल्या लोकांमध्ये एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत करू शकतात. सॅल्मन, ट्यूना, सार्डिन, फ्लेक्ससीड आणि अक्रोड यांसारखे फॅटी मासे हे सर्व ओमेगा 3 फॅटी ऍसिड असलेले पदार्थ आहेत.
  4. - एवोकॅडो- एवोकॅडोमध्ये असलेले हेल्दी फॅट्स वजन कमी करणे आणि फॅटी लिव्हर रोग या दोन्हींसाठी उत्तम आहेत. यात अॅंटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आणि विरघळणारे फायबर देखील भरलेले आहे जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करू शकते. याशिवाय रक्तातील साखर देखील कमी करू शकते.

अधिक वाचा : Firing over FB : फेसबुकवर चॅटिंग बंद केल्याचा राग, तरुणाने मित्रासोबत केला तरुणीवर गोळीबार

फॅटी लिव्हरची समस्या असल्यास किंवा टाळण्यासाठी काय खाऊ नये -

फॅटी लिव्हरच्या आजारात अल्कोहोल प्रामुख्याने जबाबदार आहे. जास्त मद्यपान केल्याने यकृताचे नुकसान, फॅटी लिव्हर आणि यकृत सिरोसिस देखील होऊ शकते. फॅटी लिव्हर रोग असलेल्या व्यक्तीने अल्कोहोलचे सेवन टाळावे किंवा कमी करावे. याशिवाय साखर, तळलेले अन्न, पॅकबंद अन्न देखील टाळावे.

अधिक वाचा : Maharashtra: पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'हे' धबधबे तुम्हाला देतील फॉरेन लोकेशनचा अनुभव, एकदा नक्की भेट द्या

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी