Weight Loss Tips : लठ्ठपणाचा वैतागले आहात? मग तुमच्या जीवनशैलीत करा हे 4 बदल... झपाट्याने कमी होईल वजन

Fitness Tips : आजच्या काळात लठ्ठपणा (fattiness)ही एक मोठी समस्या बनली आहे. आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाही. ज्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. लठ्ठपणामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते. लठ्ठपणामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (High blood pressure)आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack)यासारख्या आजारांमुळे लठ्ठपणा येऊ शकतो.

Weight Loss Tips
वजन कमी करण्याच्या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • लठ्ठपणा, स्थूलपणा ही आजच्या काळात मोठी समस्या
  • लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि ह्रदयविकारासारखे आजार उद्भवतात
  • वजन कमी करण्यासाठी करा या चार गोष्टी, व्हाल तंदुरुस्त

Weight Loss Tips: नवी दिल्ली : आजच्या काळात लठ्ठपणा (fattiness)ही एक मोठी समस्या बनली आहे. आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाही. ज्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. लठ्ठपणामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते. लठ्ठपणामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (High blood pressure)आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack)यासारख्या आजारांमुळे लठ्ठपणा येऊ शकतो. जर तुम्हालाही लठ्ठपणाचा धोका असेल तर काही टिप्स (Weight Loss Tips) तुम्हाला त्यापासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. तसेच जीवनशैलीत (Lifestyle) बदल करून तुम्ही लठ्ठपणा लवकर कमी करू शकता. चला जाणून घेऊया हे बदल आणि टिप्स. (If you are fade up of fattiness, then do these 4 changes to quickly reduces the weight)

अधिक वाचा : Weight Loss: वाढत्या वजनाने आहात त्रस्त तर डाएटमध्ये सामील करा लसूण-मध

जीवनशैलीत हे बदल करा

1. व्यायाम (Exercise)

लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही रोज व्यायाम करा. व्यायामामुळे तुमचे स्नायू टोन होतात आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभरात किमान ४५ मिनिटे दररोज व्यायाम केल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.

2. पुरेशी झोप घ्या (Sleep)

लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने आपले शरीर निरोगी राहते. दररोज चांगले कार्य करण्यासाठी आणि चयापचय संतुलन साधण्यासाठी, आपण दररोज पुरेशी झोप घेतली पाहिजे. असे केल्याने लठ्ठपणा ही समस्या टाळता येते.

अधिक वाचा : तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या आयुर्वेद आणि विज्ञान काय सांगते

3. सकस आहार घ्या (Heathy Food)

लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सकस आहार घ्यावा. सकस आहार घेतल्यास आपले शरीर निरोगी राहते, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तळलेले, साखर आणि परिष्कृत कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांपासून शक्यतो दूर रहा. आपल्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करा. हिरव्या भाज्या आणि फळे अधिक खा.

अधिक वाचा : Weight Loss Tips in Marathi : वजन कमी करत आहात मग तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा

4. दारू आणि धुम्रपानापासून दूर राहा (Avoid Smoking & Alcohol)

लठ्ठपणा कमी करण्यासाठी दारू आणि धूम्रपान टाळा. या दोन्हीचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. या दोन्हींमुळे लठ्ठपणाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे दारू आणि धूम्रपान टाळावे.

(डिस्क्लेमर- लेखात सुचविलेल्या टिपा आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत आणि कृपया प्रयत्न करण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिक वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला घ्या. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी, व्यायाम करण्यापूर्वी किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी