How Can I Gain My Weight Fast: वजन (Weight)कमी करण्यासाठी लोक जितके चिंतेत असतात तितक्याच प्रमाणात वजन कसं वाढवावे या प्रश्नाने त्रस्त असतात. अनेकांसाठी वजन वाढवणे (Weight Gain) इतरांसाठी वजन कमी करण्याइतकेच अवघड असते, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही वजन वाढवू शकत नाही किंवा तुमचे शरीर (body) सुंदर आणि सुडौल (shapely) बनवू शकत नाही. चांगल्या प्रकारचा आहार तुमचे वजन वाढविण्यास आणि स्नायू वाढवण्यासाठी उपयुक्त असते. ज्या लोकांची शरीरयष्टी ही अशक्त असते किंवा बारीक असते असा लोकांना निरोगी आहार (Healthy diet) घेण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. (If you are frustrated with your skinny body, eat these 6 things from today to look massy)
वजन वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत पण अनेकांना त्या माहीत नाहीत. काही लोक अजूनही वजन कसे वाढवायचे? या प्रश्नाने त्रस्त आहेत. जर तुम्हाला खरोखर वजन वाढवायचे असेल, तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मदत करतील. कमकुवत शरीर, हाडांचा कमकुवतपणा यामुळे अनेकांचे मनोबलही घसरायला लागते.
Read Also : हुश्श, मंकीपॉक्सचा धोका कमी झाला : WHO
कमी वजन किंवा हाडकुळा असण्यामुळे देखील अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात कारण खूप कमी कॅलरीज खाल्ल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही. याचा परिणाम चयापचय संस्थेवर होत असतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते. यामुळे वजन वाढवण्याच्या पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचे योग्य प्रमाणात सेवन करण्यासह अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही सातत्याने वजन वाढवण्यासाठी घेऊ शकता.
तुम्ही घरी बनवलेल्या स्मूदीमध्ये तुमच्या इच्छेनुसार कॅलरी घालू शकता. हे अत्यंत पौष्टिक असून वजन वाढवण्याचा सोपा मार्ग आहे. केळी, नट्स, बेरी, सफरचंद आणि एवोकॅडोपासून बनवलेल्या स्मूदी वजन वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅलरी आणि पोषण पुरवत असतात.
पांढरा तांदूळ सर्वत्र सहज उपलब्ध आहे आणि मुख्य अन्न म्हणून भात खाल्ला जातो. योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्ससह भाताचे सेवन केल्यास वजन वाढवण्याचाही हा एक सोपा स्रोत आहे. भाताचे सेवन बटर, ग्रेव्ही, पनीर आणि तळलेले अंडे यांसारख्या गोष्टींमध्ये मिक्स करुन करू शकता.
Read Also : मराठा आरक्षणातून निवड झालेल्यांना अखेर सरकारी नोकरी
डायफ्रुट्स हे निरोगी, चवदार आणि कॅलरी युक्त स्नॅक्स आहेत. जे वजन वाढवण्यासाठी तुम्ही कोणत्याही वेळी याचे सेवन करू शकता. कच्च्या बदामामध्ये कॅलरीज आणि भरपूर प्रथिने आणि फायबर असतात.
स्नायू तयार करण्यासाठी सर्वात प्रभावी गोष्टींपैकी एक म्हणजे लाल मांस. तुमच्या आहारात लाल मांसाचा समावेश करून तुम्ही तुमचं वजन वाढवू शकता.
बटाटे वजन आणि स्नायू ग्लायकोजेन वाढविण्यासाठी मदत करतात. बटाटा हा फायबरचा एक महत्त्वाचा स्रोत आहे जो आतड्यांतील बॅक्टेरियाला पोषण देण्यास मदत करत असतो.
Read Also : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म
सॅल्मन सारख्या अनेक प्रकारच्या माशांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात जे वजन वाढवण्यासह अनेक फायदे देतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आणि निरोगी ठेवण्यास देखील मासे उपयुक्त असतात.
डिस्क्लेमर : प्रस्तुत मजकूर हा संकलित आहे. या मजकुराची जबाबदारी टाइम्स नाउ मराठी घेत नाही. प्रस्तुत मजकुराच्या आधारे कोणतीही कृती करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.